चिंब
लेखनविषय:
काव्यरस
वृक्ष जसा -
अंकुरण्या आधी
बीजस्वरूपी
अस्फुट असतो
बाण जसा-
सुटण्याच्या आधी
प्रत्यंचेवर
सज्ज राहतो
मंत्र जसा -
स्फुरण्याच्या आधी
बीजाक्षरी
निद्रिस्त राहतो
अर्थ तसा
उलगडण्या आधी
शब्दांच्या
निबिडात राहतो
ओथंबून मग
येतो अवचित
कोसळतो अन्
चिंब भिजवितो
वाचने
3749
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्त
वाह!
In reply to वाह! by राघव
क्रेक्ट!
छान कविता
घन ओथंबून येती
कविता आवडली. साधी सरळ सोपी.
In reply to कविता आवडली. साधी सरळ सोपी. by श्रीगणेशा
+१
वाह!
छान आहे.
प्रतिसाद देणार्या