Skip to main content

श्रद्धांजली

लेखक निनाव यांनी बुधवार, 21/09/2016 14:54 या दिवशी प्रकाशित केले.

श्रद्धांजली

लागावी कशी झोप आम्हा आत्ता
कळले जेंव्हा -
सरहद्दी वर वाहिले रक्त ते ,
आमुच्या
शांत झोपे साठी होते!

हसावे आम्ही कसे आत्ता,
झालात
तुम्ही हसत हसत हुतात्मा
दोषी वाटते आम्हा आज
गाफ़ील चारित्र्य आमुचे होते !

उठू आम्ही सर्व आत्ता
लढू आम्ही वैरास
बांधू आम्ही हा देश ऐसा
पाहिले स्वप्न जैसे तुम्ही होते !

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1103
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया