मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन ..

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
चार शब्दांचा सहारा होत नाही तेवढ्यावरती गुजारा होत नाही खूप काही लागते जगण्यास येथे प्रेम काही ऊनवारा होत नाही गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण चांदतार्यांचा नजारा होत नाही जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन रोज आताशा इशारा होत नाही टाळले मजला बरे केलेस तूही (दु:ख दु:खावर उतारा होत नाही) मी मनाला शिस्त आहे लावलेली फारसा आता पसारा होत नाही डॉ.सुनील अहिरराव

वाचने 5016 वाचनखूण प्रतिक्रिया 20

चांदणे संदीप Wed, 12/23/2015 - 10:28
सुरेख गजल! एकेक शेर असा वजनदार, अर्थपूर्ण! क्या बात है! दिलखुश!
जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन रोज आताशा इशारा होत नाही
___/\___ कहर! Sandy

बोका-ए-आझम Wed, 12/23/2015 - 11:49
नारायण सुर्व्यांच्या माझे विद्यापीठ या कवितेतील भाकरीच्या चंद्राची आठवण झाली.

गवि Wed, 12/23/2015 - 12:34
चार शब्दांनीच येथे तो गुजारा होत नाही चार शब्दांचाच येथे तो सहारा होत नाही खूप काही लागते रे नुसत्या जगण्यास येथे प्रेम हा नुसता इथे तो ऊनवारा होत नाही गगनचुंबी शहर तुझे आहे येथे पसरले पण चांद आणि चादण्यांचा तो नजारा होत नाही जिंदगी नुसतीच येथे लुकलुके दूरातुनि रोजचा आव्हानभरला तो इशारा होत नाही मी मनाला शिकस्तीने शिस्त आहे लावली फारसा माझा आताशा तो पसारा होत नाही

drsunilahirrao Fri, 12/25/2015 - 19:57
@रातराणी, गवि, चंदने संदीप,संदीप डांगे ,सॅंडी,आत्मबंध,प्रचेतस,कविता १९७८,अनुप ढेरे, deadpool,बोका ए आझम सुमीत भातखंडे,निनाव,एक एकटा एकटाच सर्व मित्रांचे मनापासून आभार !

यशोधरा Sat, 12/26/2015 - 13:09
गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण चांदतार्‍यांचा नजारा होत नाही जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन रोज आताशा इशारा होत नाही

नावातकायआहे Sat, 12/26/2015 - 13:28
मी मनाला शिस्त आहे लावलेली फारसा आता पसारा होत नाही..... मी मनाला शिकस्तीने शिस्त आहे लावली फारसा माझा आताशा तो पसारा होत नाही डॉ नि गवि ...दंडवत!