मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी कविता

सगळीकडे सारखेच

चांदणे संदीप ·
लेखनविषय:
सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला मैदानावर जमल्यावरच्या गप्पा ते यूपी बिहारवाले लै भुरटे विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे दिल्ली हरयाणावाले तर आगाव एकजात सगळे माजोरडे साले गुजराती मारवाडी तर काय लुटायलाच बसलेत सारे चांगले वाटतात बाहेरून पण हे मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे आसामी बंगाली पण त्यातलेच गोड बोलून गंडा बांधणारे दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो चहा बिडीकाडी करत बोलू लागलो धुळे जळगाव खानदेशवाले अमुक हे नागपूर विदर्भवाले तमुक सांगली सोलापूरवाले साले दुष्काळी आडमुठे अर्धवट नाशिक नगरी सातारा कोल्हापूरवाले पण त्यातलेच आणि कोकणी एक नंबर चिक्कू बीड उस्मानाबादी तर मजाच गड

लेक...

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
सोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली सोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी कुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी गाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी नाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी अप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी लेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी कुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी हातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी कोण परी ही? वळता नजरा, सुख वाटावे भारी तिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे डोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी वृत्त : लवंगलता ( मात्रा : 8 8 8 4 ) © विशाल कुलकर्णी

गणपत वाणी, सतत मागणी

शिव कन्या ·
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

अपहरण

माहितगार ·
लेखनविषय:
सूत्रांनी गुणांच्या कट काय केले नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय . अपहरणकर्ते फक्त बदलत जातात अनेकदा अनुमती शिवाय , अनेकदा हातातन निसटणार्‍या अनुमतीने अपहरणांच्या घटनांचे हे आत्मचरीत्र अद्याप बाकी आहे, वाढवेन म्हणतोय उसंत मिळेल तसे तसे नव नव्या अपहरणकर्त्यांची तेवढीच सोय जुन्या अपहरणकर्त्यांना जरासा दिलासा प्रेर्ना

निरगाठ गहनाची

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
दिशा, मिति, कालगति जिथे सापेक्ष उरती तिथे स्थिर, अविनाशी शोधण्यात श्रमू किती ? कार्य-कारण नियम थिटा पडतो कशाने? निरगाठ गहनाची उकलेल का प्रज्ञेने ? अंध:कार अज्ञाताचा कधी वाट उजळेल? मृगतृष्णा जिज्ञासेची कोण, कधी शमवेल? गुंता जटिल, कठिण कधी सुटेल की नाही? जड-चैतन्यामधली सीमा धूसरून जाई

प्रेम रंग

तृप्ति २३ ·
प्रेम रंग ही कविता  प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

नव्या वादळी नाव हाकारतो

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
कुठे भेदूनि दाट अभ्रांस थोडा फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो निळी पेटती रेष रेखीत गगनी अनामिक उल्केस बोलावितो भणाणून आवर्त झोंबे शिडांसी सुकाणू दिशाहीन कैसे फिरे पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा कुणाला न ठाऊक कोठे विरे जिभा अंध:कारास फुटती हजारो तशी गाज ह्या सागराची उठे रोरावती मत्त लाटा अनादि किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा उद्याच्याच सूर्यास मी जाणतो तमाची तमा नाही आता जराही नव्या वादळी नाव हाकारतो

मातृभाषा

शिव कन्या ·
तू काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत हळूहळू लिहित जातोस, तेव्हा मी तुझे राजस हात लोभस डोळे पहात राहते. तुझ्यात इतका जीव का गुंतावा? तू माझ्या हातांचे देवनागरी चुंबन घेऊन म्हणावे, मातृभाषा कि काय तिच्यातच जीव अडकतो बघ, आई गंssss म्हटल्याशिवाय प्राणसुद्धा जात नाही.... शाईचे बोट धरुन तू परत रात्रीच्या शांतप्रहरी काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत तुझेमाझे हितगुज हळूहळू लिहित राहतोस... शिवकन्या

पुन्हा एक स्वातंत्र्यासाठी..!!

परशुराम सोंडगे ·
लेखनविषय:
***************** अजून एका स्वांतञ्यासाठी....!! ************************* मातीची महती गात. तुक्याचे अभंग घोकत. रक्ताचं पाणी करतं नुसता घाम गाळत राहूनचं रान हिरवं गार करायचं पण मातीचं तरी मोल असत का आमच्या जिण्याला तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू नाही तरी या देशाचा शेतकरीराजा अाहे असं समजून हा देश क्रषीप्रधान अाहे म्हणून नुसत्या टिरी बडवून का घ्यायच्या? शेती तंत्रज्ञान , नवीन शोध,कार्यशाळा वैगेर असे खास थाट करून भाषण छान होतील पण रान नसतात पिकत अशा क्रत्रीम अवसानाने अाणि हे समजून घ्या तज्ञाच्या मेंदूला राबवून नाही निघत घाम नि रक्ताचे ही नाही होत पाणी घ

सोनरंग

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी