Skip to main content

माझी अधुरी कविता

लेखक रसप यांनी बुधवार, 28/03/2012 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी जपली जीवनभर जी वसने सारी ती विरली ओसाड शून्य नजरेच्या स्वप्नांची चौकट झिजली भुरभुर कापूस धुक्याचा चौफेर पसरला आता रस्ताही संपुन गेला ह्या वळणावरती येता काजळल्या क्षितिजापाशी नि:शब्द गुंतली किरणे श्वासांना अवजड झाले श्वासांचे ओझे बनणे माझ्यामागे शब्दांचे उद्विग्न उसासे काही त्या शेवटच्या पानावर गवसेल सांडली शाई तू नकोस माझ्यासाठी थेंबातुन वाहुन जाऊ माझ्या अधुऱ्या कवितेने तू नकोस भारुन जाऊ ....रसप.... http://www.ranjeetparadkar.com/2012/01/blog-post_30.html
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1401
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छान लिहिता अजून येऊ देत. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझ्यामागे शब्दांचे उद्विग्न उसासे काही त्या शेवटच्या पानावर गवसेल सांडली शाई
मस्तच!