Skip to main content

तोत्तोचान –एका चिमुकलीचे भावविश्व

लेखक Bhakti यांनी बुधवार, 16/12/2020 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षरशः कोरोना काळात या पुस्तकाने एक सुंदर अशी आत्मशांती दिलीये.लहान मुलांचे निरागस भावविश्व सर्वांनाच आवडते.त्यांच्या असंबंध बडबडीने आपला वेळ फुलपाखारांसारखा रंगेबेरंगी होतो. अशा चिमुकल्यांना मात्र शाळा नावाचे दुसरे घर असेच मोकळे पाहिजे तर ती खऱ्या अर्थाने रुजतील.

क्रिकेटची आवाजकी दुनिया

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 14/12/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
इयम आकाशवाणी| संप्रतिवार्ता श्रुयन्ताम| प्रवाचक: बलदेवानन्द सागरः "उठा बाळा... साडेसहा वाजून घेले बघ!" एsssss आघाडा दुर्वा फुलैsssय्यो.... सकाळची ६ वाजून १६ मिनिटं झालेली आहेत... आता ऐकूया "उत्तम शेती" ह्या सदरात उसावर पडणार्‍या तांबेरा रोगाच्या उपायांची माहिती... "कार्ट्या उठ नाहीतर शाळेला उशीर होईल" "पाचच मिनिटं गं आई" ह्यानंतर... र. ना.

मामलेदार नावाचं गारूड

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 03/12/2020 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली. या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण. बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच. काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच. आमंत्रण हे त्याचं जरा कौटुंबिक सामाजिक रूप.

वृक्षासिनी

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 29/11/2020 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

सुब्रमण्यपुरम् - एक थरारपट!

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 25/11/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या साऊथचे सिनेमे या WhatsApp समुहात लिहिलेला एक लेख मिपाकरांसाठी ---------------------------------------------------------- सिनेमाचं नाव आहे सुब्रमण्यपुरम् (Subramaniapuram) सुब्रमण्यपुरम् हा २००८ चा तमिळ सिनेमा आहे. लेखक , दिग्दर्शक , निर्माता - शशिकुमार कलाकार - जाई संपत , स्वाति , शशिकुमार संगीत - जेम्स वसंतन् हा एक अॅक्शन कम थरारपट आहे.तमिळनाडूच्या मदुराई शहरातल्या सुब्रमण्यपुरम् भागात सिनेमाची कथा घडते. सिनेमा सुरु झाल्यावर पहिल्याच दृश्यात आपल्याला दिसतं की तुरुंगातून एक गुन्हेगार शिक्षेचा काळ संपल्याने बाहेर पडतो आहे.तो बाहेर पडताच तुरुंगाच्या आवारातच एक व्यक्

चहाच्या पलीकडे

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 17/11/2020 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
।। चहाच्या पलीकडे...।। "व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।" अर्थात महर्षी व्यास यांनी सर्व जग म्हणजे जगातील सर्व विषय उष्टे ( हाताळलेले ) आहेत. थोडं उलटं जाऊन आपण असं म्हणू या की साऱ्या जगाने चहा उष्टावलेला आहे. तो आवडणारे आहेत, नावडणारे आहेत , त्याबद्दल तटस्थ आहेत. पण चहा माहीत नाही असा जगी कोणीही नाही. चहाबद्दल लिहायचे तर कोणी त्याच्या इतिहासाबद्दल, भूगोलाबद्दल लिहिल. ज्यात तो सर्वात आधी कोण प्यायलं, कसा प्यायलं, मग त्याचा प्रचार व प्रसार कसा झाला. त्याचे प्रकार किती, त्यांची माहिती कशी, त्याला लागणारं हवामान, तो कुठे उगवतो, कसा तयार होतो, कसा पाठवला जातो वगैरे वगैरे.

रॉकस्टार

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 11/11/2020 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसींगची खोड मोडली

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/11/2020 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. ) खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता. खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता.

दोन अनोखे कोर्ट मार्शल

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/11/2020 18:22 या दिवशी प्रकाशित केले.

दोन अनोखे कोर्ट मार्शल

एअरफोर्समध्ये कोर्टमार्शल होणं हे एक अतिशय लज्जास्पद प्रकार म्हणून मानला जातो. पूर्वीच्या काळी आर्मीमध्ये विशेषतः कॅशिरिंग अशी एक पनिशमेंट होती. कॅशिरिंग म्हणजे अक्च्युअली तुम्ही फिल्डमध्ये ऐनवेळी साहस दाखवायला कचरता किंवा तुमची ब्रेव्हरी किंवा तुमचा काय तो धाडसीपणा दाखवत नाही किंवा काही काही वेळेला अतिधाडसीपणा करून दाखवता की जो त्या कामाकरता उपयोगी नाही. अशा वेळेला त्या व्यक्तीला कॅशियर्ड केलं जातं. त्याच्या अंगावरची रँक बॅजेस काढून त्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिलं जातं आणि त्याचं पेन्शन वगैरे तेही बंद होते.

डीडीएलजे : स्वप्न दाखवण्याची २५ वर्षे

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 20/10/2020 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
विसाव्या शतकाच्या अखेरीस भारताने आपली आर्थिक धोरणं बदलली आणि दोन-चार वर्षांत त्याचा परिणाम इथल्या मध्यमवर्गावर दिसू लागला.लोकांच्या खिशात खुळखुळणारा पैसा वाढला होता,उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या दुचाकीला लोकाश्रय मिळु लागला होता, केवळ सिनेमात दिसणारे ब्रँड्स भारतात आपली दालनं उघडू लागले होते. या साऱ्याचा बदल इथल्या तरूणाईवर होणं स्वाभाविक होतं. त्यांच्या इच्छा,स्वप्न यात कमालीचा बदल झाला तो ही फार झपाट्याने. याच बदलाच्या टप्प्यावर 'राज मल्होत्रा' भारतीय तरुणांना भेटला (आणि तरुणींना भावला.) उनाड,मित्रांसोबत गाड्या उडवत फिरणारा, मेंडोलीन वाजवणारा बेजबाबदार.