मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

यादवी किंवा (ती झाली तेव्हा...)

राजेश घासकडवी ·
मनुष्याचा इतिहास यादवी-युद्धांनी भरलेला आहे. जे मुद्दे तडजोडीने, सहमतीने, गुण्यागोविंदाने सुटू शकतात अशाविषयी हट्टाग्रही भूमिका घेऊन शस्त्रं उपसायची परंपरा आहे. यात भावाविरुद्ध भाऊ उभा राहातो, मित्राविरुद्ध मित्र पवित्रा घेतो आणि प्रेम विसरून एकमेकांचा गळा घोटायला ते तयार होतात. कित्येक राज्यं, देश अशा आंतर्गत बंडाळ्यांमुळे कमकुवत होऊन परकीय आक्रमणांना बळी पडलेली आहेत. मिपावर मी बऱ्याच लोकांपेक्षा खूप कमी वेळ वावरलो आहे. कोणाला अजून भेटलेलोही नाही. असं असतानाही माझे मिपाशी, तिथल्या लोकांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मिपाने मला खूप काही दिलेलं आहे.

असाच व्हावा शेवट माझा......

झुम्बर ·
असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला अनुजा(स्वप्नजा)

(भक्ता! तू सुद्धा ???)

राजेश घासकडवी ·
प्रेरणा ही कविता. खाली दिलेल्यांसारख्या घटना प्रत्यक्षात घडलेल्या असतानाही आपण असे लोक मुळात स्वामी कसे झाले याचा विचार करत नाही, व नंतर आपणच पुजलेले त्यांचे पाय शेणाचे आहेत हे कळलं की आश्चर्याने चकचकीत होतो. माणसाला देवत्व द्यायचं आणि त्याने माणसासारखं वागलं की अचंबा व्यक्त करायचा... हे नाटक का खेळलं जातं, हे मला नेहेमी पडलेलं कोडं आहे. टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, खबर नाही आली, भक्ताला बिलकुल अटक नाही झाली. मूर्खपणा म्हणजे काही, गुन्हा नाही केला. पोलिसांनी गजाआड त्याला नाही केला!

एक गिअर मेला

पाषाणभेद ·
एक गिअर मेला एक गिअर मेला. तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो. मी म्हणतो तो गिअर मेलाच. असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला. दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार? तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे. बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन. आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्‍यांची. तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये. अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच.

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे .......

झुम्बर ·
आभाळभर रडून सुद्धा मी थोडी उरले एवढ होऊन ही एका श्वासासाठी अडले वाटल होत तुझ्या विना एक क्षणही जगणार नाही आणि तुझ्या वाचून माझ अस्तित्वही उरणार नाही पांढर्या चादरीत झाकला देह सामोरी जेव्हा आला वाटले आता तुझ्या बरोबर माझाही बहर संपला हिरवे गोंदण देहावरले चुम्बिणाऱ्या मधुरश्या रात्री खूप एकट वाटल्यावर तु आहेस ही मनाला खात्री आता वाटले झोकून द्यावे मृत्युच्या कभिन्न डोहात तुझ्यासवे मिठीत येयून व्हावे अंतर्धान दिगंतात पण सख्या वास्तवात असे काहीच घडले नाही आठवण तुझी तीव्र खरी पण मृत्यूला भिडले नाही दिवसामागून दिवस तुझ्या विनाच सरत गेले तुझ्या शिवायच जगायची सवय मी लावत गेले कधी

वेड

स्पंदना ·
तुझी न माझी जोड न जमली तुला न त्याची फिकीर कधी । तरी मनाची गुप्त कवाडे परस्परांवर सतत खुली ॥ जागेपणीच्या स्वप्नी म्हण वां स्वप्नातल्या जागेपणी । सतत चाहूल नजरेची त्या स्पर्श गंध हृदयी ॥ रूप आठवे, आठवते स्मित अजुनी उघडती नेत्र एकदम । जणू धडकला हनुवटीस या तो खांदा फिरून ॥ धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥

दु:ख

चन्द्रशेखर गोखले ·
साहतो मी दु:ख देवा अजून किती साहु रे जाळशील अजून किती अजून किती रक्त रे..! संपु दे यात्रा माझी त्राण नाही राहिले प्रेत नुसते चालले हे प्राण तर केव्हांच गेले वेदना ही कोणती..? कि मेल्यावरी पण जाळते हि कोणती पेटली चिता ..? कि प्रेत माझे किंचाळते..!!

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता

पाषाणभेद ·
हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता
हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

आस ! जन्मो जन्मीची ! !

निरन्जन वहालेकर ·
आस ! जन्मो जन्मीची ! ! मस्तीत होतो मी बरा, का साद मजला घातली ? ना जंर होणार माझी का आस वृथा हि दाविली ? याद तव नाही असा, क्षण एकहि न पाहिला. वेदनांचा अधिकार मजला तोही तू ना ठेविला ! घेवूनी सल ही उरी, जन्म हा काढू कसा ? वेदनांचे शब्द हृदयी जपुनी मी ठेऊ कसा ? लागले नेत्र पैलतीरी अता, कुरवाळू कुठवर यातना. तोडून बंध सारे तू, ये मज आता भेटण्या ! ! ना जंर तू मज भेटली येईन परतुनी मी पुन्हा, घेउनिया जन्म दुसरा शोधित तव पाऊलखुणा ! ! ! निरंजन वहाळेकर

जखम

चन्द्रशेखर गोखले ·
हृदया वरली जखम ओली कधी गोठली कधी वाहिली कधी हुंदका अस्पष्ट जरासा कधी मनातून खोल उसासा कधी नयनातून अवचित गळती खारट मोती गालावरती प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....!