मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी भाषा गौरव दिन अभंग

सागरसाथी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मीही एक वारकरी माय मराठी पंढरी, नतमस्तक होवू तेथे जेथे कवींची पायरी. करु रिंगण सोहळा खेळ शब्दांचा मांडून, शब्दसृष्टीच्या ईश्वरा तेथे करुया नमन. दिव्य सारे अलंकार सजवू आपल्या देवाला, नाचवू दिंड्या पताका गुंफू शब्दांची तुलसीमाला. आपल्या इवल्या पावलांनी चालू मोठ्यांची पायवाट, शब्दसृष्टीचे मायबाप होवो सदा कृपावंत, हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा. तुझ्या नामाचा ग टिळा लागावा माझ्या माथी, बोल माझा चिमखडा रुजू व्हावा तुझ्या गाथी. तुझ्या ऐश्वर्याचा घडा सजे महाराष्ट्राच्या मनी तुझ्या अमृताचा लाभ घेई माय मराठीचा धनी. २७/०२/२०२२ मराठी भाषा गौरव दिन

वाचने 4055 वाचनखूण प्रतिक्रिया 7

चौथा कोनाडा Mon, 02/28/2022 - 17:57
व्वा, खुप सुंदर !

&#128150

हजारो वर्षांचा सोहळा रंगतो भाषेचा हा मेळा, चालो समृद्धीच्या वाटे लाभो स्वर्गाच्या कळा.
सोहळा असाच कायम रंगत राहिल आणि समृद्धीकडे वाटचाल करून पताका फडकवेल असा ठाम विश्वास वाटतो ! व्वा सागरसाथी _/\_