Skip to main content

शृंगार

एक सुंदर अरबी गाणे : यावर मराठी काव्य रचा...

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 19/04/2012 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक सुंदर अरबी गाणे.... एक सुंदर तरुणी घराच्या दरवाज्यात उभी राहून तिने केलेल्या कोणत्याश्या गावच्या प्रवासाची आठवण सांगत्ये आहे .... त्या गावातील आबाल -वृद्ध तिच्या मोहक सौदर्यावर लुब्ध झालेले दिसतात... एक लहानसा मुलगा तिच्या येण्याच्या वाटेवर तिला देण्यासाठी एक सूर्यमुखीचे फूल घेऊन उभा असतो, तर एक वृद्ध फळविक्या तिला मोफत फळ देण्यात धन्यता मानतो... ती त्या गावाच्या गल्ल्या-बोळातून फिरताना तिच्या पायातला दागिना हरवतो, आणि तो ज्याला सापडला, त्या तरूणाकडे बघून ती गोडशी हसते....
काव्यरस

शब्द शब्द गुम्फावेत असे

लेखक वडा खालचा वडा यांनी गुरुवार, 19/04/2012 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द शब्द गुम्फावेत असे वेणीत ओवतात गजरा जसे | भावनिक हृदयाची साद असते माऊ तेव्हाच मन "कविता" करून लागते गाऊ ||१|| मोरया .....
काव्यरस

मी निघालो हो कळफलक घेऊन..

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 18/04/2012 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी निघालो हो कळफलक घेऊन हो रस्त्यावर हो मार्गावर ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. देवालाच माहिती नक्की कोणती कविता होती जे न देखे मध्ये भावानुवाद करून घेतला एक संस्थळ आले मी काथ्या पण कुटून घेतला.. त्या संस्थळावर मला ती भेटली तिला पाहून माझी सटकली तिच्या कवितेत लैला दिसली मी मजनू बनून आलो रसग्रहण करून आलो सगळ्या निंदा आणि नालस्त्या मी फाट्यावरती मारून आलो ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. मग एकदा संपादक आला धाग्यावरती काठ मारून गेला काय माहिती कोण होता मला मात्र कंपूबाज वाटला मी अन्यायाला वाचा फोडली अजून एक जिलबी पाडली जिलबीने पुन्हा युद्ध पेटली ओ काही संस्थळ आली..
काव्यरस

तुझी म्हातारी मेली तर मी काय करू..

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 11/04/2012 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा :- मला झालेला 'डायरीया'. मी तर रस्त्याने बोंबलत हिंडत होतो मी तर भेळपुरी खात होतो मी तर पोरीला गंडवत होतो बोंबलत हिंडत होतो, भेळपुरी खात होतो पोरीला गंडवत होतो तुला मिर्ची लागली तर मी काय करू.. मी तर उकीरडे फुंकत होते मी तर रवंथ करत होते मी तर डोळे मारत होते उकीरडे फुंकत होते, रवंथ करत होते डोळे मारत होते तुला मिर्ची लागली तर मी काय करू . आग लागो सार्‍या दुनीयेला, गेम टाकणार तुझ्यावर प्रेमदिवाणा..

गर्द नजरेची नार..

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 10/04/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द नजरेची नार जणु चांदण्याची धार होता पैंजणांचा वार सार डोलतं शिवार कधी उसळता ज्वार कधी बावरी ती खार चिंब मोगर्‍यांचे हार हसु तिचं वाहणारं उंच उडणारी घार जशी तेज तलवार करी नजरांचे भार एका नजरेत गार गर्द नजरेची नार काय शब्द बोलणारं तिच्या नजरेतं सारं माझ्या मनातलं सार
काव्यरस

ए सुमनांचे राणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 06/04/2012 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
ए सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू तुझे स्मितहास्य, कहर जाहले न मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी कटाक्षांचे मिलन, कहर जाहले तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज मला ऐकविणे, कहर जाहले कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते कधी चालतांना, बिथरणे, उसळणे हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे उतरून चढविणे, कहर जाहले ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी तुझे धुंद होणे, कहर जाहले ह्या गाण्यातली बहार अनुभवलेल्यांना गीतकार ओळखता यावा नाही का!
काव्यरस

तुझ्या प्रेमात सजणा

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 04/04/2012 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ असूनही तुझ्यापासून मी खूप दूर आहे राहवत ना मुळी म्हणून ऐकवते हा सल आहे तुझ्या प्रेमात सजणा, झाले मन हे किती बेज़ार कोणी पाहो वा ना पाहो ईश्वर पाहतो आहे अंतरी तुझी मूर्ती स्थापित, झाली जेव्हापासून आहे शप्पथ एकही रात्र न मला, झोप लागली फार आहे हवा हवासा दर्द आहे, निश्वासही माझा सर्द आहे, चेहराही माझा जर्द आहे, न कळे कुठला रंग रंगवे तुझी पाहणे वाट तूच माझा जीव आहेस, तू ची आहेस प्राणही मला मिळावास तू, हीच मनात एकची आसही संगतीस तू साथ हो, काही मना-मनाची बात हो, गुजगोष्टी दिलखुलास हो, गाणीही गावी प्रेमाची छेडावी मनची तार ओवाळीन मी जीव तुझ्यावर, भग्न हृदय हे सांध तू नजरांमधला दूर दुरावा नजर
काव्यरस

ए माझे संजीवनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 30/03/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा ते कटाक्ष, ती चपळाई अन् जी तुझ्यात असे, नसे कुठे ती कला मनास मोहवी जी तुझ्यात असे, नसे कुठे मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा तू मधुर जे बोल बोलशी हसून जराही सुंदरी तर अजूनही स्पंदने नशेत धुंद रंगती ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले, अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी. अर्थातच हे गीत माझे नाही. हा आविष्कार मात्र माझाच आहे.
काव्यरस

अल्लखकरण

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 30/03/2012 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
अल्लखकरण मी तुला पाहताच मनोमन बद्धरुपांतरण| रोजच ते अनुभववावे तव धन्यमरण|| ती आज आली घेऊन गुलमोहतरण| मला देतेसे चषक तेच अल्लखकरण|| अजूनी ते येतातच पाहताच झल्लकसरण| तसे पाहता नजरेचे हे विक्षेपसंक्रमण|| शब्दांचे असे कसे सदैव कर्षित्रचर्वण| एकटाभयाण विचार ते बिंबाणुश्रवण||

<उगा मारखा>

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 29/03/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: मित्रवर्य अन्या दातार यांची हीनि कविता नि दुसरी अतृप्त आत्मा यांचेहे विडंबन आणि अर्थातच महिला मंडळाकडून मार खाण्याचे आमचे आजचे भविष्य. मंद बायका त्या कडाडती घरी पती गर्भगळित सदोदित । जसा वनवास करे हतोत्साही तसा सहवास जीवघेणा । दुर्लंघ्य सागर जैसे तुझे मन भलतेच पैलू दावितसे । तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट निघायची वेळ आता वेणीफणी? टीपः वास्तववादी कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, जमली नसल्यास आधुनिकोत्तर आहे असे समजावे.