अरे देवा मी काही सुखी नाही

लेखनविषय:
अरे देवा मी काही सुखी नाही
नवरा आहे मुलं आहेत घरदार भरलेलं आहे तरीही मन रमत नाही अरे देवा मी काही सुखी नाही || अंधेरीला प्लॅट आहे पाली हिलला बंगला आहे सजवलेला एसी बेडरूम आहे वॉटरबेडशिवाय मला झोप येतच नाही अरे देवा मी काही सुखी नाही || नोकर आहे चाकर आहे स्वयंपाकासाठी मावशी आहे नावाला भाजीची फोडणी मी देई अरे देवा मी काही सुखी नाही || टिव्ही आहे डिव्हीडी आहे झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे तरीही करमणूक कशी नाही अरे देवा मी काही सुखी नाही

नव्या वर्षाची गुढी उभारू चला

लेखनविषय:
काव्यरस
नव्या वर्षाची गुढी उभारू चला
फाल्गून सरला चैत्री पाडवा आला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||धृ|| नऊवार साडी चौरंगी खण काठी धुवून टाका बांधून लिंबाचा पाला हारकड्याने सजवू धजवू तिला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||१|| शुभमुहूर्त असे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शुभ काळ असे नव्या कार्यरंभाचा पाने आंब्याची फुले झेंडूची घेवून तोरण लावू दाराला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||२|| धरती नटली चैत्रपालवी घरात सजली गृहलक्ष्मी विसरा १ जानेवारीच्या वेड्या जल्लोशाला सण मराठी वर्षारंभाचा

पाऊस आला

लेखनविषय:
काव्यरस
पाऊस आला
पाऊस आला पाऊस आला पडू लागल्या धारा थेंबांच्या नक्षीला साथ द्याया धावे अवखळ वारा || अलगद हलक्या सरी येवूनी सुरू होतसे वर्षाव वेग वाढूनी जोर येतसे धारेला नसतो ठाव क्षणात ओली होई धरती पडता असंख्य धारा ||१|| नभातून तुषारांचे पडती बारीक बारीक थेंब धरती होईल हिरवी अवघी लेवूनी हिरवे कोंब हिरवाईची किमया होईल निसर्ग बदलेल सारा ||२|| - पाषाणभेद १७/०७/२०१०

अरूपाचे रूप

लेखनविषय:
काव्यरस
अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप पाहता तद्रूप | जीव होई भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी उभा जगजेठी | पंढरीत दीनांचा कैवारी | सावळा मुरारी संकटात तारी | पांडुरंग भाव तेथे देव | नांदतो सदैव कैवल्याची ठेव | अंतरात मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

..पाउस

लेखनविषय:
काव्यरस
आलाय पाउस ...चिंब भिजून घे तळहातावर थेंबांचा स्पर्श.......मनात साठवून घे.. थेंबांची सरसर,थेंबांचा नाद...कानामध्ये साठवून घे पाउस आलाय ... भिजून घे ओल्या ओल्या मातीचा गहिरा गंध....तुझा आहे पानांचा ओला ओला हिरवा रंग.... तुझा आहे चेहऱ्यावर पडणारा प्रत्येक थेंब.....तुझ्यासाठी आहे आला आहे पाउस..भिजून घे ढगांचही मन भरून आलय...... तुझ्यासारखं मनातल्या मनात...त्याच गहिवरण समजून घे... आला आहे पाउस...भिजून घे.. ओले कपडे..ओले केस... ओला तळवा.... आणि ओल चिंब मन.. ..बाकी सगळा पाउस तसाच अंगावर सुकव.. ...पण मन तसाच ठेव...अगदी ओल चिंब... ...भिजलेल मन ... मनातला पाउस.... मनभर साठवून घे... .......

तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

लेखनविषय:
काव्यरस
चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आटवतय तुला शेतान भात लावताना तिरप्या डोल्यांनी म्हटलवत 'धीन ताना धीन ताना' कालजान गीटार वाजलवत चार दीस झोपलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय खारीवर आल्तीस दुपारची लाजत होतीस पापनीचे पल्याडशी 'मुजे रंग दे, मुजे रंग दे' बोलत होतीस त्यादीवशी तुला रंगवताना मी दमलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय 'मै तेरीच हुं' गाताना काय तुजा आवाज होता. हरणीचे डोल्यांना पापनीचा साज होता. त्या डोल्यात बुडलो न भायेर कदी निगलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त

वारी

लेखनविषय:
काव्यरस
आले माहेरी माहेरी माझ्या विठाईच्या दारी फारा दिसांनी ग झाली माझी पंढरीची वारी वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर नव्या आठवांची घेते घेते भरून घागर आता पाय स्पर्शू किती घेऊ आशीर्वाद किती किती मातीचे ओघळ ओघळवू मी या हाती माझी पंढरीची वाट वाट सूर्याची पूर्वीची आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची गेलं माहेर माहेर झाला वळसा वळसा चंद्रभागेच्या पाण्यात माझा बुडला कळसा

किती सुखाचे असेल

लेखनविषय:
काव्यरस
नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी, हवे कशाला कणाकणाने बधीर होणे? तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी, मला न जमले मीरा होणे, कबीर होणे! असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे, क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे! स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे, किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

स्वप्नी माझ्या आलीस तू

काव्यरस
स्वप्नी माझ्या आलीस तू
स्वप्नी माझ्या आलीस तू हळूच हसून लाजलीस तू कितीक दिसांनी झोप आली मला जागेपणी विसरलो जगाला न दिसे दुसरे काही दिसशी मजला तू रात्र माझी धुंदीत आली वेड्या मनाला समाजावून गेली स्वप्नाच्या वाटेने जातांना वाटेत भेटलीस तू होईल माझे स्वप्न का खरे भेटून सगळे सांग मला बरे विसरू नको आता काही प्रितीचे शब्द बोल तू - पाषाणभेद (दगडफोड्या) १४/०७/२०१०

जीवन-मृत्यू!

लेखनविषय:
ही कल्पना बरीच आधी सुचली होती.. पण शब्द सापडत नव्हतेत.. यशोधरातैंचा ये परतीचा वारा... हा लेख वाचून शब्द आपोआप स्फुरायला लागलेत.. म्हणून ही कविता त्यांचीच!
Subscribe to शांतरस