ही आमची पाककॄती आम्हाला कालच्या उपवासाच्या दिवशी अनेकविध पदार्थांची नावे सांगुन आमचा जीव टांगणीवर लावणार्यांना , मिपावर त्याचे फोटो टांगुन आमची गोची करणार्यांना , फराळ करतान आमची आठवण काढणार्यांना आणि न काढणारे अशा सर्वांना अर्पण ...!!!
तर मेहरबान, कदरदान, खानदान आणि ए.आर. रेहमान ( ऑस्कर मिळलयं म्हटलं त्याला, आहात कुठे ? ) सादर आहे एक धमाल रेसिपी " उपवासाची बॅचलर साबुदाणा थालिपिठे" ...
*****
तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे काय ह्याचा पुर्ण विचारान्ती आणि होशोहवासमध्ये ( हो, कारण उपवास सोमवारी होता आणि त्याआधीचा दिवस म्हणजे रविवार ;) ) निर्णय घ्यावा ( हो ना, अन्यथा उपवास नसेल तर उपवासाचे पदार्थ पदराला खार लाऊन करतो कोण ? ज्या गावाला जायचेच नाही त्याचा डिटेल पत्ता काढण्यात काय हाशील ? ) , एकदा का बार उडवायचा ठरले की मग अजिबात मागे हटणे नाही ...
तर आपला "उपवास" आहे हे नक्की झाले मग आता उपवाला चालणारे, इथे मिळणारे, लवकर तयार होणारे आणि स्वस्त असणारे पदार्थ हुडकायला सुरवात करावी व सर्व चाचपणी करुन झाल्यावर आपल्याला "साबुदाणा खिचडी" करायची आहे हे ठरवुन घ्यावे. काळजी नको, मी जरी वर टायटल "थालपीठ" असे टाकले असताना इथे मी "खिचडी" लिहणे म्हणजे महाशिवरात्रीच्या प्रसादाचा पर्यायाने भांगेचा प्रताप नव्हे, ते पुढे कळेलच ..!!!
* साहित्य :
साधारणता १ किलो साबुदाणा
१/४ किलो शेंगादाणे
१/२ किलो बटाटे
१५-२० हिरव्या मिर्च्या
बचकभर जीरे,
३-४ चमचे जीरेपुड ,
तुप / तेल,
मीठ, तिखट हाताला येईल तसे.
२ लिंबं,
एक मोबाईल, एक लॅपटॉप ( इंटरनेट कनेक्शन असलेला ) , एक टीव्ही.
१ ट्रॉपीकाना ऑरेंज ज्युसची बाटली ( कशाला ? नंतर सांगेन ),
आपल्यासारखेच टुकार ५-६ मित्र,
१ ऐनवेळी टांग मारणारा पगारी स्वैपाकी उर्फ कुक
सर्वात महत्वाचे , रिकामा ३-४ तासाचा वेळ
सर्वात प्रथम उठुन हापीसात गेल्यावर गेल्यागेल्या "आज माझा उपवास आहे" हे जाहीर करावे व स्वतःचे कौतुक करुन घ्यायला सुरवात करावी. दररोज ज्यांच्याबरोबर ब्रेकफास्टला जाताय ( नावे दरवेळी हवीच का ? ;) ) त्यांनी आज ठामपणे " नाही" म्हणुन सांगावे, फारच आग्रह झाला व समोरची व्यक्ती अगदीच सोडेनाशी झाली तर त्यांच्याबरोबर जाऊन आपण फक्त "मोसंबी ज्युस" प्यावा व हाच सर्वात उच्च आणि श्रेष्ठ उपहार आहे ह्यावर त्यांचे बौद्धिक घेऊन त्यांना काव आणावा, ते वैतागुन तुमचे ज्युसचे बील स्वतःच भरतील.
आख्खा दिवस शक्यतो ज्युस ,फळे, सहकार्यांनी "काहितरी खाऊन हे" म्हणुन केलेला आग्रह ह्यावर काढावा.
आज उपवास आहे ह्यासबबीखाली हापीसातुन लवकर घरी निघावे व पुढच्या तयारीला लागावे ...
अर्थातच आपल्या फ्लॅटवर साबुदाणा नावाचा प्रकार नसतोच, मग आधी त्याला हिंदी/इंग्रेजीत काय म्हणतात हे आठवायचा प्रयत्न करावा, शेवटी "सागु / सॅगो " हे इंग्रजी नाव आठवल्यावर शंभु महादेवाचे नाव घेऊन खरेदील निघावे. आपले मराठी व इंग्रेजी मिश्रीत हिंदी व त्यांचे शुद्ध कन्नडा अशी २-३ ठिकाणी खडाजंगी झाल्यावर शेवटी एक किलोभर "सब्बक्की उर्फ कन्नड साबुदाणा" घेऊन यशस्वीरित्या घरी यावे.
मग लॅपटॉप उघडुन आंतरजालावर कुठे काही रेसिपी दिली आहे का ह्याची चाचपणी सुरु करावी, सर्वात शेवटी मिपाकर असलेल्या चकली यांचा ब्लॉग उघडुन "उपवासाचे पदार्थ" हे पान खोलावे, त्यात साबुदाणा खिचडी हे पाहुन घावे व आपल्याला जमेल इतका कॉन्फीडंस आला की मग पुढ्च्या तयारीत लागावे ...
सर्वात प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवुन घ्यावा, मग तो "भिजण्यासाठी" एक पातेल्यात मुबलक पाणी घेऊन त्यात टाकुन द्यावा. ब्लॉगवर लिहलेली "उरलेले पाणी काढुन टाकावे" ही सुचना सोईस्कर विसरुन जावी. आपण लै भारी काम केले ह्या आनंदात फटाफट मित्रांना "खिचडी जमते आहे रे " असा समस टाकुन रिकामे व्हावे, त्यांचा फोन येण्याची शक्यता गॄहीत धरुन पटकन "कमीत कमी तासभर गप्पा मारता येतील" अशा व्यक्तीला फोन लावावा, आपण मस्त गप्पा मारत बसावे व मित्रांच्या "वेटिंगवर असलेल्या कॉल्स" कडे सोईस्कर दुर्लक्ष करावे.
शेवटी बसुन, झोपुन, लोळुन, उभे राहुन अथवा कसेही फोन हातात पकडायचा व बोलायचा कंटाळा आला की फोन बंद करावा व मित्रांना परत फोन करुन "काय झाले?" असा प्रश्न करुन काही "प्रेमळ शब्दांची व स्तुतीपर वाक्यांची देवाणघेवाण" करावी, सर्वात शेवटी त्यांना येताना बरोबर आणायच्या पदार्थांची अशी लिश्ट द्यावी की त्यांना त्यापेक्षा पुण्याला जाऊन खिचडी खाऊन येणे परवडेल असे वाटले पाहिजे. असो.
त्यात एका मित्राच्या बोलण्यात "भिजवताना उरलेले पाणी काढुन टाकलेस का ?" असा उल्लेख ऐकल्याबरोबर धावत किचनमध्ये जावे पातेल्यात तयार झालेला " साबुदाण्याचा लगदा" पाहुन डोक्याला हात लावावा व हातासरशी लवकर का बोलला नाही म्हणुन मित्राला ४ शिव्या घालुन घ्याव्यात ...
छे , आता सर्वच गंडले, रात्रीचे जेवण बोंबलणार ह्या कटकटीने टेन्शन आल्यास लॅपटॉप उघडुन मिपामिपा खेळत बसावे अथवा क्रिकेट गेम खेळत बसावी. आत सर्व काही शंभु महादेवाच्या हातात आहे असे मानुन आपण आपले काम ( म्हणजे गेम खेळणे ) मन लाऊन करावे ...
आपण केलेल्या "समस"चा इफेक्ट म्हणुन एखादा मित्र लवकर घरी आल्यस त्याला आल्याआल्या किचन मध्ये न्हेऊन तो "लगदा" दाखवावा व त्याला झीट आणावी. मग तो ज्वर ओसरला की आता ह्याचे काय करता येईल ह्यावर प्रबोधक चर्चा करावी, मित्राची " तो लगदा गॅसवर तापवुन पाहु का ?" ही कल्पना ३-४ शिव्यांच्या आधारे फेटाळुन लावावी ...
मग दोघांनी मिळुन "चकली ब्लॉगवर" अजुन काय शक्य आहे ते पहावे ...
आता खिचडी जमणे अशक्य अशी २-३ ठिकाणी फोन करुन खात्री झाल्यावर आपण आता मस्त "साबुदाणा थालपिठे" करु असे ठरवुन घ्यावे व त्याच्या तयारीत लागावे ...
सोईस्करपणे आपल्या सध्याच्य्या अल्पवस्त्रस्थितीचे कारण पुढे करुन मित्राला बटाटे आणायला हाकलावे व तोवर मी शेंगादाणे भाजतो अशी त्याला खात्री द्यावी. म्हटल्याप्रमाणे कढाई गॅसवर ठेउन, गॅस फुल्ल करुन त्यात शेंगादाणे ओतावेत व ते भाजताना सतत हलवावे लागतात ही महत्वाची गोष्ट विसरुन आपण शांतपणे हॉलमध्ये जाऊन टीव्ही लावावा व त्याचवेळी कुणाला तरी फोन करुन आत्मानंदी तल्लीन व्हावे.
थोड्या वेळाने मग काहीतरी तडतड आवाज व जळाल्याचा वास आला की धावत किचनमध्ये जाऊन गॅस बंद करावा व मित्र यायच्या आत जळालेले शेंगदाणे डस्टबिनमध्ये टाकुन द्यावेत, आता मात्र आणिबाणीची परिस्थीती आली असे समजुन थोड्याश्या गांभिर्याने "शेंगदाणे भाजणे" हे कार्य पुर्णत्वाला न्ह्यावे.
मित्र आल्यावर त्याच्याकडुन बटाटे घेऊन ते उकडायला कुकरमध्ये लाऊन द्यावेत.
थोड्या वेळाने आणखी १ बॉडीबिल्डर मित्र आल्यावर त्याला आधी हरबर्याच्या झाडावर चढवुन त्याला "शेंगादाणे कुटायच्या" कार्याला बसवावे व तोवर आपण आपला क्रिकेटचा गेम पुर्ण करत रहावा....
अजुन १-२ मित्र आल्यावर व त्यांनी आपला व्यवस्थीत उद्धार करुन ते आता सफिशियंट वैतागले आहेत ह्याची खात्री झाल्यावर सर्व तयार असलेले रॉ मटेरियल घेऊन "साबुदाण्याची थालिपीठे" करायला सुरवात करावी ...
एक मोठ्ठी परात घेऊन त्यात उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करायला घ्यावा, मनोसोक्त बटाटे स्मॅश करुन झाल्यावर त्यात मगाशी तयार झालेला साबुदाण्याचा लगदा + शेंगादाण्याचा कुट + लिंबाचा रस + जीरे आणि जीरेपुड + मीठ + तिखट हे हाताला येईल त्या प्रमाणात मिसळावे. चव जमली आहे की नाही हे तपासण्याशीठी चमचा-चमचा ह्या हिशोबाने टेस्ट करत रहावे व जेव्हा २ वाट्या मिश्रण असेच फस्त होईल तेव्हा ते योग्य जमले आहे असे जाहीर करावे ...
शेवटी हा ( म्हणजे मी ) आता थालिपीठी तयार करणार अशी मित्रांची खात्री झाली व ते निवांत बसले की " अरेच्च्या, मिरच्यांचा ठेचा टाकायचा राहिलाच चुकुन " अशी त्यांना आठवण करुन द्यावी. मग ते चिडुन मिरच्या कुटत असताना आपण शांतपणे हात धुवुन, फ्रीजमधली ज्युसची बाटली काढुन आरामात मिपामिपा खेळत बसावे. त्यांनी ज्युस मागीतल्यास तो उष्टा आहे व उपासाला असे चालणार नाही असे सांगुन एक मोठ्ठा घोट घेऊन तो ज्युस "क्लासऽऽऽऽ" आहे हे जाहीर करावे.
शेवटी मिरच्यांचा लगदा मनोसोक्त आधीच्या तयार मिश्रणात मिसळत बसावा ...
मग कंटाळा आला की ते सर्व घेऊन किचनमध्ये जावे. गॅस चालु करुन एक नॉनस्टीक तवा गरम करायला ठेऊन द्यावा व पुन्हा बाहेर जाऊन टीपी सुरु करावा, तवा तापला आहे ह्याची खात्री मित्रच करतील पण मित्रसुद्धा तापले आहेत ह्याची खात्री अपणच करावी , मग आपण एकदम टेचात उठुन किचनमध्ये जावे व कुणाला तरी "एक प्लास्टीकच्या कागदाचा तुकडा आण रे" असा हुकुम सोडावा. तो बिचारा हुडकत बसतो, नियमाप्रमाणे त्याला लवकर सापडत नाहीच. मग आपण इतर मित्रांबरोबर त्याचा व्यवस्थीत उद्धार करुन घ्यावा...
शेवटी सर्व सारंजाम जमला की तयार मिश्रणाचे "मध्यम आकाराचे गोळे" तयार करुन घ्यावेत, ह्या कामात मित्र तुम्हाला खात्रीने मदत करतील. मग त्या कागदाला थोडेसे तुप लाऊन त्यावर हा गोळा ठेवावा व व्यवस्थीत थापुन साधारणता गोल व समान जाडीचा असा पराठासदॄष्य आकार बनवावा. तुप सोडण्यासाठी त्याला मध्ये बोटाने छोटेसे भोक पाडुन ठेवावे ...
मग तो परठा न मोडता तव्यावर तुप सोडुन त्यावर टाकण्याच्या अवघड कामाला सुरवात करावी. शंभु महादेवाला तुमची दया आल्याने हे काम व्यवस्थीत पार पडते.
