Skip to main content

डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - उंबरखिंड - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग २)

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 06/10/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर किसन शिंदे यांची लोणावळा रेल्वे स्टेशनवरच भेट झाली. कुरवंडे गावात उतरलो तेथे गाईड गौरु भाउ आमची वाट पाहातच होते. किती जण आले आहेत हे पाहण्यासाठी काउंटींग घेउन चालायला सुरुवात केली तो पाउस सुरु झाला. १० मिनीटे चढ चढल्यावर चावणी गावापर्यंत उतरणीचा रस्ता असल्याने सर्व अगदी मजेत , फोटो काढत चालले होते. चढ संपल्यावर छोटा पठारसदृश भागात उभे राहील्यानंतर आधी सर्वांची ओळख परेड झाली. आम्ही जिथे उभे होतो तिथेच कुठेतरी शिवाजीमहाराजांनी छावणी बांधली होती असे बरोबर असलेल्या श्री.

डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग १)

लेखक कविता१९७८ यांनी मंगळवार, 04/10/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगर नद्या हे लहानपणापासुन पाहत आल्याने आणि माझ्या पदयात्रेचा रस्ताही अशाच भागातुन जात असल्याने ट्रेक हा प्रकार तसा मला नवखा नाही. पण अनोळखी ग्रुप बरोबर पहिल्यांदा खर्‍या अर्थाने ट्रेक केला तो २०१५ च्या महीला दिनाच्या दिवशी. माझ्या एका मैत्रीणीने मला सांगितले की सह्याद्री म्हणुन एक ट्रेकींग गृप आहे जो श्री शैलेंद्र सोनटक्के लीड करतात आणि श्री महेंद्र भोर, कविता नवरे, विश्वेश नवरे, नागेश धोंगे आणि अजुन २-३ मंडळी त्यांच्याबरोबर बाकीच्या जबाबदार्‍या संभाळतात. हा ग्रुप नो प्रोफीट नो लॉस बेसीस वर चालतो. या ग्रुप ने महीला दिना निमित्त महीला विशेष ट्रेक आयोजित केला आहे.

मिपाराज्य, ठाणे येथे गांधी जयंतीनिमित्त बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळ सभासदांचा वृत्तांत लिहिणेबाबत.

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 03/10/2016 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा शासन आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग ठाणे उपविभाग ठाणे बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535 प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

खुलता खुळी खुलेना...

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/09/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

सौ. सौदामिनी दामले-वाडेकर-मुल्हेर-लीन : एक सुंदर नाट्याविष्कार

लेखक अश्विनी वैद्य यांनी गुरुवार, 29/09/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
सौ. सौदामिनी दामले-वाडेकर-मुल्हेर-लीन सत्य घटने वर आधारित एक मंत्रमुग्ध करणारा एकपात्री प्रयोग, सौ.सौदामिनी दामले-वाडेकर-मुल्हेर-लीन. सादरकर्त्या सौ. अमृता सातभाई, पुणे. हे नाव जरी मला आधी माहीत नसले तरी या परदेशी भूमीवर मराठी नाटक बघण्याची संधी मिळणे हे काही साधे नव्हते. सगळी तयारी करुन आमची कार महाराष्ट्र मंडळ लंडन कडे धावायला लागली. नाटक संध्याकाळी ४ ते ६ असे होते, ते वेळेत सुरु झाले. नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. साधारण ४०-५० वर्षापूर्वीच्या पुण्यातील एक अतिशय धाडसी, मध्यमवर्गीय, बंडखोर व्यक्तिमत्वाची मुलगी कु. सौदामिनी दामले.

‘व्हॉय वी ट्रीट एनीमल्स लाइक एनीमल्स’-रैक्स हैरिसन

लेखक महामाया यांनी बुधवार, 28/09/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... अविस्मरणीय हाॅलीवुड/ सहा- डॉक्टर डूलिटिल चा सवाल आपण जनावरांसोबत जनावरां सारखं कां वागतो...!

मला आवडलेले शायर २ : दुष्यंतकुमार

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 27/09/2016 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली.

Please, Look After Mom!

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 20/09/2016 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो. खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे.

चार्ल्स बुकोवस्कीचं शेवाळं : भाग २

लेखक इनिगोय यांनी रविवार, 18/09/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ------------------------------------------------------ चार्ल्स बुकोवस्कीबद्दल वाचताना आणि लिहिताना त्याची अजून ओळख करून घेण्यासाठी त्याच्या कविता वाचायला सुरुवात केली. शाब्दिक पाल्हाळाविना, यमक गमकाशिवाय लिहिलेल्या त्याच्या बहुतेक कविता स्वतःशी वाचणंसुद्धा सोपं नाही. अकारण नजरेत रोखून बघणारी व्यक्ती जशी समोरच्याला अस्वस्थ करते, तसं वाटायला लागतं. त्यातल्या त्यात सौम्य अशा आणि जालावर उपलब्ध असलेल्या काहींचा भावानुवाद इथे द्यायला सुरुवात करत आहे.

पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.

लेखक एस यांनी रविवार, 18/09/2016 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’ लेखिका – आतिवास सविता. आतिवास यांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर जाताच वाचकाला आतील शब्दानुभवांमध्ये भरलेल्या ताणाचे दडपण जाणवायला सुरूवात होते, इतके हे मुखपृष्ठ भेदक झाले आहे. आणि याचे श्रेय अर्थातच ‘रविमुकुल’ यांना आहे. एका भिंतीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा आणि शेजारी एक बंद खिडकी. सेपिया रंगसंगतीवर खरवडल्यासारखं शुभ्र रंगातील शीर्षक. जणू भीतीचं सावट पुसण्याचा, जिवंत राहण्याच्या अनिवार ओढीतून केला गेलेला आकांत.