ऐसे ऐकिले आकाशी
लेखनविषय:
काव्यरस
(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"
(२) पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला
म्हटले बिलगून जललहरीतून,
"झगमगणारे लोलक दाहक
त्वचेवरून देशील का काढून?
मावळतीवर जेव्हा तारे-
भल्या पहाटे फिक्कट होतील-
तेव्हा त्यांना तेज त्यातले
थोडे थोडे देईन वाटून"
वाचने
9004
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
निखळ काव्यानंद. अप्रतिम
In reply to निखळ काव्यानंद. अप्रतिम by चित्रगुप्त
=))))
छान.
अप्रतिम शब्दरचना!
अप्रतिम! दिन बन गया!
पिठूर केशरी चंद्रधगीने
पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीलावाह!!सुरेख!!
भारी
In reply to भारी by ज्ञानोबाचे पैजार
काय हे बुवा ?
In reply to काय हे बुवा ? by प्रसाद गोडबोले
स्वयंघोषित
In reply to स्वयंघोषित by अनन्त्_यात्री
विडंबन करायचा विषयच येत नाही
In reply to विडंबन करायचा विषयच येत नाही by प्रसाद गोडबोले
नवकवितेच्या....
In reply to नवकवितेच्या.... by अनन्त्_यात्री
छंद काव्य ही सुंदर असते,
In reply to छंद काव्य ही सुंदर असते, by ज्ञानोबाचे पैजार
वा!
In reply to स्वयंघोषित by अनन्त्_यात्री
तांब्या संप्रदायचर्णी अर्पण...
In reply to तांब्या संप्रदायचर्णी अर्पण... by चांदणे संदीप
तांब्याधिपतींच्या राखिव कुरणात आक्रमण?
In reply to तांब्याधिपतींच्या राखिव कुरणात आक्रमण? by ज्ञानोबाचे पैजार
दु दु तांब्याधिपती कोपले तर बद्दकोष्ठतेचा शाप देतील.
In reply to तांब्याधिपतींच्या राखिव कुरणात आक्रमण? by ज्ञानोबाचे पैजार
बिंधास आन दो
In reply to तांब्या संप्रदायचर्णी अर्पण... by चांदणे संदीप
ह्याह्याह्या =))))))))))))
काव्य ठीकच...पण
In reply to काव्य ठीकच...पण by चांदणे संदीप
"आपल्या" नऊमध्ये