स्वामी तुम्ही तारा

झंम्प्या's picture
झंम्प्या in जे न देखे रवी...
20 Sep 2012 - 9:37 am

धरिला वृथा हट्ट
वाळूस पकडतो घट्ट
हाती काय उरावे,

भाळतो कांचना
भोगतो विवंचना
खरे काय म्हणावे,

गेली वेळ निघोनी
मडके फुटके खालोनी,
किती ते भरावे,

शेवटी जळते काया
भवती सगळी माया
का मग रडावे,

केला अहंकारे दंश
वाढतो वासनेचा वंश
कोणी सावरावे,

विपरीत हे घडले
मोहात शरीर सडले
कोणी सोडवावे,

वाट ही बिकट
मार्ग हा धाकट
पैलतीरी कोणी धाडावे,

पोसतो ही काया
स्वामी चरणांसी जाया
जवळ तुम्ही करावे,

स्वामी तुमचा दास
चरणांचा तुमच्या ध्यास
बोट तुम्ही धरावे,

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

20 Sep 2012 - 8:26 pm | पक पक पक

छान आहे :)

यशोधरा's picture

20 Sep 2012 - 8:29 pm | यशोधरा

सुरेख. रचना आवडली.