मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुरुशाचे अस्तित्व...!

संदीप डांगे · · जे न देखे रवी...
एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या. कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय पुरुषांचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरखंडाने बांधलंय त्याला. या दोरखंडातुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक पुरुष जेव्हा लहान कोंब असतो, तेव्हा आईच्या पोटातच त्याला इंजिनेर, डॉक्टर होण्याचे फर्मान सोडले जाते. कसा तरी करत जन्म घेतलाच त्याने, तर आई-बापाची स्वप्ने पुरी करायच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना हवी असलेली मुलगी पुढ्यात आणून टाकली जाते. आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय. स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारी नवरी मुलगीही "आईवडिल म्हणतील तसं नाहीच" म्हणुन नवऱ्याचे सँडविच बनवून टाकते. अशावेळी कोण घेईल पुढाकार पुरुषाला वाचवण्याचा? लग्नानंतर पुरुषाला पतीचा दर्जा मिळतो, तरी तो फक्त सतत पैसे देणारं एटीएम बनुन जातो. त्याचा दर्जा फक्त तो किती पैसे कमावतो यावरच ठरतो. प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो. पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत? रांधून वाढून कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल स्त्रियांचं एक कर्तव्य असतं. प्रत्येक वेळी स्त्रीकडुन पुरुषांच्या मनाची घालमेहल केली जाते. शब्दरुपी तलवारीने त्याचे नाजुक मन घायाळ केले जाते. पण हेही लक्षात ठेवा की ,पुरुष ही 'सहनशक्ती' आहे. मनाने घायाळ झालेला पुरुष हा उसळलेल्या समुद्रासारखा असतो . त्याच्या हातातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही. कारण तो जरी सहनशक्ती ची मुर्ती असला तरी क्रोधाच्या बाबतीत जमदग्नी देखिल आहे. म्हणुन पुरूषांचा सन्मान करा. व दुसर्यांनाही शिकवा. तरंच स्त्रीचेही अस्तित्व अबाधित राहीन. जय (लिंगभेदरहित समान आदर असावा असा) महाराष्ट्र!

वाचने 7982 वाचनखूण प्रतिक्रिया 34
तरंच स्त्रीचेही अस्तित्व अबाधित राहीन.
ह्या ओळीतल्या गंडलेल्या व्याकरणासकट विडंबन केल्याबद्दल पुढच्या कट्ट्याला तुम्हाला एक मस्तानी!! ;)

तिमा 13/04/2015 - 19:53
तुम्ही बाबूजींची गाणी ऐकली नाहेत वाटतं! म्हणून 'पुरुशाचे' असे लिहिताय. आणि एखादे ठिकाणी 'चा' च्या ऐवजी 'झा' तर लिहिलं नाहीयेना ?

In reply to by तिमा

संदीप डांगे 13/04/2015 - 20:02
अहो विडंबन आहे हे. मूळ कवितेत सुद्दलेकनाच्या जितक्या चुका आहेत त्या कायम ठेवन्याचा परयत्न आहे. बाकी बाबूजींची गाणी न ऐकलेला कुणी मराठी मिपावरच काय धरतीवर तरी असेल काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्रुप्त आत्मा 14/04/2015 - 12:05
चिमणरावांशी शमत हाय! दुत्त दुत्त आ..नंन्दिता.. तुच का नै टाकत येकादी जिल्बी - नागिनींचे हस्तित्व म्हनून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif

तिमा 13/04/2015 - 20:35
प्रतिक्रियेचं पण विडंबन आहे.

In reply to by तिमा

संदीप डांगे 13/04/2015 - 23:38
ओके ओके. बर्‍याचदा आमची टुपलाईट पेटतच नाय...

In reply to by संदीप डांगे

श्रीरंग_जोशी 13/04/2015 - 23:43
बल लावाना भाऊ मंग. आमचीबी टुपलाइट नाही पेटायची म्हनून बल वापरण सुरू केलं. बाकी इडंबन झक्कास हाये.

In reply to by खटपट्या

अत्रुप्त आत्मा 14/04/2015 - 08:33
@पियुशातैंचं आडनाव नगरकर हाये का ?>>> आंsssssss पियुशा नै! :-/ जिल्बुषाhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gifम्हणा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif त्ये पां डुब्बा नी क्येल्येलं बारसं हाय! ;)

कहर 14/04/2015 - 09:32
मस्त … फक्त एक सुधारणा सुचवायची आहे
बोझाखाली कोमेजुन टाकले जाते
'कोमेजून टाकले' हे खूप मुळमुळीत वाटते. 'कुचल्ले' हा शब्द फर्मास फाईंड आहे. तो वापरल्यास काहीतरी अजून 'अबाधित' राहील (बादवे तो कोणत्या भाषेतून आला यावर R & D चालू आहे )

नाखु 14/04/2015 - 09:50
मा मो ऑन "छान लिहीलेस हो "संदीपा", यांची दु:खे तरी कुठे मांडायची बिचारे मनातल्या मनात कुढायचे,आज ह्यांनी चांगले दोन वाट्या शिकरण खाल्ले आणि गुमान घास्लेली भंडी जागेवर लावली (आजकाल लाटणे दिसेल असेच जवळ ठेवते मी) बाकींच्या कुज्कट टोमण्यांकडे लक्ष नको देऊ, तू मटार सोल तोपर्यंत मी हो.मी.सू.या. पहाते" मा मो ऑफ

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 14/04/2015 - 12:42
तुला मी (माई) माहीत नाही ! फुक्कट्चा मिपाजन्म रे तुझा.मी यांना कुठेच तोंड उघडायची संधीच देत नाही (उगाच चावट विचार नको आणूस मनात) माझ्या भीतीने ते प्रतीसाद पण माझ्याआडून्च देत आलेत हो पाहिजे तर गुर्जी भावजींना विचार! सांगतील सगळं सवीस्तर मामो ऑफ