Skip to main content

तबला/ढोलकिच जग

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 19/06/2016 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी काही गोष्टी आयुष्यात फार उशिरा घडतात.पण देर आये दुरुस्त आये प्रमाणे पुढे पुढे मग त्यातली गोडी वाढत जाते आणि जो आनंद मिळतो त्याचे नाव तेच. लहानपणापासुन तबला शिकायचे मनात होते. पण अनेक कारणांनी ते जमले नाही.गावे बदलली,नोकर्‍या बदलत गेल्या, जबाबदार्‍या वाढल्या.आयुष्य वाहातच होते.तबला शिकायच्या ईच्छेने पुन्हा उचल खाल्ली. जाता येता एका रस्त्याला मी सरांच्या नावाची पाटी बघायचो. असाच एक दिवस त्यांना भेटायला गेलो आणि माझी ओळख करुन दिली. माणुस सत्तरीच्या पुढे.

पाव भाजीची गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 19/06/2016 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी तिची दिल्लीची पाव भाजी खाण्याची इच्छा राहून गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे.

झोप उडवणारा 'उडता पंजाब'

लेखक चलत मुसाफिर यांनी शनिवार, 18/06/2016 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
(कोणताही रहस्यभेद/रसभंग होऊ नये अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे) वा! काय झटका बसला राव. अगदी नटबोल्ट हलून गेले. जिभेची चित्र-चव हल्ली, तेच तेच भंगार साजिदछाप विनोद, सलमानछाप भीमउड्या, शाहरुखछाप मर्कटलीला आणि आचरट, अतर्क्य प्रेमकथांचा रतीब पाहून रद्दीत गेलेली होती, ती या 'उडता पंजाब' नामक झणझणीत मिर्चीच्या थेंबाने आधी खवळली, मग तृप्त झाली. शाब्बाश लेको! निदान चोवीस तास चित्रपट डोक्यातून जाणार नाही याची खात्री असू द्या! सर्वात आधी, सेन्सॉरशी खमकेपणाने लढून, न्यायालयाकडे दाद मागून, आर्थिक नुकसानाचा धोका पत्करून हा चित्रपट हट्टाने जसाच्या तसा ठेवल्याबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन.

'कोसला'सोबत एक दिवस

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 13/06/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"कोसला"विषयी खूप काही ऐकून होतो. विकत घ्यायचे मनात होते. पण शनिवारी (दि. ११-जून-२०१६) दुपारी माझ्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलो. तिथे सोफ्यावर कोरेकरकरीत "कोसला" दिसले. दादाने नुकतेच मागवले होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत काही कामांमुळे वेळ मिळाला नाही. संध्याकाळी "कोसला" हातात घेतलं. रात्रीचं जेवण घेतल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि "कोसला"वर झडप घातली. त्याआधी दादाला 'कसे आहे' म्हणून विचारले. त्याने सुरुवातीची काही पाने वाचली होती आणि नंतर त्याला वेळ मिळाला नाही. तो म्हणाला "तू वाच आणि ठरव. वाटल्यास घरी घेऊन जा.

मी आणि टीपू सुल्तान - एक आठवण

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 12/06/2016 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी १०-११ वर्षांचा असेल, तेंव्हाची गोष्ट, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी अर्थात भंडारा येथे आलो होतो. आजोबा वैद्य होते. त्यांचे पूर्वज तीन-चार पिढ्यांपूर्वी आंध्र प्रदेशाहून भंडारा येथे आले होते. भंडार्याच्या नवाबाने त्यांना एक वाडा बांधून दिला आणि काही शेती हि त्यांच्या नावे केली होती. वाडा मोठा आणि दुमंजली होता. आजोळी पोहचल्यावर पहिले दर्शन एका भल्या मोठ्या कुत्र्याचे झाले. त्याला पाहून भीती वाटली. पण मामा म्हणाला, अरे हा कुत्रा फकीर आहे, कुणाला काहीच करत नाही. गल्लीतल्या मरतुकड्या कुत्रांसमोर हि शेपूट टाकतो. मामाचे म्हणणे खरेच होते.

