Skip to main content

कविता माझी

माझ्यासाठी तूच एक असशील ना ?

लेखक आदिती @ यांनी बुधवार, 10/08/2016 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा सांभाळून घ्या ३ वर्षांपूर्वी लिहिलेली कविता जेव्हा चेपुवर दुसऱ्याच्या नावाने लिहिलेली भेटते तेव्हा खूप वाईट वाटत. माझी ही कविता थोडे शब्द बदलून मला चेपुवर वाचायला भेटली होती. याआधी लिहिलेली कविता तुम्ही वाचलात, तुम्हाला आवडली म्हणून म्हटलं आपली जुनी डायरी काढून त्यातून उरलेल्या कविता पण इथे टंकाव्यात. शब्दात नाही सांगता येणार डोळ्यातून समजून घेशील ना? अस्वस्थ होईन मी जेव्हा धीर मला देशील ना?
काव्यरस

प्रेम

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 07/08/2016 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कस जगता आल पाहिजे... मोकळेपणान अनुभवता आल पाहिजे... थोड़ समजून.. थोड़ समजावता आल पाहिजे... वेड बनून.. वेड करता आल पाहिजे.. सगळ्यांना हे जमतच अस नाही... पौर्णिमेचा चंद्र मन जाळतोच अस नाही... पावसातून रोमान्स घडतोच अस नाही... 'प्रेम' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस नाही... तरी आजही प्रेमावर जग चालत.. सगळ काही असूनही आपल् माणूस लागत.. 'प्यार में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'प्यार' करत...
काव्यरस

असतं

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 03/08/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य जरी असलं अवघड खूप काही शिकवत असतं उतरत्या चंद्रकले प्रमाणे जीवन आपलं सरत असत नवी दोस्ती नवं नात जोडणं जरी सोपं असत एकदा जोडल्यानंतर मात्र टिकवणं मोठं कसब असत बघू-करू म्हणता म्हणता आयुष्य सर्रकन सरकत असत  आठवणींचे मोती ओवता ओवता म्हातारपण येत असत सरणावर देह विसावतो तेव्हा जगणं आपलं संपत असतं तिथवर पोहोचण्याआधी मात्र माणूस म्हणून जगायचं असतं ---------- 149
काव्यरस

जगणे...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/07/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो. ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो. लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो. ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो. ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो. जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो...... .... अत्रुप्त...

विस्फोट

लेखक योगेश कोकरे यांनी गुरुवार, 28/07/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
खुप भांडावस वाटत , ओरडावसं वाटत, जेव्हा गरिबांवर होतो अन्याय, सत्य बोलणाऱ्याची जीभ कापली जाते, जिथे कष्टाचे पैसे उन्माद झालेली गिधाडं पळवतात, अशी एकेक ठिणगी पडत राहते, ठिणग्यांचा बनतो अग्नीगोल, अग्नी गोलाचा बनतो ज्वालामुखी, हाच ज्वालामुखी घेऊन जाऊ इच्छितो, अन्याय करणारे,भ्रष्टाचारी,गुंड,माफिया,बलात्कारी, आतंकवादी यांच्या समुहामध्ये आणि ब्रम्हाडाची निर्मिती ज्या शक्तिशाली स्फोटाने झाली तितक्याच ताकतीने तो ज्वालामुखी फोडू इच्छितो, भस्म होउदेंत सगळे भाडखाऊ यांच्याबरोबर मी देखील भस्म होउदे कारण त्या स्फोटानंतर होणाऱ्या नवनिर्मितीचे सुख असेल मला, माहितीय मला एकटा नाही लढू शकणार इतक्या हरामी
काव्यरस

नाते

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 26/07/2016 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच्या पलीकडचे जे नाते जुळले होते आदी असे न अंत तयाला ते कालातीत होते जुळले म्हणून होते म्हणू की होते म्हणून जुळले? प्रवाह होते नाते की ते अथांग सागर होते? पृथ्वीच्या गर्भातील अंकुर आकाशी भिडणारे पाखुर फुलातील मकरंद असे की प्रेमातील एक युगुल? ते आहे जोवर अर्थ जीवना जरी असे ते पलीकडले नाते जुळता शब्द थिटे अन् भावनाच खरी मज भासे! -------------
काव्यरस

तृप्ती

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 23/07/2016 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
कंच हिरव्या ओल्या गाली मधुमती फुलांचा बहर फुलवि मोहक धरती आर्जवि हसती घननिळा बरस..मी एक प्यासी क्षितिजावर मग तो ही झुकला शामल देहि कवळुनि तिजला चुंबुन म्हणे त्या गौरीला तुज ओटी माझा अंकुर रुजला नव यौवना ती धरा बहरली अंग अंग कांतिही भरली पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी  नव जन्माने तृप्त जाहली
काव्यरस

जग हे मधुशाला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 28/06/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
जग हे मधुशाला कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला ज्याची त्याला प्यारी बाटली बाटली तले सखे सौंगडी देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला जो तो अपुल्या जागी लुडके नजर न धावे चकण्या पलीकडे गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला कुणा न माहीत किती ढोसले ते कोठुन आलो ते नच स्मरते उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला
काव्यरस

मनातले माझ्या

लेखक Bhagyashri satish vasane यांनी रविवार, 26/06/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
शांत थंड झुळूक आज खुणवते मजं नवं दिशा मनाचे बांध तुटले अश्रृंचा पुर आला नेत्री भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर पुन्हा ते रेंगाळले निशब्द मनातल्या वेदना अश्रृंनी व्यक्त होऊ लागल्यात, आठवूनी आईची माया जाग्या झाल्या आठवणी जुन्या भावनांच्या खोल डोहात तरंग उठले कोणते नवे.......? अंधाराच्या मागे धावणारी मी आज आशेचा किरण शोधु लागले.......
काव्यरस

समाधान !

लेखक खेडूत यांनी शनिवार, 18/06/2016 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच ! पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय? तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …! *** होती अमुची प्रिया एक ती आमची मंजे कंपनीची सदैव वाटे तिजला कांही नविन करावे प्रतिमासी कधी कनेक्टे हार्ट आमुचे कधी पॉलीस्यां अपडेटवी तसा एकदा सर्व्हे केला 'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि ! मनात नसता भाग घेउनि सारे प्रतीसादून आले सर्व्हे झाला पटपट आणिक सार निघाले हो झटपट स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि छान छान पी पी टी सजवून आली हो ऐटीत पुण्याला प्रिया विमानी त्वरित बसून सगळ्यांना गोळा करूनि पोपटपंची झाली करून सगळे आपण कित्ती ह्याप्पी