Skip to main content

रावण नाडीचा माझा अनुभव - सन २०१०मधील किस्सा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 18/08/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.

रावण नाडीचा माझा अनुभव - सन २०१०मधील किस्सा

सन २०२० मधे अशा काही घटना घडून आल्या कि त्यामुळे माझ्या १० वर्षांपुर्वी लिहिलेल्या लेखनाला पुन्हा संपादित करून सादर करावेसे वाटले. पुन्हा नव्या माहितीने व फोटोंनी तयार केलेला तो हा लेख...

अंतहीन

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 17/08/2020 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं सुरू झालं ते मिथिला पालकरच्या इंस्टा रील पासून काल रात्री बाहेर पाऊस बरसत असतांना, इन्स्टाग्रामवर तिने sing song saturday मध्ये 'जाओ पाखी' गाण्याच्या काही ओळी गुणगुणल्या होत्या. बाहेर पाऊस आणि तिचा गोड बासुंदी आवाजात म्हणलेल्या त्या दोनच ओळी खूप आवडून गेल्या.

असा बालगंधर्व पुन्हा न होणे

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 14/08/2020 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात बालगंधर्व माहिती नसलेला मनुष्य सापडणे जरा कठीणच. बालगंधर्व चित्रपटामुळे त्यांचं कार्य आताच्या पिढीला कळलं त्याच बरोबर त्यांचा स्वभाव कलेप्रती असणारी निष्ठा, प्रेक्षकांसाठी उच्च तेच सादर करण्याचा स्वभाव सुद्धा माहिती झाला. त्यांचे असेच काही अपरिचित प्रसंग इथे सादर करतोय.

आठवणी 2

लेखक प्रमोद पानसे यांनी गुरुवार, 13/08/2020 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंपाकघरात जेवायला बसलं की मागच्या दारातुन शाळेच्या छतावरुन लांबवरचा हिरवागार डोंगर दिसायचा. हो त्याचं पहिलं दर्शन हिरवंगारच होतं. जुन महिना ,नविन शाळा ,लोणावळ्यातला पावसाळा आणी धुक्यात वेढलेला तो हिरवागार डोंगर एखाद्या गुढ ,अगम्य विचारवंतासारखा भासायचा.एवढं काही समजत नव्हतं पण त्या वयात वाचलेल्या परिकथांमधला एखादा राक्षस ,जादुगार किंवा चेटकीणीचं वास्तव्य असावं त्या डोंगरामागे असं वाटायचं. मधुनच उन्हाची एखादी तिरीप त्यावर पडली की पाचुच्या त्रिकोणी खड्यासारखा चमकायचा.

संपला फ्रेंडशिप डे......

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 05/08/2020 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

फॉरेस्ट गम्प- एका मुलाची कथा

लेखक भीमराव यांनी शनिवार, 25/07/2020 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल पर्यंत मला हा चित्रपट काय आहे खरच माहित नव्हतं. अगदी सहजच मिळाला आणि वेळ घालवायला दुसरं काही नाही म्हणून पाहिला. आणि काही तरी वेगळं पाहिलंय याची जाणीव झाली. एका अनोळखी गावात बस स्टॉपवर बसलेला एक तरुण. शेजारीच ठेवलेली आटोपशीर बॅग. लोकं येतायत आणि जात आहेत. त्यालाही कुठे तरी जायचं आहे, पत्ता विचारावा तर कसा आणि कोणाला? शेजारीच बसची वाट पाहत बसलेल्या एका बाई बरोबर तो बोलायला सुरुवात करतो. तसं बघायला गेलं तर त्याला फक्त नऊ नंबर च्या बस शी देणं घेणं असतं, पण तो अगदी सुरूवातीपासूनची गोष्ट चालू करतो. आणि एक एक करत आपल्या समोर उलगडत जाते त्याच्या आयुष्याची कथा.

क्वाएट प्लीज... लेडीज अँड जेंटलमेन!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 11/07/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
चंदा आए, तारे आए, आनेवाले सारे आये आए तुम्ही संग ना... आन मिलो सजना| जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्‍या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान.

गुलाबी कागद निळी शाई....7जवळीक

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 10/07/2020 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई..6 शहारा Hi हायेssss. शिकारी खुद यहा शिकार बन गया..... शप्पथ सांगते तेव्हा मी अजिबातच notice नव्हतं केलं तुला. Btw मी पण योगा सोडला आणि मेंगो कलरचा ड्रेस होईनासा झाला. तुझेच शब्द बदलून कली का फूलगोबी होते, बादल का बादली होते, दूध का दुधी (भोपळा) होते, किसने देखा है? दुनिया देखे न देखे, मैने ग्राम को किलोग्राम होते देखा है... ;););) तशी मी कालपासून हसतेय. तुझी शायरी वाचून. म्हणजे आधी मी ती मराठीत आहे असंच समजले.