आता हे पलटुन भाजण्यचे काम एका नवशिक्या मित्राकडे सोपवुन द्यावे व आपण संजीव कपुरच्या आवेशात त्याला सुचना करत रहाव्यात. त्याच्या हातुन थालिपीठ तुटते , कधी कच्चे रहाते, कधी कागदावरुन तव्यावर जायच्या ऐवजी निम्मे ओट्यावर पडते पण आपण सन्यस्त दृष्टीने हे सर्व एंजॉय करावे, जो काही समाचार घ्यायचा आहे तो बाकीचे मित्र घेतील ...
आपला थोडा थालपिठे लाटायच्या कार्यात व मित्राचा भाजण्यात हात बसल्यावर मात्र पुढचे सर्व व्यवस्थीत पार पडते. पण त्याआधी वाया गेलेल्या थालपिठांचे दु:ख मानु नये, थॉमस अल्वा ऍडीसननेसुद्धा विजेचा बल्ब बनवताना ९९९ वेळा चुक केली होती हे लक्षात असु द्यावे ...
सर्व थालिपीठे तयार झाल्यावर एका ताटलीत हे थालिपीठ + दही + बटाटा वेफर्स + तुप + द्राक्षे घेऊन आरामात तंगड्या पसरुन टीव्ही पहात मित्रांबरोबर थट्टा मस्करी करत व आज काय काय "पाहण्यालायक" दिसले ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत खत बसावे.
अशा कठोर व्रताने महाशिवरात्र भरभरुन पावते व शंभुमहादेव तुमच्यावर प्रसन्न होतो असे डॉनबाबा बेंगलोरी ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहले आहे .... ;)
महत्वाची गोष्ट :
फोटो ; मिपावर फोटोविना पाककॄती म्हणजे बॅटविना तेंडुलकर, अंगभर कपडे घालुन मल्लिका शेरावत किंवा निरपेक्ष लिहणारे सुमर केतकरच ... थोडक्यात अशक्य व अमान्य ...
पण वरच्या पाककृतीवरुन आपल्याला जर याचा "फोटो काढता येईल" अशी खात्री असेल तर आपल्या पायाचा फोटो आम्हाला पाठवावा, आम्ही तो फोटो व आमच्या पाककॄतीचा फोटो त्वरित मिपावर टाकु ;)
प्रतिक्रिया
24 Feb 2009 - 9:26 am | अवलिया
खणखणीत रे डान्या!!!!
वा! सकाळ आज आनंदी झाली ... दिवस नक्कीच चांगला जाईल !!!!!!!!!!
येवु दे अजुन ..........
--अवलिया
25 Feb 2009 - 4:50 pm | ब्रिटिश टिंग्या
असेच म्हणतो!
१ लंबर!
पण डान्या, पुढच्यावेळी असाच साबुदाण्याचा गोळा बनल्यास (बनल्यास काय्....तो आपोआपच बनतो :() त्याची खिचडी करुन पहा!
एकदम झानटामाटिक लागते बघ अशी खिचडी!
ही खिचडी २ रंगात बनते.....बाहेरुन गरमगरम खरपुस तांबुस अन् आतुन गारढोण पांढरी....
अशा खिचडीत सवयीप्रमाणे न चुकता मोहरी घालावी अन् मीठ टाकण्यास सोईस्कररीत्या विसरावे.
आयुष्यात एकदातरी मित्रांना अशी खिचडी खाउ घालण्याचे पुण्य केल्यास पुढच्यावेळेपासुन जन्मभर आयते बसुन खिचडी खाण्याचे सुख लाभते असे टिंग्याबाबा लंडनकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहले आहे .... ;)
24 Feb 2009 - 9:34 am | यशोधरा
=)) जय हो!
24 Feb 2009 - 9:34 am | सखाराम_गटणे™
मस्तच,
तुफान लिहीले आहे.
बेंगलोर मध्ये तयार खिचडी मिळत नाही का?
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
24 Feb 2009 - 9:37 am | मृगनयनी
झ भ र्र ड स्ट!!!! डौन्या ..... (जी ;) )......
अ प्र ति म !!!!!!!
(अजून काही महिने )तुमचे बैचलर लाईफ असेच फुलत रहावो!!!! ;) आणि साबुदाण्याच्या थालीपीठासारखे खुमासदार होवो....
:)
-
मृगनयनी.
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
24 Feb 2009 - 9:38 am | सहज
उर्फ डॉन्याचा सल्ला.
हे खासच!
डॉनराव हे सर्व लिहल्याची कृतीच इतकी खल्लास आहे तर केल्याबद्दल काय बोलावे?
तर तुर्तास आपल्याच चरणकमलांचा फोटु टाकुन पाकृ अटींचे पालन करावे. अर्थात फाट्यावर मारण्याच्या महान परंपरेचे पालन आपण करालच व पाकृ विभागातुन आपली प्रवेशिका काढून घ्याल म्हणुन जास्त आग्रह करत नाही.
:-)
24 Feb 2009 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बंगळूरूमधे जाऊन सगळे सुगरण-सुगरणे ... उर्फ *.*चा सल्ला देतात का काय?
लै लै लै बेक्कार शॉट्ट ... =))
आपल्या चरणकमलांचा नव्हे, तर त्या बेंगरूळी न्हाव्याने कापलेल्या झुल्पांसहित चेहेर्याचा फोटो पाठवून द्या ... डाएटची चुकून आठवण झालीच तर आपल्या फोटूकडे बघून आम्ही पामर ती इच्छा परतवून टाकू.
(आपली राजकीय कोलॅबोरेटर आणि डान बाबांची शिष्या) आदीमाया अवखळकर दुर्बिटणे
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
24 Feb 2009 - 10:24 am | छोटा डॉन
झुल्फांची आठवण केलीस ते बरे झाले, मला कुठेतरी "उपवासाच्या सात्विक संतापाने आपल्या वाढलेल्या झुल्फांची शेंडीसारखी गाठ मारुन ...." असे वाक्य टाकायचे होते, ऐनवेळी विसरलो ... :(
आता बघतो जराशी स्पेस ...!!!
धन्यु आठवणीबद्दल ...!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
24 Feb 2009 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक मोठ्ठी परात घेऊन त्यात उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करायला घ्यावा, मनोसोक्त बटाटे स्मॅश करुन झाल्यावर त्यात मगाशी तयार झालेला साबुदाण्याचा लगदा + शेंगादाण्याचा कुट + लिंबाचा रस + जीरे आणि जीरेपुड + मीठ + तिखट हे हाताला येईल त्या प्रमाणात मिसळावे. ...
आणि हे करताना त्यात बेंगरूळी न्हाव्यांचा निषेध म्हणून न कापलेल्या आपल्या वाढलेल्या झुल्फांची शेंडीसारखी गाठ मारावी; तसेच उपवासाच्या सात्विक संतापात हे मिश्रण तयार केले आणि त्यात केस सापडले की सगळ्या मित्रांचा तामसी संताप होईल आणि गांधिगिरी सोडून ते लगेच ते परेश रावलच्या हेराफेरीतल्या सरदार खडगसिंगाचे अवतार बनतील.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
25 Feb 2009 - 11:50 pm | मेघना भुस्कुटे
'शॉट' काय टवळे? आँ? शॉट? तोतया सुगरणसल्ले वाढलेले दिसतात. काहीतरी केले पाहिजे. शॉट म्हणे.
24 Feb 2009 - 9:46 am | विसोबा खेचर
अशा कठोर व्रताने महाशिवरात्र भरभरुन पावते व शंभुमहादेव तुमच्यावर प्रसन्न होतो असे डॉनबाबा बेंगलोरी ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहले आहे ....
हा हा हा! डॉनबाबा बेंगलोरी हे नाव क्लासच!
जबरा लेख..!
डॉनबाबा बेंगलोरींचा विजय असो... :)
तात्या.
24 Feb 2009 - 9:50 am | आनंदयात्री
अहाहा .. पाककृती वाचुन यकृताला पाणी सुटले बघ !!
टिपः
१. थालपीठे भाजतांना गॅस बंद करुन मंद आचेवर भाजुन घ्यावीत वातड होत नाहीत.
२. थालपीठे जर रबरी झाली असतील सरळ कात्रीने कापुन थोडा सोया सॉस घालुन परतावीत मग त्यावर चवीपुरता पेपर टाकुन खावे.
३. थालपीठे जर जळाली असतील ठार काळा झालेला भाग (राख) झटकुन खुशाल दुधात बुडवुन खावीत .. कडसर लागणार नाहीत.
-
आंद्या सुगरण्या
24 Feb 2009 - 9:54 am | अनिल हटेला
सही डॉनभो बंगलोरी !!!
एकदम क्लास ल्हीवलय बरं !! ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
24 Feb 2009 - 10:01 am | मिंटी
डॉन्या लै भारी लिहिलं आहेस रे.........
डॉनबाबा बेंगलोरी हे नाव पण क्लासच!
असंच मस्त कायम लिहित रहा :)
- अमृता
24 Feb 2009 - 10:11 am | निखिल देशपांडे
लै भारि रे..... असाच आमचा खिचडि चा प्रयत्न झाला काल..... आठवुन मजा आलि.....
24 Feb 2009 - 10:14 am | शेखर
>> थोड्या वेळाने आणखी १ बॉडीबिल्डर मित्र आल्यावर त्याला आधी हरबर्याच्या झाडावर चढवुन त्याला "शेंगादाणे कुटायच्या" कार्याला बसवावे व तोवर आपण आपला क्रिकेटचा गेम पुर्ण करत रहावा....
टार्या बेंगलोर ला कधी गेला? :D
अवांतरः उत्तम पाकृ... ;)
24 Feb 2009 - 10:24 am | प्रकाश घाटपांडे
डान्या तुपली धरेपी यकदम बेष्ट च.
पन
त्येच्या ऐवजी बीयर चालते का? उपासाला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Feb 2009 - 10:26 am | छोटा डॉन
>>त्येच्या ऐवजी बीयर चालते का? उपासाला
अजिब्बात नाही ऽऽऽऽ
आम्ही धार्मिक भावना दुखावल्याबद्दल निषेध करु ... ;)
मात्र महाशिवरात्रीचा प्रसाद असलेली "भांग" पिण्यास प्रत्यवाय नसावा ...!
स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही भागेल, कसें ???
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
24 Feb 2009 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बीयर चालेल एकाच अटीवर, बार्ली उपासाला चालत असेल तर! अर्थात साबुदाणा, बटाटा, असे इंपोर्टेड खाण्याचे प्रकार उपासाला चालतात तर बार्ली चालण्यास प्रत्यवाय नसावा.
पण महाशिवरात्रीला भांग पिण्यामुळे जास्त पुण्य लाभत असावं! ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
24 Feb 2009 - 11:11 am | अवलिया
बीयर चालेल एकाच अटीवर, बार्ली उपासाला चालत असेल तर
आमची दक्षिणा मिळाली तर आम्ही आपल्याला सोईस्कर असा संदर्भ मनुस्मृती, निर्णयसिंधु, धर्मसिंधु, याज्ञवल्क्य स्मृती किंवा अशा ग्रंथातुन जिथे त्यावर कुणाला काही आक्षेप पण घेता येणार नाही आणि अमान्य पण करता येणार नाही, काढुन देवु.
--अवलिया
24 Feb 2009 - 5:09 pm | प्रकाश घाटपांडे
अहो वरई चालते ते तृण धान्य आहे आन मंग बार्ली का चालु नये. र्हुषी मुनिंच्या टायमाला सोमरस बी चालत असनार. अहो वनस्पतीजन्य सात्विक पेय आहे ते.
फक्त बियर मदी पानी घातल त मंग चालत नाय उपासाला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Feb 2009 - 11:41 pm | रामदास
नाही.
व्होडका चालते म्हणे.बटाट्यापासून बनवली असते म्हणे.
25 Feb 2009 - 9:18 am | प्रकाश घाटपांडे
ईकीपिडिया तील या माहितीनुसार वोडका चालायलाच पाहिजे. बटाटा आहेच त्यात.धर्ममार्तंड अवलिया काय करतायत तिकडे? धर्मसिंधु चोळत बसलेत का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Feb 2009 - 10:46 am | सायली पानसे
डॉन बाबा बंगलोरी
अप्रतिम लिहिला आहे लेख..
जितकि मस्त रेसिपी तितकाच सुंदर लिहिण्याची ईस्टाईल आहे...
24 Feb 2009 - 10:50 am | ढ
१ नंबर!
लेखणीत मज्जा आहे हां तुमच्या !!!
24 Feb 2009 - 11:01 am | धमाल मुलगा
डाणबाबा बंगलोरी,
लढ बाप्पू लढ!
एक नंबर पा.कृ. :)
आम्ही साबुदाणा ह्या पदार्थाच्या वाटेलाच जात नाही, (अर्थात स्वयंपाकघरात! डिशमध्ये भरुन समोर आणल्यावर तुटून पडतो ही गोष्ट निराळी ;) ) त्यामुळे आपण हा अवघड गड सर केलेला पाहून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर शतगुणित झाला आहे ह्याची नोंद घ्यावी.
बाकी, उमेद न हरता जिद्दीनं साबुदाणागड सर करताना आपला झालेला 'सर्जा' पाहुन मन भरुन आलं. कृपया आपल्या चरणकमळांचा फोटु धाडून द्यावा :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
24 Feb 2009 - 11:44 am | मनिष
डाणबाबा बंगलोरी -- झेंडाबाड!! :)
पुढच्या कट्टयाला डॉन्याला हेच करायला सांगू!
24 Feb 2009 - 3:15 pm | छोटा डॉन
>>पुढच्या कट्टयाला डॉन्याला हेच करायला सांगू!
मनिषभौ, विचार करुन पहा बॉ , नंतर डॉक्याला शॉट नको व्हायला ;)
जरा गांभिर्याने व पाककॄती ( की पापकॄती ) विच्छेदक नजरेने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की आम्ही फारच थोडे काम केले आहे, हां मात्र आव लै जबरा आणला आहे ह्यात शंका नाही ...
जे काही काम केले त्यात "बिघडवण्याचे प्रमाण" खरोखर लक्षणीय आहे ...
त्रास झाला व डोक्याला शॉट निघाला तो आमच्या मित्रांच्या.
