Skip to main content

विराणी

हं ! ते तुला कधी जमणारच नाही

लेखक गणेशा यांनी बुधवार, 29/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे मुळ कविता : तू ये... अरे द्यायचेच असेल तर दे आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात हं ! ते तुला कधी जमणारच नाही तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती अरे गायचेच असेल तर गा ते स्वर बंदिशी मिलनाचे... हं ! ते तुला कधी जमणारच नाही हळव्या कोपर्‍याचे ..
काव्यरस

तू ये...

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 26/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन तू ये, तुला फुकट देईन... वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन तू ये, तुला फुकट देईन... अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन तू ये, तुला फुकट देईन... अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन तू ये, तुला फुकट देईन...
काव्यरस

ठळक माझी मेहुणी....

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 17/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहापरी वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी गुरकते, डरकाळते , पण मेहुणी जबरी खरी लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो आलिया भोगासि म्हणुनी बोल नशिबा लावतो :(:(:(:(:(:(:(:(:(:(
काव्यरस

एका बापाची व्यथा .......

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 31/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पाटी पुसून कोरडी करणं इतकं सोपं नसतं गं मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं फोडासारखं जपलं तुला, मनासारखं फुलू दिले रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं सतरा हे काय वय का गं असा निर्णय घेण्याचं अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर 'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं शेवटच्या त्या क्षणी पिल्ला, तुला खूप दुखलं का ? कणभर का होईना , आमची आठवण आली का ? सतत प्रश्न घेऊन जगणं इतकं सोपं नसतं गं
काव्यरस

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 30/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

डर्बी लाजिरवाणी (मॅन्चेस्टर युनायटेड च्या पराभवाचं गीत)

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
काल गजर लावून सव्वा वाजता उठून मॅन्चेस्टर डर्बी बघितली... आणि हाय रे दुर्दैवा... ३-० ची हार बघावी लागली. झोपही गेली आणि हारही झाली.

संत मीराबाईची विराणी

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 03/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही|| पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग| चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग|| पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला | कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला|| जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको| विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको|| अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा| बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा|| राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो| विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||
काव्यरस
Taxonomy upgrade extras