सोनरंग

लेखक: चांदणशेला जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी 12/02/2018 - 21:26 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

कवितेतले रंग आवडले. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी यांनी 15/02/2018 - 18:44 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आवडली !

जव्हेरगंज यांनी 18/02/2018 - 21:59 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

सुंदर!!