Skip to main content

नव्या वर्षाची गुढी उभारू चला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या वर्षाची गुढी उभारू चला
फाल्गून सरला चैत्री पाडवा आला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||धृ|| नऊवार साडी चौरंगी खण काठी धुवून टाका बांधून लिंबाचा पाला हारकड्याने सजवू धजवू तिला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||१|| शुभमुहूर्त असे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शुभ काळ असे नव्या कार्यरंभाचा पाने आंब्याची फुले झेंडूची घेवून तोरण लावू दाराला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||२|| धरती नटली चैत्रपालवी घरात सजली गृहलक्ष्मी विसरा १ जानेवारीच्या वेड्या जल्लोशाला सण मराठी वर्षारंभाचा आला नव्या वर्षाची गुढी उभारू चला ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २२/०७/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1119
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

प्रसन्न करणारी कविता सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

प्रसन्न करणारी कविता
जॉक!! :D :D _________________________________________________''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे http://www.fl