Skip to main content

विडम्बन

बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 18/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... तोडलंस माझं घर, तुटेल तुझा गुरूर एक दिवस येशील, तू पण रस्त्यावर जरूर बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... सुटेल तुझं धनुष्य, पुसेल तुझ नाव तुझाच बाण करेल, तुझ्याच XXत घाव बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... नको समजू मला गाव की गोरी मै तो बागड की छोरी,गोरी गोरी ( https://youtu.be/zVPTjJ0blWs ) XX XXX हाती जाईल धनुष्याचा दोरी भात्यात उरतील तुझ्या फक्त बाण तेरा घड्याळा बरोबर, वाजतील तुझे पण बारा बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... केलेस

(झाली किती रात सजणी...)

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 24/12/2022 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून.... (आली जरी रात सजणी...) आली जरी रात सजणी झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे. अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे. खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे. बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.

आठवण....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 14/08/2022 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/50568/backlinks आमची बी एक आठवण... कविवर्यांची क्षमा मागीतली आहे. खिशातल्या रूमालाला घामाचा वास मनाला लागला तूझाच की ग ध्यास चार कप्प्यातला एक कप्पा होता खाली तू येणार म्हणून साफसफाई केली घरावरून मारल्या दिवसाच्या चकरा सात बात नाय बनली कारण जय विजय उभे दारात बांधीन म्हणलं सात तळाची माडी पण सावळ्या कुभांराची गाढवं मधी आली ऊगाच घेतला ध्यास डोक्याला कल्हई झाली चांदोबा नाय दिसला पण फुकट धुलाई झाली काय सांगू आता आठवणीत जगतो मनातले मांडे खाऊन रूमालाला घाम पुसतो कसरत १४-८-२२

चारोळया: ताज्या घटनांवर

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 11/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रूटस सीजर कुणीच नव्हता सारेच ब्रूटस होते. खंजीरीच्या पात्यांना रक्ताची तहान होती. जो पळतो तो जिंकतो बाजीरावाने घुडदौड केली निजामचा पराभव केला. शिंदेंनी विमानदौड केली उद्धवचा पराभव केला. दैवयोग किती षड्यंत्र केले किती वेश बदलले नशिबी मात्र माझ्या फक्त मंत्रिपद आले. ज्ञानी लोक रात्री झोपतात ज्ञानी रात्री जागतात गीतेचा संदेश हा शिंदेंना कळला होता. आजचा पाऊस वेगळा होता आसामच्या डोंगर-दर्‍यातून मुंबईत कोसळला होता. मर्सडीज पाण्यात बुडाली रिक्शा तरंगत होता.
काव्यरस

वसंतात मृगजळ खास

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 29/04/2022 या दिवशी प्रकाशित केले.
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

उष्णकटिबंधीय वसंत

लेखक माहितगार यांनी सोमवार, 25/04/2022 या दिवशी प्रकाशित केले.
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

रोज किती पाणी प्यावे?

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 या दिवशी प्रकाशित केले.
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

बकध्यान....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 27/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/50007/backlinks श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू..... रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी नका शोधू यात जोडगोळी कुणाची पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची शोधिसी दानवा गुपीते कुणा कुणाची का तोडू पहातो घरटी कुणाकुणाची लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन) दिला हात गरिबांना त्यांच्या अडी नडीला फेडले त्यांनी पांग देऊन बिडी काडीला बाधंली ही माडी जोडून पै...
काव्यरस

आनंदी आनंद गडे........मेट्रू

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 12/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
बालकवी म्या पामरला क्षमा करा आनंदी आनंद गडे मेट्रू धावे चोहीकडे क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड क्षणात पोहचे कोथुरुडे आनंदी आनंद गडे डोलत लतीका गंधवती मेट्रु स्टाफ लगबगती नटली संध्या प्रेमाने कुमद ही हसते आहे सनई चौघडे , हार तुरे झगमग लगबग चोहीकडे आनंदी आनंद गडे नरमुंड रूंड पाहूनी मनी चितंले, प्राणनाथ धावले भान हरले(पुणेकरांचे), गान स्फुरले आनंदी आनंद गडे नरेंद्र बसला,देवेंद्र ही बसला खुशीत हसला उधो धावे खिडकी कडे (तिकीटाच्या) आनंदी आनंद गडे वाहति रस्ते संथगती, विहरती दुचाकी तिव्रगती द्विपाद,चतुष्पाद भ्रमती मोदभरे कमल विकसले, कोण आकसले डोलत वदती (पुणेकर) इकडे,तिकडे, चोहिकडे
काव्यरस