मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

ब्रिटिश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आटवतय तुला शेतान भात लावताना तिरप्या डोल्यांनी म्हटलवत 'धीन ताना धीन ताना' कालजान गीटार वाजलवत चार दीस झोपलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय खारीवर आल्तीस दुपारची लाजत होतीस पापनीचे पल्याडशी 'मुजे रंग दे, मुजे रंग दे' बोलत होतीस त्यादीवशी तुला रंगवताना मी दमलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय 'मै तेरीच हुं' गाताना काय तुजा आवाज होता. हरणीचे डोल्यांना पापनीचा साज होता. त्या डोल्यात बुडलो न भायेर कदी निगलोच नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय चिक्कार दिस झाल बाय तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

वाचन 10238 प्रतिक्रिया 31