मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता
हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

मी रोगजर्जर, असूनी पंगू, मरण समोर उभे, काळ अपेक्षीत तुला मी अजूनी रहावा थोडा वेळ दैवगती ही अशीच राहे, जीवन मिटे हे, न जगता
का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||
तू नच अभागी, मीच कमनशीबी, अर्धीच आयुष्यरेषा अधूरेच आयुष्य ,जगलो, उरली न काही आशा शोक नको, जन्मेन पोटी पुन्हा, असशील तू माझीच माता ||२||
का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ|| (वरची एक ओळ अशीही वाचता येईल : अधूरेच आयुष्य जगलो, उरली न काही आशा)
हे माते, कुरवाळ पुन्हा, अश्रू पडू दे डोई, थापटता नंतर आक्रंदू नको, वात्सल्य संपवू नको, राख माझ्याकरता हलकेच हातांनी भरवण्याचा हट्ट पुरव आता जाता जाता ||३||
का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या) ०७/०४/२०१०

वाचने 1883 वाचनखूण प्रतिक्रिया 4

पाठ्यपुस्तकातल्या कवितेची आठवण झाली. जुन्या स्टाईलची वाचनीय कविता. अशीच एक कविता होती.त्यातली पहीली ओळच फक्त आठवतेय. ..धीर धरी शोक आवरी जननी,भेटेन नऊ महिन्यांनी.. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

शुचि 07/04/2010 - 21:07
चांगली आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara