म्हातार्याचे भिरभिर डोळे-
आठवणींचा भुगा भुगा
छटाक उरले खोड, पोखरी
कभिन्न काळाचा भुंगा
म्हातार्याचे वखवख डोळे-
लवथव गोलाई बघती
दारु संपला जसा फटाका
दावू न शकतो स्फोटभिती
म्हातार्याचे टपटप डोळे-
पापणीत पाऊसमेघ
जसा वळीव कोसळतो कधिही
तसा कढांचा आवेग
म्हातार्याचे विझुविझू डोळे-
पैलतिरी काऊ बघती
कोकुनी हाकारितो अहर्निश
उडून जा त्याला म्हणती
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7102
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक !
+१ पैलवान भाऊ वाचताना असेच काहीसे वाटले
In reply to रोचक ! by तुषार काळभोर
म्हातारा झाला म्हणून काय झालं.....
पूर्वी
पटले
In reply to पूर्वी by अनन्त्_यात्री
कविता उत्कृष्ट आहे. लयही आहे
In reply to पूर्वी by अनन्त्_यात्री
हं
उत्तम प्रगती !
म्हाग्रू
In reply to उत्तम प्रगती ! by प्रसाद गोडबोले
प्रगतीपुस्तक भरून दिलंत
In reply to म्हाग्रू by अनन्त्_यात्री
व्याकरणदृष्ट्या
In reply to प्रगतीपुस्तक भरून दिलंत by प्रसाद गोडबोले
"खूप", "शत्रु", "पाहुन"
In reply to व्याकरणदृष्ट्या by अनन्त्_यात्री
नमस्कार घ्या व्याकरणकार म्हाग्रू
In reply to "खूप", "शत्रु", "पाहुन" by प्रसाद गोडबोले
लोकां सांगे ब्रह्मज्ञान
In reply to नमस्कार घ्या व्याकरणकार म्हाग्रू by अनन्त्_यात्री
तुमच्या भुर्जीच्या धंद्यासाठी
In reply to लोकां सांगे ब्रह्मज्ञान by प्रसाद गोडबोले
मागणी पुरवठा
In reply to तुमच्या भुर्जीच्या धंद्यासाठी by अनन्त्_यात्री
धंदा जोरदार चालवायचाय
In reply to मागणी पुरवठा by प्रसाद गोडबोले
यात्री चिल व्हा...
In reply to धंदा जोरदार चालवायचाय by अनन्त्_यात्री
Yes संदीप
In reply to यात्री चिल व्हा... by चांदणे संदीप
उथळ पाण्याचा खळखळाट
In reply to Yes संदीप by अनन्त्_यात्री
नाहीच की !
In reply to धंदा जोरदार चालवायचाय by अनन्त्_यात्री
ह्म्म.. तुम्ही मालाडला असता?