Skip to main content

(जगताना)

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 18/02/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
जगताना... शर्ट म्हणून जगताना खूप खोचावं लागतं स्वत:च्या फाटक्या बनियनला नीट झाकावं लागतं ताठ कॉलरनं जगताना घामाने भिजावं लागतं आणि इस्त्रीच्या वाफेखाली स्वतःला झोकाव॑ लागत॑ वॉशिंग मशिनच्या गोलात खूप घुमावं लागतं ड्रायरच्या गरम जाळात वाळवून घ्यावं लागतं चिखलाचा सामना करताना पांढरेपण जपावं लागतं चुरगळण्याच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं टर टर फाटताना थोडं तुटावं लागतं कपाटातल्या घडीसाठी खूप वेळ पळावं लागतं
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2651
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्त... :) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

आवडली --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी