लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल.
SCAM 1992: The Harshad Mehta Story - SONY LIV : हर्षद मेहता हे नाव माहिती नाही असं होवूच शकत नाही. भारतात उदारीकरण सुरु होण्याच्या काळात झालेल्या त्याकाळातल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयीची हि सिरीज. दहा भागांच्या या सिरीज मध्ये शेयर बाजारातल्या अनेक किचकट गोष्टी यात सोप्या पद्धतीने सांगितल्या आहे. प्रतीक गांधी ने हर्षद मेहताची भूमिका मस्त केलीये. सर्वात भारी बोनस म्हणजे रजत कपूर, त्याची भूमिका अगदी थोडी असली तरी त्याचं काम अगदी कडक झालाय.
Modern Love - अमेझॉन प्राईम : न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मॉडर्न लव नावाचा एक कॉलम यायचा त्यात लोकांना आलेले प्रेमाचे वेगवेगळे अनुभव व्यक्त केलेले असायचे. प्राईमने त्याच कॉलम वर आधारित सिरीज बनवली मॉडर्न लव. प्रेमात आलेले अपयश, चाळीशी पार केलेल्या कपल मधले वादविवाद. चुकलेली डेट, डेटिंग ऍप द्वारे भेटलेलं प्रेम, निशब्द साथ करणारी मैत्री, गे पालकत्व अश्या वेगगेगळ्या विषयांवरच्या ८ स्टोरीज यात सामावलेल्या आहेत. टेलिव्हिजन सिरीज असली तरी यात अने/एना हॅथवे, मॉरीयार्टी वाला अँड्रयू स्कॉट, आपला घरचा देव पटेल सारखे बरेच चांगले कलाकार यात आहेत. अगदी हलकीफुलकी असलेली सिरीज तुमचा मूड एकदम फ्रेश करते.
Eat. Race. Win. -अमेझॉन प्राईम : खाणं आणि खिलवण हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग ते साधं घरच जेवण असो कि टूर डी फ्रांस सारख्या रेस मधल्या स्पर्धकांसाठी बनवलेलं असो ते सारख्याच निगुतीने बनवावं लागतं. इट रेस विन हि Orica-Scott या ऑस्ट्रेलियन प्रो सायकलिंग टिम च्या टूर डि फ्रान्स रेस मधल्या स्पर्धकांसाठी कसं जेवण बनवलं जाते, स्पर्धकांचा परफॉर्मन्स वाढावा यासाठी जेवण बनवतांनाची प्रोसेस यात खूप सुंदरपणे दाखवली आहे.
Putham Pudhu Kaalai अमेझॉन प्राईम : लॉकडाऊन सर्वांसाठीच त्रासदायक होता, त्याचा आपल्या सर्वांच्या मनावर नकळतपणे का होईना पण परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच काळानंतर कुटुंब एकत्र आली असं म्हणता येईल. प्राईम वर या लॉकडाऊन आणि मानवी नातेसंबंध यावर आधारित वेगवेगळ्या कथा असणारी तामिळ फिल्म रिलीज झाली. विशेष म्हणजे स्व. एस पी बालसुब्रमण्यम यांचं योगदान असलेला हा शेवटचा चित्रपट.
The Crown नेटफ्लिक्स : इंग्लंडची राणी एलिझाबेथ उर्फ आज्जीबाई कोणाला माहिती नाही मी जर चुकीचा नसेल तर सर्वात जास्त काळ इंग्लंडवर राज्य करणारी एलिझाबेथ हिची हि गोष्ट गोष्ट. खरंतर बारकाव्यांसहित एखाद्या राजघराण्याबद्दल ०३ सिझन मध्ये मांडायचं जरा कठीणच काम पण या सिरीज मध्ये अगदी जबदस्त दाखवलं आहे. राजघराण्याच्या प्रथा, डामडौल, लॉर्ड माऊंटबॅटन, विन्स्टन चर्चिल पाहतांना आपण नकळत त्याकाळात जातो.
Rise of Empires: Ottoman नेटफ्लिक्स : कॉन्टॅन्टिनोपलचा पाडाव इतिहासातली महत्वाची घटना. या घटनेवर आधारित नेटफ्लिक्स ची हि मिनी सिरीज आपल्याला श्वास रोखून ठेवायला भाग पाडते. सिरीज फक्त ६ भागांची जरी असली तरी निर्मितीमुल्यांत कुठेही तडजोड केली नाहीये. विशेष म्हणजे याची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तुम्हांला इतिहास आवडत असेल तर नक्की पहा आणि आवडत नसेल तरी पहा कारण त्यातली गुंतागुंत अगदी सरळ करून सांगितली आहे.
वाचने
33447
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
नुकतीच नेटफ्लिक्सवर नार्कोस
मराठी
अजुन काही
होमलँड मस्त आहे एकदम.
In reply to अजुन काही by भुमन्यु
वाह वाह आजच डाऊनलोडतो
In reply to अजुन काही by भुमन्यु
डाऊनलोडतो
In reply to वाह वाह आजच डाऊनलोडतो by महासंग्राम
इन ऍप डाउनलोड करून ठेवता येतं
In reply to डाऊनलोडतो by प्रदीप
अॅप
In reply to इन ऍप डाउनलोड करून ठेवता येतं by महासंग्राम
अजून काही
माझे आवडते:
.
Modern Love
In reply to . by तुषार काळभोर
स्कॅम १९९२
In reply to . by तुषार काळभोर
अगदी ....... !
In reply to स्कॅम १९९२ by तुषार काळभोर
+१
नेटफ्लिक्स वरच्या आवडलेल्या
हाऊस ऑफ कार्ड्स मला पण आवडली
In reply to नेटफ्लिक्स वरच्या आवडलेल्या by वीणा३
मला आवडलेल्या काहि
Dexter
In reply to मला आवडलेल्या काहि by साबु
Netflix
स्कॅम 1992 (Sony Liv)
काल रात्री मिर्झापूर २पाहून
सेम हिअर.
In reply to काल रात्री मिर्झापूर २पाहून by महासंग्राम
पण शेवटात माती खाल्ली नाही हे
In reply to सेम हिअर. by कानडाऊ योगेशु
एमिली इन द पॅरिस
क्राऊन चा नवीन सिझन भन्नाट
सध्या ludo बघतोय
ल्युडो जबरदस्त केलाय. अभिषेक
In reply to सध्या ludo बघतोय by तुषार काळभोर
तंतोतंत
In reply to ल्युडो जबरदस्त केलाय. अभिषेक by महासंग्राम
मिर्झापूर २ चे दोन भाग बघितले.
वेब सिरीज....
>>>’हर्षद मेहता’ उलगडत गेला>>>
In reply to वेब सिरीज.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान आहे
बिच्छू का खेल
द मॅण्डलोरियन सुरू केली.
शी.
अॅक्शन, थरार, पकडले, सुटले, अशा टाइप्सचे काही असेल तर सुचवा
In reply to शी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके
In reply to अॅक्शन, थरार, पकडले, सुटले, अशा टाइप्सचे काही असेल तर सुचवा by तुषार काळभोर
बीच्छु का खेल
In reply to अॅक्शन, थरार, पकडले, सुटले, अशा टाइप्सचे काही असेल तर सुचवा by तुषार काळभोर
पंचायत बघा तुमची पंचाईत नक्की
In reply to शी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंचायत
In reply to पंचायत बघा तुमची पंचाईत नक्की by महासंग्राम
The End...
In reply to पंचायत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंचायत
In reply to शी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोल्डवॉर आणि स्पाय आवडत असेल
क्रिमिनल जस्टीसचा दुसरा
हल्लीच पाहिलेल्या वेब सिरिज /
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkarसध्या सुपरनॅचरल सुरू केलीय.
प्राईमवर
शंका
नेटफ्लिक्स घ्या
धन्यवाद.
In reply to नेटफ्लिक्स घ्या by राघवेंद्र
माझ्या कडे आहे. विना जाहिरात
In reply to धन्यवाद. by हेमंतकुमार
जेपी
In reply to माझ्या कडे आहे. विना जाहिरात by जेपी
एक अमेरिकन सिरीज आहे
दृष्यम २ तेलुगू
In to the night मस्त आहे
जपनाम जपनाम !
हल्लीच
मी नेटफ्लिक्सचे
In reply to हल्लीच by जेम्स वांड
DNA
प्राईमवर क्रॅश कोर्स - भानू
कालच बघून संपवली. सुरुवातीला
In reply to प्राईमवर क्रॅश कोर्स - भानू by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
In reply to कालच बघून संपवली. सुरुवातीला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
भारत चीनी अॅपवर बहिष्कार का घालत आहे ?
माझ्या अंदाजानुसार गॅट
In reply to भारत चीनी अॅपवर बहिष्कार का घालत आहे ? by धर्मराजमुटके
चक्कर
अविरत दळण - पर्व चौथे