मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

तव चिंतनातही मी

नरेंद्र गोळे ·
लेखनविषय:
काव्यरस
तव चिंतनातही मी तव चिंतनातही मी, बाहुंतही तव मीच मी \-२ माझीच दोन्ही घरे, ए प्रियकरा ही इथे जणू दिप्ती पहाटेसची, नेत्रांत तव हरपली उघड लोचने तू तुझी, पुतळ्यांत असणार मी मी आहे, कला ज्या स्थळी, नेत्रांत तुझिया उभी मदनमस्त चंचल ही सांज, संकेतच देते तुला दगडांत कर शायरी, वंदन मी करते तुला तू अससी, तेथ मी, नाचे ही भू-आसमान शांतारामांच्या रोमांचक स्वप्नाला हसरत जयपुरींनी शब्द दिले तेव्हा हे गीत निर्माण झाले. उघडच आहे की ते माझे नाही. हा आविष्कार मात्र माझाच आहे. त्याला वाण नाही तर नाही पण गुण तरी लागला आहे की नाही, हे मात्र तुम्हीच सांगू शकाल.

मी वळूनी हासले - चुकले जरासे

सांजसंध्या ·
लेखनविषय:
मी वळूनी हासले - चुकले जरासे प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे उत्तराशी थांबले, चुकले जरासे शीळ त्याची ओळखीची रानभूली मी वळूनी हासले - चुकले जरासे पाळले ना भान तू मज छेडतांना लाजले मी लाजले, चुकले जरासे भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे बंद होते द्वार माझे तव सुरांना का कशी नादावले - चुकले जरासे रोखले मी आसवांच्या आठवांना शेवटी रागावले - चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे संध्या २६.११.२०१० रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ...

सांजवात..

सांजसंध्या ·
लेखनविषय:
काव्यरस
सांजवात.. शीळ तुझी दरीतली खूण तुझी सरीतली.. ओढ तुझी अंतरात रोज मुकी चांदरात.. ओल तुझी काळजात बोल तिचे आसवात साद तुझी वादळात याद तुझी काजळात आजही तू आठवात तेवते मी सांजवात.. - संध्या

दर्द - ऐ - दात

५० फक्त ·
काव्यरस
मी आताशा ठरवुनच टाकलंय, पुढचं प्रेम या डॉक्टरवरच करायचं. सगळे दात काढले तिनं, तरी तिच्यावरच मरायचं. मी आताशा ठरवुनच टाकलंय... एक दिवस काय झालं, बासुंदी पिता पिता हाटेलात पुढचा एक दात कर्रकन हलला मला वाटलं त्याचा बेरिंगच निसटला घरी येता येता दवाखान्यांत गेलो तिथली रांग पाहुन मनोमन सुखावलो बाहेर एक बाउन्सर बहुधा कंपाउंडर असावा आत नाही जमलं की इथंच उपटत असावा. शेवटी माझा नंबर आला, हळुच आत गेलो बेसिनमधले गोरे हात पाहुनच गार झालो या हातानी एक काय चार दात काढा जमलं तर भरुन द्या मागच्या दोन दाढा 'येस,प्लिज, य, खुर्चीवर बसा,' आवाज बरा नव्हता, काळी तिन पांढरी दोनच्या मध्ये अडकला होता काय झालंय ते

(रे मना ..)

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
मुळ गझल : http://www.misalpav.com/node/21076 - सांजसंध्या त्यावरुन पॉझिटीव्ह कविता : रे मना नभ पुन्हा उजळून आले शब्द भावनांची माळ माळून आले. आस रात्रीस, ह्या चांदण्या नभाची मेघ तेंव्हा मिठीत न्हावून आले हे श्वास होते भारलेले कधीचे क्षण तुझ्यासवे आज दरवळून आले देहात रुजलेली जाणीव मिलनाची तव स्वप्न मनी आज फुलून आले जीवनाचे डाव कित्येक खेळले मी तुझेच प्रितवार आज झेलून आले. --- शब्दमेघ

