मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

शब्दसावल्या

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
आलाबाई एकदाचा पाऊस तुझा,... सैरभैर एकांत माझा,.. झिंगल्या वाटेत सयी सावळ्या- थेंबाथेंबात डोलु लागल्या बाहुल्या श्वास रुंदावले गोत नादावले पावलो पावली चाहुली पावल्या,.. साचलेले तळे जाहले मोकळे- अंगणी सांडल्या मुक्त शब्दसावल्या ...............अज्ञात

प्रदेश

पेशवा ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझे हात नाग गळ्याभोवताली सुर-केवड्याचे रान बहरून आले देहवाटेवरी मिठीचा चकवा हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे सुखाचा बसे काळजास दंश शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे विष-वादळानंतर उरे दगडदेह अन मन पिसापरी तरंगणारे चांदणे रमावे असा हा प्रदेश स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे -पुर्वप्रकाशित

हट्ट!

चैतन्य दीक्षित ·
लेखनविषय:
काव्यरस
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी | आणि हासुनी ओळखशी तू, देउन जाशी हवे तसे मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे | 'थांब थांब तू, नकोस जाऊ' सांगावेसे तुज वाटे, त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे | म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात | असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार 'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार | हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया, थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया? -चैतन्य दीक्षित

निर्माल्य

मंदार दिलीप जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
आज माझ्या डायरीत केविलवाणं झालेलं एक गुलाबाचं फूल सापडलं.. तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं आता बरचसं हिरमुसलेलं डायरीच्या त्याच दोन पानांवर दिसले आठवणींच्या शिंतोड्यांसारखे उमटलेले गुलाबी ठिपके खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या नेहमीच्याच गुलमोहराने रात्री सावल्यांचे भेसूर आकार नाचवावेत तसे... आपल्या आठवणींच्या जणू तशाच सावल्या झाल्या आहेत आणि नातंही त्या गुलाबासारखं.... वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं, कालच्या पूजेची अस्पष्ट आठवण करुन देणारं! - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

'उरा'तली सर!

मेघवेडा ·
लेखनविषय:
काव्यरस
नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. :) परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर!

आता तू येशील....

अज्ञात ·
लेखनविषय:
काव्यरस
आता तू येशील...हळूच गालात हसशील उगाच "फुरंगटून" मग शेजारी बसशील लडिवाळ रागवताना पाठमोरी बसशील हळूच चाफा माळताना अलगद लाजशील बराच वेळ शब्दांविना खूप काही बोलशील जमिनीकडे पाहता पाहता एकटीच हसशील गार वारा तुझ्या कुंतलाशी झुलेल उडणार्‍या बटांमध्ये जीव माझा भूलेल हातात हात गुंफताना नशीब जुळवू पाहशील गुंतलेल्या रेषात मग आयुष्य शोधशील बोलके तुझे डोळे जेव्हा माझ्या डोळा भिडतील चटकन लहानाची... मोठी मग होशील वास्तवाची जाण होता हात अलगद सोडवशील मग चेहरा लपवता लपवता डोळे ओलावशील बराच वेळ शांत बसून हळूच हसशील लाजर्‍या डोळ्यांनी मग निरोप माझा घेशील पाठमोरी सुद्धा मग किती छान दिसशील हाय...

तीट!

चैतन्य दीक्षित ·
लेखनविषय:
काव्यरस
तनुवेलीवर यौवन फुलले, पाहुनिया तुज हे जग भुलले, हरले! सगळे प्रयत्न हरले ! सांभाळावे कसे मनाला? सांग तूच गे मला, शिकावी कुठे कलंदर कला ? नुकती सरली वर्षे सोळा ज्वानीचा ह्या नूर निराळा... भाव कसा मग असेल भोळा? नजरेच्या एका घावातच जीव जाहला खुळा ॥ सावळकांती, आखिव बांधा, चालीमधला झोक न साधा, मदनालाही होइल बाधा तुला पाहता, श्वास आतला आतच गं थांबला ॥ पदराआडुन हसते काही, बघणार्‍या मग भानच नाही, तुझाच तो होउनिया राही संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥ मनी तुझ्या जे काही दडले, ओठ सांगताना अवघडले, ते न इथे कोणाला कळले. ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥ - चैतन्य दीक्षित

उशीर

डॉ अशोक कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
उशीर ती ही समीप होती, पुनवेस चांद राती अन बात छेडण्याची फक्त देर होती नक्षत्र पाहतांना थोडीच रेलली ती आधार द्यावयाची फक्त देर होती ठावे मलाही होते, अनभिदन्य ती ही नव्हती शब्दात सांगण्याची फक्त देर होती आतूर भावनाही येऊन दाविते ती डोळ्यात वाचण्याची फक्त देर होती तीसरे कुणीही नव्हते, दोघात रात्र होती वाटून घ्यावयाची फक्त देर होती गेल्या अशाच रात्री, कां दूर राहते ती सर्वांस कारणे ही, फक्त देर होती --अशोक

पागोळी

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
घन; वेस ओलांडून आला सोनियाचा सण धुळवड आकाशात ऊर घगर भरून झरे रेशमाचं पोत सारे दारूण झाकून रोमरोम शहारून गाई अंकुरात धून थेंब थेंब फुटे वाळा वारा शकून पिऊन झिंग ओलेत्या मेघाची सय सय उधाणून सरे चातकाचे ऋण मोर माना उंचावून भिजलेल्या अंगणात मन पागोळी होऊन .........................अज्ञात

रत्नांच्या बघ राशी झाल्या..

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
रत्नांच्या बघ राशी झाल्या, माझ्या काचखड्यांच्या काटे भरल्या वाट होती , मखमल पायघड्यांच्या ओले हिरवे झाले माझे, मौसम निष्पर्णाचे निळे जांभळे फ़ूल श्रावणी, देही गोकर्णाचे तुझ्यासोबती वाटा सार्‍या, यमनामधले गाणे घमघमणार्‍या सुरावटींशी, नाते लोभसवाणे रोमरोमी भिजते मीही, हळवा श्रावण दे ओघळते मी प्राजक्तासम, भिजलं अंगण दे उधाणू दे ना सागरलाटा, तुझ्या किनार्‍यावरी तुझी पौर्णिमा होऊन आले, तुझ्याच मी अंबरी -प्राजु