नव्या वादळी नाव हाकारतो

अनन्त्_यात्री जे न देखे रवी...
कुठे भेदूनि दाट अभ्रांस थोडा फिका चंद्र क्षणमात्र तेजाळतो निळी पेटती रेष रेखीत गगनी अनामिक उल्केस बोलावितो भणाणून आवर्त झोंबे शिडांसी सुकाणू दिशाहीन कैसे फिरे पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा कुणाला न ठाऊक कोठे विरे जिभा अंध:कारास फुटती हजारो तशी गाज ह्या सागराची उठे रोरावती मत्त लाटा अनादि किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे उद्याच्या उषेचीच आता प्रतीक्षा उद्याच्याच सूर्यास मी जाणतो तमाची तमा नाही आता जराही नव्या वादळी नाव हाकारतो
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

8 टिप्पण्या 2,443 दृश्ये

Comments

खिलजि नवीन

कविता फार सुंदर झालेली आहे .. अति सुंदर कविता .. हे कडवं तर मनात घर करून गेलंय राव .. जिभा अंध:कारास फुटती हजारो तशी गाज ह्या सागराची उठे रोरावती मत्त लाटा अनादि किनाऱ्यावरी गर्व त्यांचा फिटे सिद्धेश्वर विलास पाटणकर

चौथा कोनाडा नवीन

सुंदर कविता !
भणाणून आवर्त झोंबे शिडांसी सुकाणू दिशाहीन कैसे फिरे पुन्हा का अकस्मात तारा खुणेचा कुणाला न ठाऊक कोठे विरे
अतिशय चित्रदर्शी ! हाकारणे