नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी
कळेल का कधी तुला, किती तुझ्या ऋणात मी
उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा
किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी
किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी
सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी
क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी
पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी
मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी
अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी
विशाल
(२६-११-२०१५)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4131
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! आवडली!!!
मस्त! आवडली!!!
वा!
खूप छान!
अतिशय आवडले!
_/\_
_/\_
फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'
फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'
फ़क्त मतल्यात कृपया 'आंदणात'
नव्या-जुन्या किती खुणा
नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी
किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी
सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी
खुपच सुरेख अगदि मनतुन आलेलि वाटते खोलातुन
आवडली गझल...!
आवडली गझल...!
उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा
किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी
ह्य दोन ओळी खासच.....!
संपादक मंडळी, माझ्या
संपादक मंडळी, माझ्या प्रतिसादांचा काय गोंधळ झालाय बघणार का? उडवलेत तरी चालेल. फ़क्त मतल्यात 'आन्दणात' ऐवजी 'आंदणात'असा बदल करा कृपया.
वा!
वा!
आजच्या तारखेचा विशेष संदर्भ आहे का?
हो दमामि, विशेषत: शेवटचे
In reply to वा! by दमामि
हो दमामि, विशेषत: शेवटचे दोन्ही शेर २६-११ चा सन्दर्भ घेवून आलेत..
अगदी समयोचित!
In reply to हो दमामि, विशेषत: शेवटचे by विशाल कुलकर्णी
अगदी समयोचित!
मस्त गझल
खासच
क्या बात है जी!!!!!
क्या बात है जी!!!!!
धन्यवाद मंडळी _/\_
धन्यवाद मंडळी _/\_
छान आहे!
खूप कमी बोलणारी आणि बरेच काही सांगून जाणारी कविता आवडली!
झकास विकु
सुरेख झालीये गझल. एकदम कडक.
फक्त दुस-या शेरातल्या दुस-या मिस-यात जरा मीटर गडबडलय का? (का मलाच तसं वाटतंय) म्हणजे तांत्रिकदृष्ट्या दोन 'ल' चा 'ग' होऊ शकतो. पण वाचताना गाडी अडखळतीये असं मला वाटलं. असा बदल केला तर:-
किती पडाव सोडतो ईथे क्षणाक्षणात मी
गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट
गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट घेण्याची परवानगी आहे. एका गुरु च्या ऐवजी दोन लघु , वृत्त बदलत नसेल तर चालतात.
आता राहिला बदलतो च्या ऐवजी सोडतो चा वापर तर त्यामुळे शेराचा अर्थच बदलेल. ही सुट घेण्यापुर्वी मी गझलकारा क्रान्ति साडेकरांकडून खात्री करून घेतलेली आहे. धन्यवाद.
ओक्के
In reply to गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट by विशाल कुलकर्णी
.
सुन्दर शब्दरचना
सुन्दर शब्दरचना