Skip to main content

शेतकरी गीत: शेतात पेरणीची चल झाली आता वेळ

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 26/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीत: शेतात पेरणीची चल झाली आता वेळ
अग कारभारणी आता घाई कर चल शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||धृ|| पावसानं केली घाई शिवारात आला मोठा काळ्या रानी आला तो घेवूनी हिरव्या वाटा रान आता हिरवील, रान आता फुलवील शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||१|| भुईमुग, तूर, मठ, उडीद अन मुग पिकं लावणी करू आता बाजरी पेरू या मग पांभर धरतो मी अन तू मागं ये धरून ओळ शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||२|| नागली, नाचणी, खुराचणीचं आंतरपीक घेवू ज्वारी, सुर्यफूल, गहू, हरबरा; रब्बी हंगामात ठेवू तू म्हणतेस तर करू एकदोन पोते तांदूळ शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||३|| विहीरीला पानी उतरलं चार परस खोल द्राक्ष डाळींबाच्या नादी नको, जमीन आहे पाणथळ निंदणी खुरपणी करून घेवू काढण्या हरळी अन लव्हाळ शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||४|| कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी करू आपण भाजीसाठी गिलके, काकडी, वाल पापडी लावूया तूझ्या हौसेसाठी न्याहारी कर लवकर बघ पहाटेची झाली सकाळ शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||५|| खरीपाची जोडणी केली, पैका येईल बक्कळ देवाजीला विनंती केली, जावूदे सारा दुष्काळ सारं काही त्याच्या हाती आपण निमित्त केवळ शेतात पेरणीची चल झाली आता वेळ ||६|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २६/०६/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1759
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया