Skip to main content

वेड

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 08/04/2010 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी न माझी जोड न जमली तुला न त्याची फिकीर कधी । तरी मनाची गुप्त कवाडे परस्परांवर सतत खुली ॥ जागेपणीच्या स्वप्नी म्हण वां स्वप्नातल्या जागेपणी । सतत चाहूल नजरेची त्या स्पर्श गंध हृदयी ॥ रूप आठवे, आठवते स्मित अजुनी उघडती नेत्र एकदम । जणू धडकला हनुवटीस या तो खांदा फिरून ॥ धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2450
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

क्या बात है अपर्णातै...झक्कास कविता.
धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥
एक नंबर.. =D> =D>

प्रामाणिक, भावपूर्ण कविता आहे. सुंदर! गेयतेच्या दृष्टीने किरकोळ बदल केल्यास आणखी छान वाटेल. (आस्वादक)बेसनलाडू

धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥ फारच छान binarybandya™