मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

सलगी

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
कौल कौल छत्रामधुनी गीत अंबराचे गळते रोम रोम कोण पुकारी; हृदयी सल; ना आकळते जीर्ण; कुडाच्या ह्या भिंती जड होउन पाउल पडते आर्त कोळुनी जन्माचे पडछाया हसते रडते किती जाहले राहीले चाक रहाटाचे फिरते कोरडे जलाशय तरिही आंसवात मन भिरभिरते ऊर उतू वाहू पाहे बांधावर पाहुन नाते अंकुरात माया असुनी मातीशी सलगी नडते .................अज्ञात

प्रयत्न ..आता एकच !!

जेनी... ·
लेखनविषय:
काव्यरस
आमचे प्रेरणास्थळ ...... गालावरच्या पिंपल्सचे जुनेच डाग अजून मिटत नाहीत,विटत नाहीत ,विरत नाहीत डाळी एवढ्या आलेल्या पुळिची विल्हेवाट कशी लावतात ? ' पू 'वाने गच्चून भरलेल्या पुळिकडे बघताना थोडी आंबे हळद ,आणि चंदन उगाळून लावावसं वाटत आहे ताजी म्हणावी अशी पुळि आता उरली नाही तुकतुकित म्हणावे असे तर आता ' गाल ' पण उरले नाहीत फेस पॅक ,विको टर्मरिक ,बोरोलिन ह्यांचा वर खर्च पिकत चाललेल्या पुळिला आज लेप लावणार कि नाही? रात्र उलटताना पुन्हा त्याच पुळी कडे लक्ष जाते आराश्यातनं तीच बघण ,अन जीवाच्या आकांताने फुगण कधीही फुटेल अश्या अव

प्रार्थना.. आता एकच...

५० फक्त ·
काव्यरस
(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?) कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत, त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ? बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च रक्त संपत आ

भारतका रहनेवाला हूँ

तिमा ·
काव्यरस
प्रिय वाचक, 'भारतकुमार'चे हे डावीकडे लिहिलेले गाणे तेंव्हाही मला पटायचे नाहीच. पण सध्याच्या परिस्थितीत तर ते मला बोचते. मूळ गाणे हिंदीमधे असल्यामुळे विडंबन पण हिंदीतच केले आहे. विडंबन उभे वाचावे. तुलनेसाठी मूळ गीत डावीकडे दिले आहे.संपादकांनी ते मराठी नाही म्हणून उडवायचे असेल तर उडवावे. परन्तु माझ्या वयाच्या लोकांच्या भावना, आपणापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न केला आहे. - तिरशिंगराव है प्रीत जहाँ की रीत सदा -................ है घूंस जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ .................

धरणी माय....

अमितसांगली ·
लेखनविषय:
काव्यरस
कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला, जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला, चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले चटके देऊ

इडंबन की जय हो...!

अत्रुप्त आत्मा ·
स्वयंप्रेरणा :- ज्या http://www.misalpav.com/node/21154 या धाग्या वरुन हे गीत स्फुरले, त्या धाग्याचे हे गीत म्हणजे स्वयं-उपशमनच आहे ;-) भगवंता रे भगवंता,खरच सांग.....हे काय झाले? टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?

तो

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
तो पोखरतोय आतून............. उत्खननातून; एकेक कविता बाहेर काढतोय.............. कींमती जगणं आणि जगण्याची किंमत ह्यांची तौलनिक मिमांसा करतोय............... खर्‍या खोट्याची आपल्या परक्याची रुजवात घालून देण्यासाठी आलाय तो.................... आयुष्यभराच्या ओळखीचे; परिचय झालेत त्या निमित्ताने................. मुखवट्यापलिकडचे चेहरे दृष्टीपथात आलेत........... झटताहेत सर्वच कर्तव्यापोटी आपापली कामे सांभाळून.................... कुणी; जणीव करून देताहेत आल्याची; एक उपचार म्हणून................ खरं तर आता कार्य थांबलंय................ उपयुक्तताही संपलीय................. अस्तित्व आहे ते केवळ; कुणाच्यात

व्युत्क्रमी परिकर्म

निनाद ·
लेखनविषय:
व्युत्क्रमी परिकर्म स्वयं-संतुलन कच्चीजप्ती शंकुचाचणी अवसीदन। मिथ्या शस्त्रक्रिया स्व-विमोची रूपद बीजगुणन॥ दुय्यम उघाड दोलनलेखी मळसूत्रउत्परिवर्तन। वालुकाश्मी भित्ति बीज चाचणी अपवाहचक्रन॥ वैतनिकपद व्युत्क्रमी परिकर्म सदापदावर्तन। स्थूनांकन दोष अपवाह गुणांक वनसंशोधन॥ प्रतिवेदक अधिकारीसंचय वायु पुनर्मूल्यन। लालसावर प्रारणप्रतिक्षेप परिपथ प्रत्यावर्तन॥

माझी अधुरी कविता

रसप ·
लेखनविषय:
काव्यरस
मी जपली जीवनभर जी वसने सारी ती विरली ओसाड शून्य नजरेच्या स्वप्नांची चौकट झिजली भुरभुर कापूस धुक्याचा चौफेर पसरला आता रस्ताही संपुन गेला ह्या वळणावरती येता काजळल्या क्षितिजापाशी नि:शब्द गुंतली किरणे श्वासांना अवजड झाले श्वासांचे ओझे बनणे माझ्यामागे शब्दांचे उद्विग्न उसासे काही त्या शेवटच्या पानावर गवसेल सांडली शाई तू नकोस माझ्यासाठी थेंबातुन वाहुन जाऊ माझ्या अधुऱ्या कवितेने तू नकोस भारुन जाऊ ....रसप.... http://www.ranjeetparadkar.com/2012/01/blog-post_30.html

प्रोफाईल

रसप ·
लेखनविषय:
काव्यरस
ती नाहीये.. माहितेय.. पण मला तिच्या प्रोफाईलला फ्रेंड म्हणून ॲड करायचंय ती काहीच बोलणार नाहीये, लिहिणार नाहीये मला माहितेय पण मला तिच्या शांततेला 'लाईक' करायचंय ती येणार नाही..