मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी कविता

सर्वसामान्य आणि राजकारणी!

ज्योति अळवणी ·
काव्यरस
सर्वसामान्य जनता भावूक असते राजकारण्यांना ती मुभा नसते.. समोर होणारा अपघात बघूनही चाकरमानी पळतात.. लेटमार्कच्या भिती पुढे हृदय गहाण ठेवतात! त्यांच्या असहाय्यतेचे कौतुक होते... राजकारण्यांच्या उशीराचे वाभाडे निघते... हृदयशून्य... भावनाहीन... राजकारणी असतात... जणूकाही त्यांच्याकडे मनं नसतात! निवडून दिलंय तुम्हाला... तुमच्या प्रत्येक क्षणावर हक्क... कराच तुम्ही चूक... अपमानाचा चाबूक तुमच्यावर! म्हणतात ना हृदयशून्य... मग तसंच जगावं... तुमची मुलं... तुमचं कुटुंब... प्रायोरिटी कधीच नसावं.... म्हणून वाटतं माणसाने राजकारणी नसावं... किमानपक्षी राजकारणात भाऊक नसावं!!

डू-आयडीज् खूप दिसतात इथे, परतुनी येती "नाना"विध रूपे

चामुंडराय ·
डू-आयडीज् खूप दिसतात इथे परतुनी येती "नाना"विध रूपे स्कोअर सेटल होतात इथे ट्रोलिंग जणू हक्कच असे कंपू करून पीडतात इथे पिंक टाकणे हेच ध्येय असे अजेंडा घेऊन येतात इथे काडी सारून नामानिराळे कसे विवादास्पद विषय प्रिय असे धागा पेटवून मजा बघती कसे अनेकानेक आयडीज् तयार असे एक उडाला तरी चिंता नसे मतामतांचा गलबला इथे मज जैसे सज्जन थोडेच असे

नवखेच सखे फसतात इथे

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
वृत्त - तोटक अदमास पुन्हा चुकतात इथे वनवास नवे मिळतात इथे अवघे जगणे जगणे बनते मिथके सगळी जुळतात इथे रुसणे स्मरता हसणे स्फुरते अलवार सुखे कळतात इथे वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे हलकेच पुन्हा जवळीक नवी सुमने कवळी फुलतात इथे विरहास नवे सहवास हवे हळवे क्षण ते स्मरतात इथे भुतकाळ जरा विसरू म्हणता इतिहास नवे रचतात इथे © विशाल वि. कुलकर्णी

एका अनावर कैफात

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
एका अनावर कैफात लिहिली होती ती कविता नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत? मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली तेव्हा थोडी भुंडी पण थोडी खरीही वाटली ती कविता नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत? मग कापलं सपासप - वायफळ शब्दतण तेव्हा जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा जास्तच खरी वाटली ती कविता नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ? मग खोडायला गेलो दोन चार ओळी तेव्हा ओळीतल्या रिकाम्या जागेतून सण्णकन फणा काढत जिव्हारी डसली ती कविता

( पुन्हा नोटा )

गबाळ्या ·
नोटा (चाल : गे मायभू तुझे मी) नोटा अनेक असती येती तुझ्याकडे त्या मी नोट शोधतो माझी परक्याच भासती साऱ्या दूरस्थ योजना* त्या खुणवी सदा मनाला मी गुंतवित जाता बुडतात घेऊनि मजला मागावयास जाता देती कुणी न काही नोटांनी भरले पाकिट मी स्वप्नी रोज ते पाही * योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन "स्कीम"

( काल रातीला सपान पडलं )

गबाळ्या ·
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

गबाळ्या ·
प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514 अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो. बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. भू नकाशा लांघणारे चित्र आहे टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे कवळी शाबीत गळती नेत्र आहे शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे अंत ना आदि असे अजस्त्र आहे प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....

|| गुरु महिमा ||

गबाळ्या ·
आज असे हा वार गुरु महिना चालू डिसेम्बरू सप्त तारीख कॅलेंडरू लेखणी माझी झाली सुरु कित्ती विशेष हा असे दिनु सहा वर्षांतूनी आगमनु पहा अचंबूनी जाई मनू कवीस पुरेसे हे कारणु टाकुनी मागे त्या 'बुधि'या धाव धावतो हा जरीया धाव संपवी तो 'शुक्रि'या शब्द वाकवी मी लीलया एकेक दिन हा महामेरू वाटे कविता त्याची करू बसलो घेऊन मी बोरू हवा कागदा स्पॉन्सरु

नवा कवी

गबाळ्या ·
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.