आम्ही मात्र मस्त मज्जा मारली व वर क्रेडीट खाल्ले. ;)
तरीही आपली इच्छा असल्यास आम्ही आपल्याला पुढच्या कट्ट्याला आपल्याला अवश्य थालिपीठ करुन खाऊ घालु असे आश्वासन देतो, मात्र ह्या दरम्यान कट्टेकर्यांना होणार्या छळाची व त्रासाची जबाबदारी आम्ही आत्ताच नाकारत आहोत. ;)
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
24 Feb 2009 - 3:45 pm | धमाल मुलगा
ए दोस्ताहो,
हा कट्टा कधी करताय ते आधीच सांगा रे. त्या दिवशी आमची टैम्प्लिज :D
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
24 Feb 2009 - 3:54 pm | धमाल मुलगा
प्रतिसाद दोनदा प्रकाशित झाल्याने काढून टाकला.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
24 Feb 2009 - 11:02 am | परिकथेतील राजकुमार
खपलो
वारलो
निर्वतलो
थालिपिट, साबुदाणा वडा झालो.....
प्रसादबाबा पुणेरी
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
24 Feb 2009 - 11:31 am | सुक्या
हासुन हासुन मेलो पार. हापीसात लोकं 'सुक्याचं असं कसं झालं. चांगला होता हो बिचारा' असं बोलत माझ्याकड्ं पहात होती.
डानबाबा बंगलोरी . . . लै क्लास.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
24 Feb 2009 - 1:07 pm | भाग्यश्री
एकदम अशीच अवस्था माझीही!! फार भारी लिहीलंय!!
http://bhagyashreee.blogspot.com/
25 Feb 2009 - 7:01 am | चकली
+१
चकली
http://chakali.blogspot.com
24 Feb 2009 - 11:32 am | विनायक प्रभू
मस्तच
24 Feb 2009 - 11:40 am | दशानन
लै भारी बॉ !!!!
=))
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
24 Feb 2009 - 11:49 am | इनोबा म्हणे
आता पाकृ ट्राय करण्यासाठी उपास करायला पायजे.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
24 Feb 2009 - 12:02 pm | अभिज्ञ
डॉन्या,
बरे झाले मी बंगलोर सोडलेय ते.
नाहितर लेका तुझ्या उपासापोटि तुम्ही आमच्याकडून काय काय कामे करून घेतली असतित हे देव जाणे.
:)
अभिज्ञ.
अवांतर- लेख उत्तम.
अति अवांतर- आमच्यात उपवासाला फक्त नॉन वेज खात नाहित. ;)
24 Feb 2009 - 1:01 pm | मराठी_माणूस
बाबाना कोपरापासुन नमस्कार :)
24 Feb 2009 - 1:08 pm | मुक्ता
झोप येत असताना वाचायचा डांबिसपणा केला.झोप उतरली ना खाड्कन.
../मुक्ता
अवांतर: सौलिड्च
24 Feb 2009 - 1:19 pm | अभिष्टा
=))
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
24 Feb 2009 - 1:51 pm | स्मिता श्रीपाद
एकदम झकास हो...हसुन हसुन मेले :-)...
बाकी,साबुदाणा या पदार्थाने मला पण आत्तापर्यंत फार फार छळले आहे...
तुमच्या साबुदाण्यात पाणी जास्त झाले होते..
पण आता पाणी कमी पडल्याने कडकडीत राहिलेल्या साबुदाण्याचा कोणता पदार्थ करु ते पण लिहा हो जरा..:-)
-स्मिता
24 Feb 2009 - 2:09 pm | चटपटीत
<:P डन्या
लय भारी फुटू असता तर भारी वाट्ले असते. थालिपिठ निघाले नाही तर तसेच परतून खिचडी म्हणून खावी.
चटपटीत
24 Feb 2009 - 3:43 pm | घाटावरचे भट
डॉनबाबा बंगाली. ... धन्य आहात.
24 Feb 2009 - 4:44 pm | चाणक्य
=))
24 Feb 2009 - 4:59 pm | लिखाळ
जोरदार रे डॉन्या.. मस्त मजा आली.. अनेक वाक्यांना दाद :)
-- लिखाळ.
24 Feb 2009 - 7:28 pm | शितल
डॉन्या,
=)) =))
१० मि. येड्या सारखी हसते आहे.
24 Feb 2009 - 7:42 pm | रेवती
हे असे थालीपिठ चविष्ट होत असणारच अशी खात्री पटली, ती रेसिपी वाचून नव्हे तर खुसखुशीत लेखनशैलीमुळे.
मस्तच जमलीये भट्टी.....लेखाची!
रेवती
24 Feb 2009 - 11:34 pm | चतुरंग
अरे लेका डॉन्या, तू पाककृती वगैरे लिहिणे म्हणजे स्वतः दाऊदने अडाणा राग गाऊन दाखवण्यासारखं आहे रे!! ;)
पण काहीही म्हण हं आपल्याला जाम आवडली तुझी कृती.
साबूदाण्यात पाणी किती ही बाब, तंबाखू मळताना चुना किती ह्याच्या इतकीच गहन आहे ह्यात शंका नाही (झालंय की नाही एकदम भाईकाका ष्टाईल वाक्य? ;) ). भल्याभल्या सुगरणींनाही ही गोष्ट चकवा देते बर्याचदा, त्यामाने तू खिचडीपासून सुरुवात करुन थालीपीठापर्यंत पोचलास ह्या चिकाटीतच तुझ्या यशाचं रहस्य आहे. असे चार चांगले मित्र हाताशी असणं किती बरं असतं नाही? ;)
पुपाशु!!
(अवांतर - आणि हो एकटा खात नको जाऊस असले पदार्थ धमु आणि ऍडी यांना घ्यावं मदतीला कधीमधी, कामसू आहेत पोरं बिचारी!! ;))
चतुरंग
25 Feb 2009 - 12:33 am | पिवळा डांबिस
अरे तुझी साबुदाण्याची खिचडी/ वडा/ थालिपीठ/ पापड रेसेपी मस्तच!!
शेवटी साबुदाणा हे सत्य, पदार्थाचं नांव हे मिथ्यः!!!!:)
स्वतः दाऊदने अडाणा राग गाऊन दाखवण्यासारखं आहे रे!!
अरे गायलाय की रे त्याने रंगा!!
फक्त हा अडाणा राग नसून "साबुदाणा" राग आहेसं दिसतंय!!!:)
अवांतरः
.....तंबाखू मळताना चुना किती ह्याच्या इतकीच गहन आहे ह्यात शंका नाही . भल्याभल्या सुगरणींनाही ही गोष्ट चकवा देते.
चुना घालून तंबाखू मळणार्या बर्याच सुगरणी तुम्ही पाह्यलेल्या दिसताहेत, भल्याभल्या!!! ;)
25 Feb 2009 - 12:36 am | चतुरंग
चुना घालून तंबाखू मळणार्या बर्याच सुगरणी तुम्ही पाह्यलेल्या दिसताहेत, भल्याभल्या!!!
हो तर काय! अहो तुम्ही आणि डॉन्या जर पाकृ करू शकता तर सुगरणी तंबाखू का मळू शकत नाहीत?? :>
चतुरंग
24 Feb 2009 - 11:43 pm | बिपिन कार्यकर्ते
डान्या.................
क ड क, एकदम कडक. कसला तुफ्फान लिवलाय रे बाबा!!!!!
साला तू साबुदाण्याचं थालिपीठ करत होतास की मित्रांचं रे?
बिपिन कार्यकर्ते
24 Feb 2009 - 11:46 pm | प्राजु
आप महान हो बाबा!
मस्त मस्त रे डॉन भाऊ. इतकं जबरा लिहिलं आहेस ना... खूप खूप मजा आली वाचताना.
तुला म्हणून एक गम्मत सांगते..माझ्या आईचा ना कसलास उपास होता. आणि नेमकं त्या दिवशी तिनं घर आवरायला काढलं होतं.. सगळं आवरल्यावर मला म्हणाली, "तायड्या, साबूदाण्याची खिचडी देशील का करून मला?" माझा विक पॉईंट ना खिचडी. लग्गेच हो म्हणाले. तेव्हा वय वर्ष १२..(अर्थातच माझं)
विचारलं कशी करतात ते. तीने सांगितलं.. तूपाची फोडणी कर, बटाट्याच्या फोडी घाल, मिरच्या घाल, जिरं घाल, आलं थोडं घाल. साबूदाण्याला दाण्याचं कूट, मिठ -साखर लावून घे आणि घाल त्या फोडणीत. वाफ आली की झालं.
मी गेले... आणि मस्त तूपाची फोडणी केली... आणि १५ मिनीटांनी.. मस्त पैकी पिवळ्या रंगाची खिचडी आईला आणून दिली खायला. फोडणीत हळद सुद्धा घातली होती ना...
आईचा मात्र त्या दिवशी फलाहार झाला.. आणि पिवळी असली तरी ती सगळी खिचडी मला खायला मिळाली.. :) मात्र हळद घालून खिचडी केल्यामुळे आईकडून रागावून घेतलं ते वेगळं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Feb 2009 - 12:21 am | समिधा
डॉन्या,
झकासच,
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली अगदी.
25 Feb 2009 - 7:31 am | लवंगी
पोटात दुखतय खूप हसून हसून.
25 Feb 2009 - 11:48 pm | भडकमकर मास्तर
लेट वाचला लेख.. लै ब्येष्ट झालाय... :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/