अपेक्षाभंग करणारा TE3N

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 12/06/2016 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
TE३N पाहिला. बरा आहे. थोडा confusing आहे. अजून छान होऊ शकला असता. दिग्दर्शकाने जर नवीन प्रयोग म्हणून Thriller चा वेग कमी ठेवला असेल तर तो प्रयोग कधीकधी पडतो. मुख्य problem हा आहे की लोक involve होत नाहीत. कथा involve होण्यासारखी असूनही. एक सत्तरीच्या घरातला माणूस, त्याची व्हीलचेअरला खिळलेली पत्नी. गेली ८ वर्षे तो दररोज पोलिस स्टेशनला भेट देतोय. ८ वर्षांपूर्वी त्याच्या नातीचं अपहरण झालंय आणि तिचा मृत्यूही झालाय. तिला न्याय मिळवून देणं आणि या अपहरणकर्त्याला लोकांसमोर आणणं हा या माणसाच्या जगण्याचा एकमेव हेतू आहे. कुठेतरी तो आपल्या नातीच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार धरतोय.

चिअर्स सुंदरीची व्यथा कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 11/06/2016 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
(या लेखाचा उद्देश्य कुणाची भावना दुखविण्याचा नाही. आधीच क्षमा मागतो). अत्यंत तोडके कपडे घातलेल्या, ३६-२४-३६ कमनीय देहयष्टीच्या या चिअर्स सुंदरी त्यांच्या टीमच्या फलंदाजाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारा सोबत मंचकावर येऊन आपल्या देहाचे प्रदर्शन करत नृत्याचे हावभाव करतात. दर्शक त्यांचे नर्तन पाहून शिट्या वाजवितात, टाळ्या पिटतात. जो पर्यंत टीम जिंकत राहते, चिअर्स सुंदरी हि टीम सोबत विमानात प्रवास करतात, उंची हॉटेलात राहतात, बोनस, उपहार आणि अन्य अनेक पुरस्कारांचा वर्षाव या सुंदरींवर होत असतो. पण एकदा टीम हरली कि चिअर्स सुंदरीं हि बेरोजगार होतात.

पिस्तुल्या

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 08/06/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे. मोजून दोन दिवसात (की सहा?) पिस्तुल्याचं चित्रीकरण पु्र्ण झालं. मात्र त्याआधी त्याने कित्येक दिवस तयारी केली होती. कॅमेरा कोठे ठेवायचा, लोकेशन्स, पात्रनिवड, वगैरेवर बरीच मेहनत घेतली होती. हि केवळ १५ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. मात्र नागराजनं त्यातही एक जग उभं केलंय हे नक्की. पात्रं अभिनय करतायत असं कुठेच वाटलं नाही.

आम्रोत्सव

लेखक गणपा यांनी बुधवार, 08/06/2016 16:12 या दिवशी प्रकाशित केले.

रामराम मंडळी,
मिपावर आम्रोत्सव चालू झाल्याची कुण कुण आम्हाला लागली बरं का. एकाहून एक पारंपरिक अन अभिनव पाककृती येताहेत.
या पूर्वीही अनेक आंबा पाककृती मिपावर येऊन गेल्यात. या धाग्यातून त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय.
काही माझ्या नजरेतून सुटल्याही असतील. जागरूक मिपाकर त्यांचे दुवे प्रतिसादातून जरूर देतीलच याची खात्री आहे.
 

सुबह का भूला शाम को घर लौट आए तो...-कैथरीन हेपबर्न

लेखक महामाया यांनी रविवार, 05/06/2016 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघतेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अविस्मरणीय हाॅलीवुड/ चार ‘वूमन ऑफ दि इयर...’ नायिकेला घरा ऐवजी समाजसेवेत ज्यास्त इंटरेस्ट आहे.