Skip to main content

हं ! ते तुला कधी जमणारच नाही

लेखक गणेशा यांनी बुधवार, 29/04/2015 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे मुळ कविता : तू ये... अरे द्यायचेच असेल तर दे आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात हं ! ते तुला कधी जमणारच नाही तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती अरे गायचेच असेल तर गा ते स्वर बंदिशी मिलनाचे... हं ! ते तुला कधी जमणारच नाही हळव्या कोपर्‍याचे .. असेच हे हळवेच गाणे अर्थ न पुसता फक्त याचे ओझेच वाहने वाह्यचेच असेन फुल तरी समर्पणाचे भाव वाह तु हं ! ते तुला कधी जमणारच नाही न ला एक काना , ह ला दुसरी वेलांटी हे ही बोलण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही तु दास भावनांचा .. ओंजळीत भीक वाही द्यायचेच असेल तर दे ललाटी चांदण्यांचे गोंदन हं ! ते तुला कधी जमणारच नाही --- शब्दमेघ ( २९/०४/२०१५)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3940
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मल्हारबारी मोतियाने द्यावी भरून… न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून … ची आठवण झाली. इथे देवाकडे शाहीर लटक्या रागाने मागणे मागतो की, द्यायचेच असेल तर बारी मोत्याने ओतप्रोत भरून दे , अथवा (तुला (देवाला) हे कधी जमणारच नसेल) तर मी (शाहीर) काही दर्शनाला येणार नाही.

छान लिहिली कविता गणेशा. एका खरडवहीतील (की प्रतिसादातील ते आठवत नाही) "तू ये, तुला फुकट देईन" ही ओळ उचलून, निव्वळ टैम्पास करण्याच्या उद्देशाने जमवलेली यमके इतक्या सुंदर कवितेची प्रेरणा ठरतील असे वाटल नव्हते.

In reply to by सतिश गावडे

सर्वांचे आभार ! धन्या, वल्ली नंतर आता मी ही तुझ्या कवितेंचा चाहता झालो आहे... काल तुझ्या जुन्या कविता वाचल्या मस्त आहेत, रिप्लाय केले नाही, नाहि तर तुझ्या कविता सगळ्या वर आल्या असत्या :)

सुंदर आहे ही कविता. गणेशास कविता करण्यास प्रवृत्त करणार्‍या सर्वांचे आभार.

मस्त मस्त मस्त. वाचताक्षणीच आवडली. तुम्ही लिहीत रहा गणेशराव, थांबू नका. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कविता तशी साधीच आहे, आणि मुळ कल्पना तर धन्याची आहे. तरीही आपली प्रतिक्रिया कव्बितेला आली की अतिशय छान वाटते.. कारण माहीत नाही कदाचीत खुप जुने कविता वाचक आहात म्हनुन वाटत असेन मनापासुन धन्यवाद.. सर्वांचे आभार

खूप मिस केले हे सर्व इतके दिवस. आज वेळ मिळला , जुने पुस्तक पुन्हा वाचायला :)