मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जखम

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हृदया वरली जखम ओली कधी गोठली कधी वाहिली कधी हुंदका अस्पष्ट जरासा कधी मनातून खोल उसासा कधी नयनातून अवचित गळती खारट मोती गालावरती प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....!

वाचने 1602 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्रमोद देव 04/04/2010 - 10:43
बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब... पण मस्त रचना घेऊन आलात. पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;) जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार त्याने,तो मोगरा असावा.

डावखुरा 04/04/2010 - 10:55
प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....! रचना छानच आहे पण सदैव ताजी का राहो? हे कळ्ले नाही.... "राजे!"

sur_nair 07/04/2010 - 08:05
छान. पण शेवटच्या कडव्यातला आशय जरी चांगला असला तरी शब्द जरा वेगळे हवे होते. 'ताजी ताजी' जखम फारसं रुचत नाही.

In reply to by sur_nair

पक्या 07/04/2010 - 12:49
ह्म्म , ताजी च्या ऐवजी ' भळभळणारी ' हा शब्द कसा वाटेल? गोखले साहेब , कविता आवडली. जय महाराष्ट्र , जय मराठी !