गाणे : असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती

लेखनविषय:
काव्यरस
मी मराठी वरच्या "गाण्याच्या-यशामधले-संगीत-संयोजकाचे-योगदान" या धाग्यावरून मला खालील गाणे करता आले. ( हे गीत येथे देतांना त्याची लिंक संकेतस्थळ अ‍ॅक्सेस होत नसल्याने देवू शकत नाही.

एकदा होवोनी पक्षी

लेखनविषय:
काव्यरस
एकदा होवोनी पक्षी
वाटे एकदा होवोनी पक्षी पहावी शेते डोंगर नद्यांची नक्षी उंचच उंच जावे वरती वरती अलगद उतरावे धरणीवरती हळूच आपले पंख पसरूनी घास शोधावा हिरव्या रानी शोधावा पाणवठा निर्मळ शितल प्यावे पाणी थंडगार नितळ मध्येच एखाद्या झाडावर थांबावे विश्रांती घ्यावी पंख झाडावे चोचीने फळ एखादे तोडावे मनात येईल तेव्हा उडावे दिवसभर असेच फिरावे सायंकाळी पुन्हा माघारी यावे घरचे सारे पुन्हा भेटावे काय घडले दिवसभरात ते सांगावे - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०७/२०१०

बीज...

लेखनविषय:
काव्यरस
भिजलो असा सचैल, मी पावसात पुढच्या, या आजच्या उन्हाचे, मज तकदीर ज्ञात आहे. जाळो कितीक मजला, हे वणव्यातले निखारे, अन देवो कितीक नियती, रक्तातले इषारे, नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे. फिरल्या नभी ग्रहांच्या, वक्रीच आज छाया , अन झाल्या फितुर दैवा, माझ्याच हस्तरेषा, आवळीन मी तयांचा, जीव मनगटात आहे. जगतो असा सदैव, स्वप्नात त्या उद्याच्या, अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या, मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे.

गाणे : पायी चालतोया पंढरीची वारी

लेखनविषय:
काव्यरस
पायी चालतोया पंढरीची वारी चाल: एखाद्या अभंगाची (तेथे ऐका: http://www.youtube.com/watch?v=9wwsu4VyoPM ) पायी चालतोया पंढरीची वारी वारी...वारी.... पायी चालतोया पंढरीची वारी मुखी बोलतोया पांडूरंग हरी पांडूरंग हरी हरी...पांडूरंग हरी पायी चालतोया पंढरीची वारी ||धृ|| संत सज्जन सगळे, नाचती गाती मेळा भरवीती सारखे चालती कुणी छेडूनी विणा, टाळ हाती धरी पायी चालतोया पंढरीची वारी ||१|| तुळशीचे घेतले रोप डोई माऊलीने अनवाणी पायात केले घर काट्याने व्यर्थ नाही चिंता मन नाही संसारी पायी चालतोया पंढरीची वारी ||२|| टाळ मृदूंगा

शेतकरी गीत: शेतात पेरणीची चल झाली आता वेळ

लेखनविषय:
काव्यरस
शेतकरी गीत: शेतात पेरणीची चल झाली आता वेळ
अग कारभारणी आता घाई कर चल शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||धृ|| पावसानं केली घाई शिवारात आला मोठा काळ्या रानी आला तो घेवूनी हिरव्या वाटा रान आता हिरवील, रान आता फुलवील शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||१|| भुईमुग, तूर, मठ, उडीद अन मुग पिकं लावणी करू आता बाजरी पेरू या मग पांभर धरतो मी अन तू मागं ये धरून ओळ शेतात पेरणीची चल झाली आता वेळ

बालकविता - मोठ्यांचे ऐका

लेखनविषय:
काव्यरस
एक होती मासोळी, सुळसुळ पोहतसे जळी चमचम मऊ पोट करी,वर्ख मिरवे सोनेरी ||१|| आई तिची सांगे तिला,जपून नेहमी रहायाला जळात असे गळ टाकूनी,दुष्ट माणूस किनार्‍यावरी ||२|| मासोळी होती उचापती,भारी होती करामती तमा आईच्या बोलांची,नसे करीतसे कधीच ती ||३|| शिंपल्यातल्या मोत्यांशी, इतर सुंदर माशांशी लव्हाळांशी बेडकांशी, मस्ती करावी मनमुरादशी ||४|| सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी ऐकावे आईने धपाटले तर्,मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५|| मग एका काळ्या दिवशी, जाळ्यात सापडे मासोळी कोळी तिला पकडून न्याहाळी, त्यालाही मग दया येई ||६|| इतकी सुंदर जलराणीसम, मासोळी ही सोनेरी जर दिला नजराणा मी राजाला,मिळेल भरपूर द्रव्य मजला

भूल

लेखनविषय:
काव्यरस
सारेच सुटलेत, हे पाहिल्यावर दिवसभराचा कंटाळा काढून टाकताना हे काही तरी होत गेलं... नंतर कळलं, कविता झाली. नात्यातील प्रश्नांचे कंगोरे एकेक करून उकलून घेताना, काही सिद्धांत ती मांडायची, अन् नेमकी विरुद्ध मूल्ये माझी समीकरणाची मांडणी करून, प्रमेयांची भूल विरून जाताना, सारीच गणिते सोडवायची, असे एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो उभयान्वयी अर्थांचे सूत्र चालवत आपले गणित सोडवून ती गेली, मी मात्र झोके खात राहिलो शब्दांच्या जाती आणि संख्यांच्या किंमतीत

गीत: कधी कधी खोटं बोलाया लागते

लेखनविषय:
कधी कधी खोटं बोलाया लागते
कधी काम करतांना, कधी काम सांगतांना तुमची आमची कसोटी खरोखर लागते लोकहो तुम्हां खरखरं सांगतो, तेव्हां कधी कधी खोटं बोलाया लागते ||धृ|| लहाणपणीचे साधे उदाहरण तुम्ही घ्याना शिक्षक सांगती अमूक तमूक गृहपाठ करूनी आणा न केला अभ्यास तर तुम्ही काय देता उत्तर? ठावूक असे गुरूजनांना त्याचे कारण तरीही शिक्षा मिळे तुम्हांला ओल्या छडीची खोटे बोलणे तेव्हा आपसूक येई तुमच्या ओठी असलेच खोटे खोटे बोलणे तेव्हापासून सुरू होते म्हणून तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||१|| मोठे

आपली व्यक्तिपूजा

लेखनविषय:
काव्यरस
एका आवडलेल्या कवितेचा भावानुवाद .. आपली व्यक्तिपूजा तुम्ही आम्ही, या देशातील व्यक्ति-पुजारी आम जनता केवळ व्यक्तीरूप मूर्ति शोधतो .. घडवतो. .. वंदण्याकरता पूजेकरता .. हार घालण्याकरता .. आरत्या करण्याकरता .. मैदानातल्या मांडवात स्थापना करण्याकरता ..

गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका

काव्यरस
गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका सिच्यूएशन: हिरो एक सीआयडी ऑफीसर. टास्क (मोहीम): एका गुंडाचा पत्ता काढायचा. हिरोने मग भंगारवाल्याचे रूप घेतले आहे. गाणे सुरू....
Subscribe to शांतरस