मॅसोचिस्ट कि मॅसोकिस्ट सौंदर्य : एक गूढ

यकु ·
कालच्या सॅ‍‍डीस्ट मॅसोचिस्टच्या अर्थाच्या सुतावरुन आम्ही हा स्वर्ग गाठला आहे. मॅसोचिस्ट साहित्याचं फक्त सौंदर्य पकडून इथं उभं केलं आहे. आणखी एक म्हणजे जगाच्या साहित्यात 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही नाहीच्चे, हा विकृत माणूस आहे म्हणून कुणी आलं तर आपण बोलू शकणार नाही. कारण 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही आहे की नाही हे मला माहित नाहीच. एक उगी आपला शब्द म्हणून बरा वाटला 'मॅसोचिस्ट सौंदर्य' म्हणून वापरलाय - आणि मी सगळे शब्द असेच शब्दकोश वगैरे चाळून, खात्री वगैरे करुन न घेता वापरतो, नेहमीच. तर मुख्य मुद्दा असा की 'मॅसोचिस्ट सौंदर्याच्या या अभिव्यक्तीमागे एक गूढ लपलंय. पण मी ते सांगत बसणार नाही.

रेशमी सलवार कुडता जाळीचा

नरेंद्र गोळे ·
लेखनविषय:
काव्यरस
मुलगा: रेशमी सलवार कुडता जाळीचा | रूप सह्य न, नखराही कमालीचा || मुलगी: जा रे पिच्छा सोड मज मतवालीचा | का रे रस्ता शोधतोसी चौकीचा || धृ || मुलगा: पाहे जेव्हा तुला मी | फुलझड्या अंतरी झडती || मी करेन पिच्छा, पडल्या | जरी हातकड्याही हाती | पाड काय चौकीचा || १ || मुलगी: आहे घरंदाज मी नारी | मला समज न असली तसली || बड्याबड्यांची केली | मी आहे ऐशी तैशी | तू कुण्या गणतीचा || २ || ही कविता माझी नाही. मात्र, हा आविष्कार माझाच आहे. चाल ओळखीची वाटू शकते. उमगली तर अवश्य सांगा. मूळ कवितेतला मुलगा गातो ते मात्र 'आशा भोसले' ह्यांच्या आवाजात!

मिठी...

हर्षद आनंदी ·
लेखनविषय:
काव्यरस
अधीर तो .. किंचित बावरलेली ती .. हात्तात हात..नयनात चाले रुजवात..अस्फुट अधर ते थरथरतात .. शब्द परी न सुचतात. .. सोनसळी तिची कांती झळाळे जसा मावळतीचा रवी .. उषेचा रक्तिमा गाली पसरला.. बघता हा नजारा तो देहभान हरवला.. क्षणात सावरला... हळूच घेतले कवेत तिजला.. मोहोरली ती .. अंगावर अंगावर फुले शहारा ..विसावला पळभर रवी क्षितिजावरी अनुभवण्या तो अद्बुत देखावा .. दोन देह परी एकची आत्मा..स्पंदने सांगती स्पंदनाना ..भारावली सृष्टी .. स्तब्ध दश-दिशा..जडावले श्वास ..मिठी किंचित सैलावली .. विश्वासाची वचने नयनातून समजली..नाजूक वेल ती जणू वृक्षाला बिलगली.. .

लावणी: शिटी मारून

पाषाणभेद ·
काव्यरस
लावणी: शिटी मारून
{{{रंग माझा गोरा मदनाला दावतोय तोरा रती मी सुंदर आहे मदभरली अप्सरा नका जवळ येवू नका ओळख दाखवू मी नार नखर्‍याची होईल पाणउतारा }}} (चाल सुरू) भरल्या बाजारी गर्दी जमली अहो भरल्या बाजारी गर्दी जमली तिथं शिटी तुम्ही का मारता? अहो पाव्हनं शिटी मारून शिटी मारून येड्यावानी काय करता? ||धृ|| कोरस: शिटी मारून, हातवारे करून येड्यावानी काय करता? हो दाजी शिटी मारून येड्यावानी काय करता?

स्वप्नांस बाप आहे .!

५० फक्त ·
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे ) अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे.. स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा.. रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे. झाला सराव आता, बांबूस सारण्याचा.. स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा.. बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा.. गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना. झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा.. त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे. स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा.. नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी. आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत