Skip to main content

स्वामीं ! तुम्ही सुद्धा ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 22/04/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामीं ! तुम्ही सुद्धा ? ? ? टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, कानोंकानी खबर आली, xxxx स्वामींना गुन्हयासाठी अटक झाली. मोर्चा, लाठीमार, सारं काही झालं. पोलिसांनी तरी त्यांना गजाआड केलं ! भरल्या घरची लेक, *पोटुशी राहिली होती. अन स्वामींची तक्रार, पोलिसांत नोंदली होती. जमानत ! सुटका ! ! सारं रीतसर झालं ! ! ! स्वामींनी सगळं कसं सहज “म्यानेज ” केलं ! भरल्या घरच्या लेकीला “ गुरुमाय ” केलं. अन संग संग विमाननं “फॉरेन “लाही नेलं ! वासनेच्या घरांतच महात्मेही वसतात महात्म्यांचे पाय सुद्धा मातीचेच असतात ! ! ! *पोटुशी = गर्भवती निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

वाचने 1091
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

अगदी अचूक मर्मभेदी!!!!!