मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

गाईड

विजुभाऊ ·
गाईड १९६५ चा सिनेमा ही इतकीच या सिनेमाची ओळख नाही. गाईड हा सिनेमा आर के नारायणच्या कादंबरीवर बेतलेला सिनेमा ही पण याची ओळख होत नाही. देव आनंदची ओळख बदलणारा सिनेमा, भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक स्वतःचा ठसा उमटवणारा सिनेमा. असे बरेच काही सांगता येईल याच्या बद्दल. मी जेंव्हा पहिल्यांदा हा सिनेमा पाहिला तेंव्हा राजू नावाचा कोणताही आगापीछा नसलेल्या एका तरुणाची कहाणी इतकेच काहीसे समजले होते. अर्थात एस डी बर्मन चे म्युझीक हा मोठाच प्लस पॉईंट होता. यात नेहमी दिसणारा तो उत्साही देवानंद दिसत नाही. सळसळत्या तारुण्याची नव्हाळी वागवणारी वहिदा रेहमान दिसत नाही. जी दिसतात ती पात्रे दिसतात.

भाग ७ अंधारछाया प्रकरण ६ कुटून कुटून मारीन पन सोडनार न्हाई.

शशिकांत ओक ·

अंधार छाया

सहा बेबी गुरूजींनी जे सांगितलं त्याच्यावर माझा विश्वासच बसेना! काय मला कोणी झपाटलय? कस शक्य आहे? मी तर माझी मीच आहे. खातेय पितेय, आणखी कोण असणार माझ्या शरीरात? गुरूजी म्हणाले, ‘हिचा पत्रिका जरा विचित्र आहे. अनिष्ट ग्रहयोग मान आहे. शिवाय सध्या साडेसातीही चालू आहे. तिच्या राशीला. तेंव्हा त्रास हा होणारच.’ ते ठीकच होत. माझी तब्बेत ही अशी लुकडी सुकडी. शिक्षणाचे असे तीन तेरा वाजलेले. तेंव्हा कुंडलीच्या भविष्यावर माझा विश्वास बसला. पण पुढे लागिराबद्दल म्हणताना मला काही खरंच वाटेना.

हॉटेल शिवीभोजन थाळी

पाषाणभेद ·
हॉटेल शिवीभोजन थाळी मालक: हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं. हॅ हॅ हॅ या या या. बसा बसा बसा. मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस. हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय? मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज.

मुंगूसाची गोष्ट

मायमराठी ·
।। मुंगूसाची गोष्ट ।। ' गोष्ट ' हा शब्द ऐकल्यावर कान टवकारले जात नाहीत; नीट सरसावून बसत नाही; भुवया आभाळापर्यंत उंचावून उत्सुकता चेहऱ्यावरून सांडत नाही; आपण ज्यांच्याशी गप्पा छाटत होतो त्यांनाच गप्प करत "जरा ऐकू दे रे." असं म्हणत नाही, आहे का असं कोणी? दुसऱ्याही प्रकारचे मनुष्य असतातंच. म्हणजे " हा मला काय अक्कल शिकवणार? ", " हा कुठली गोष्ट सांगणार ते मला माहितेय.", "मला माहीत नाहीत अशा गोष्टीच नाहीत." अर्थात ही वाक्ताडनं मनातल्या मनातंच हो.

छपाकसे पेहेचान ले गया...

शा वि कु ·
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं. हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे- 1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.

मटार ,बटाटा, टोमॅटो

नूतन ·
सालाबादप्रमाणे थंडीचा मोसम आला. मुंबईची थंडी म्हणजे औट घटकेचं राज्य ! तेवढीच मजा लुटावी म्हणून बासनातले स्वेटर ,शाली बाहेर काढल्या आणि सकाळी सकाळीच कुठलीही सबब न ऐकता , जरा हट्टानेच , स-पति फेरफटका मारायला बाहेर पडले. मस्त फिरून प्रसन्न मनाने घरी निघालो. एव्हाना ताज्या तजेलदार, नानाविध प्रकारच्या भाज्या हातगाड्यांवर लादून जाणारे विक्रेते ठायी ठायी दिसू लागले होते. आज अंगात जरा जास्तच ऊत्साह संचारला होता. पावलं आपोआपच हिरव्यागार मटारच्या शेंगांच्या ढीगांनी भरलेल्या गाडीसमोर येऊन थांबली.

सेल्फिश

प्रमोद पानसे ·
"तुला वारंवार कल्पना देउन आणी सावध करुनही काहिही फरक पडत नव्हता सुमती !! " आज पुन्हा एकदा ईगलमधे फृटज्युस च्या जागी बिअर आॕर्डर करणाऱ्या सुमतीसमोर मी घसा कोरडा करत होतो. सुमती .. माझ्याच कंपनीमधे ट्रेनी इंजिनियर म्हणुन अपॉईंट झालेली .येउन सात महिने लोटलेले.फ्रेश इंजिनियर होती.विस एकविस वर्षाच्या सुमतीचं जॉईन झाल्यावर एक महिन्यातच माझ्या डिपार्टमेंटला पोस्टींग झालं.आणी तीला प्रॉडक्शन प्लॕनिंगचे धडे देता देता कंपनीच्या वातावरणाचे ,आजुबाजूला वावरणार्या लोकांच्या मेंटलीटीचे धडे देणं गरजेचं वाटू लागलं.

नाताळ, नववर्ष आणि पॉप संगीत

सुधीर कांदळकर ·
काही सूर अवखळ मनाला बेईमान बनवतात. ते कानी आले की मनाला फुलपाखरांचे मोहक पंख फुटतात. स्पॅनिश गिटार टणकारले वा सेक्साफोन फणकारले की असे होते. ऍकॉर्डिअनमधून रेशीमलहरी बाहेर पडल्या की मग आपले आपण राहात नाही. मन स्मृतींच्या फुलपाखरांवर स्वार होते, कालाचे अदृश्य तट विरघळून जातात आणि ते सूर आपल्याला गतकाळात घेऊन जातात. ते स्वर कानी आले की प्रथम आठवतो तो नाताळ आणि त्यापाठोपाठ येणारा नववर्षोत्सव. एके काळी पॉप संगीताशिवाय हे उत्सव साजरे होत नसत. धीरू पटेल आणि बाळ्या नाईक यांच्यामुळे गुजराती जवाहर मर्चंट, कन्नडिग रत्नाकर आचार्य, इ. नवे मित्र मिळाले.

Kingआख्यान 2: फायरस्टार्टर

शा वि कु ·
Kingआख्यान 1:- डोलोरस क्लेबोर्न टेलिकायनेसीस, टेलीपथी किंगच्या आवडत्या कथा आहेत. किंगची पहिली प्रकाशित कादंबरी "कॅरी" (Carrie- 1974) पण एका टेलिकायनेटिक शक्ती असणाऱ्या तरुण मुलीची गोष्ट होती. अपरिमित जीवितहानी करण्याइतपत शक्ती असलेली, पण बुजरी आणि एकलकोंडी असणारी एक teenage मुलगी, धर्मांध आणि वेडसर असलेली तिची आई, आणि याउप्पर कडी करायला तिला त्रास द्यायला टपलेल्या मुलामुलींचं टोळकं. या सगळ्यांच्या मिलापातून किंग विनाशाचं एक थरारक आणि तितकंच ह्रदयद्रावक तांडव रचतो.

शब्द वेध

मारवा ·
श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली. अर्थात मी भाषा विषयाचा अभ्यासक नाही व वरील लेखकांप्रमाणे माझा सखोल व्यासंग नाही. माझे फक्त शब्दांवर प्रेम आहे आणि त्यांचा धांडोळा घ्यायला मला आवडते. कदाचित मला माहीत असलेले काही शब्दांचे अर्थ बरृयाच जणांना नविन नसावेत पण माझ्यापुरते मला जे रोचक शब्द वाटले अर्थपुर्ण वाटले ते मला इथे तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात इतकेच.