एयर फ्रायर पाककृती - बरिस्ता (तळलेला कांदा)

केडी's picture
केडी in पाककृती
24 Mar 2017 - 5:50 am

FO1

साहित्य
४ मोठे कांदे
२ चमचे तूप किंवा तेल

कृती
बरिस्ता, किंवा तळलेला कांदा हा बिर्याणी किंवा मोगलाई पाककृतींची लज्जत वाढवणारा. तसेच तो बऱ्याच फ्रेंच, अमेरिकन आणि युरोपियन पाककृतीन मध्ये एक गार्निश म्हणून देखील वापरला जातो. डीप फ्राय करण्यापेक्षा, आता आपण हाच कांदा एयर फ्रायर मध्ये अगदी कमी तेलात तेवढाच चविष्ट आणि रुचकर बनवू शकता! हा असा कुरकुरीत तळलेला कांदा एका हवाबंद डब्यात भरून फ्रिज मध्ये ठेवल्यास अगदी एक महिना सुद्धा सहज टिकतो.

कांदे शक्य तेवढे पातळ उभे चिरून घ्या. चिरून झाले कि ते काप सुटे करून, ताट चांगले तास ते दोन तास कडक उन्हात ठेवा. [अधून मधून कांदे वर खाली करून घ्या. ह्याने ते थोडे वाळतील, आणि एयर फ्रायर मध्ये पटकन तळून होतील].

Step1 Step2

Step3 Step4

एयर फ्रायर १४० डिग्री C वर ५ मिनिटे प्री-हिट करून घ्या. कांद्याच्या कापां मध्ये २ चमचे तूप अथवा तेल घालून, ते सगळीकडून कांद्याच्या कापांना लागेल असे हाताने अलगद हलवून घ्या.
Step5 Step6

एयर फ्रायर च्या बास्केट ला तेल/तूप लावून, कांदे त्यात टाकून साधारण २० ते २५ मिनिटे कांदे तळून घ्या. दर ५ मिनिटांनी एकदा उघडून कांदे वर-खाली करून घ्या. खमंग बदामी रंगाचे झाले कि बाहेर काढून गार करत ठेवा. गार झाले कि डब्यात भरून फ्रिज मध्ये ठेवा, आणि लागतील तसे वापरा!
Step7 Step8 Step9

हे असे तळलेले कांदे (आणि लसूण) पोह्याच्या चिवड्यात सुद्धा छान लागतात. पण आता असे एयर फ्रायर मध्ये तळून गिल्टफ्री एन्जॉय करता येतील! शौकीन लोकांनी, ह्या अश्या तळलेल्या कांद्या मध्ये थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून, एकदा बियर सोबत घेऊन बघा, एक उत्तम चकणा होऊ शकतो! [हे मसाले आणि मीठ, कांदे गरम असतानाच वरून भुरभुरावे, म्हणजे ते कांद्याला नीट लागतील]

FO2

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

24 Mar 2017 - 6:01 am | पिलीयन रायडर

घ्यावाच लागणारे हा एयर फ्रायर.. तुम्ही लोक असे जादुचे प्रयोग केल्यासारखे काय काय दाखवताय.. सहन होत नाही आता!!

एस's picture

24 Mar 2017 - 6:39 am | एस

+

+११११११११११११११११११११११११११११११…!

भयंकर अत्याचार आहे हा!

तुम्ही लोक असे जादुचे प्रयोग केल्यासारखे काय काय दाखवताय..

जादूचे प्रयोग....:-)) :-))...लोल.....

प्रीत-मोहर's picture

24 Mar 2017 - 3:24 pm | प्रीत-मोहर

+११

विनटूविन's picture

2 Apr 2017 - 9:03 pm | विनटूविन

फोटो इतके आकर्षक आहेत ना की बस!

पैसा's picture

24 Mar 2017 - 11:47 am | पैसा

भारी!

सुरेख फोटू व मस्त प्रयोग.

स्वाती दिनेश's picture

24 Mar 2017 - 11:36 pm | स्वाती दिनेश

असा कांदा ए फ्रा मध्ये करून ठेवते मी सुध्दा , पटकन वापरता येतो.
स्वाती

प्राची वैशंपायन's picture

25 Mar 2017 - 7:48 am | प्राची वैशंपायन

काय अफलातुन दिसतोय कांदा हात घालुन काढुन घ्यावासा वाटतोय .

बाबा योगिराज's picture

26 Mar 2017 - 8:58 pm | बाबा योगिराज

क्या बात केडी भौ, तुमच सगळच भारी असतय.

केडी's picture

26 Mar 2017 - 9:37 pm | केडी

_/\_
_/\_

सप्तरंगी's picture

30 Mar 2017 - 6:57 pm | सप्तरंगी

तुमच्या पाककृती आणि फोटोज मस्त असतात..

केडी's picture

31 Mar 2017 - 8:40 am | केडी

_/\_ थोडा प्रयत्न करतो, तरी अजून बरंच शिकायचं राहिलाय.....अन्न हे चवीला आणि डोळ्याला देखील उत्तम असले पाहिजे....

सप्तरंगी's picture

6 Apr 2017 - 6:28 pm | सप्तरंगी

चायनीज भेळ

अन्न हे चवीला आणि डोळ्याला देखील उत्तम असले पाहिजे

मान्य... मी एअर फ्रायर मध्ये बरेच काही बनवले त्यातलीच एक मस्त चटपटी चायनीज भेळ . एरवी तेलाचे प्रमाण पाहता मी कधीच तळून करायचा उहापोह केला नसता. हे शक्य झाले एअर फ्रायर मुळेच. पाककृती अगदीच सोपी पण लिहिण्याचे काम मला फार कंटाळवाणे वाटते त्यापेक्षा बनवणे आणि बनवून खाऊ घालणे सोपे !!

काय सुंदर आलाय फोटो भेळेचा...ह्याची पाककृती लिहाच तुम्ही....

सप्तरंगी's picture

21 Apr 2017 - 6:32 pm | सप्तरंगी

लिहिते ..

अत्रन्गि पाउस's picture

5 Apr 2017 - 3:05 pm | अत्रन्गि पाउस

वाचली नाहीये आणि फोटो तर अजिबात बघितले नाहीयेत ....

नाही नाही नाही

केडी's picture

6 Apr 2017 - 10:41 am | केडी

:-)) :-)) :-))

रुपी's picture

6 Apr 2017 - 1:01 am | रुपी

भारीच दिसत आहे! मस्त!

सत्याचे प्रयोग's picture

8 Apr 2017 - 7:24 pm | सत्याचे प्रयोग

मावेत करता येईल का

नूतन सावंत's picture

19 Apr 2017 - 6:44 pm | नूतन सावंत

एअर फ्रायर घेलच पाहिजे आता,केडी.तुमच्या फोटोन श्रेय द्यायला विसरणार नाही

मितान's picture

21 Apr 2017 - 6:51 pm | मितान

मस्त मस्त मस्त !
मुरमुऱ्याचा साधा चिवडा आणि त्यावर असे कांदे !! अहाहा !

असंका's picture

8 Mar 2020 - 7:02 pm | असंका

जवळ जवळ ३ वर्ष झाली.
काही नवीन माहिती या काळात? अजुनही व्यवस्थित कार्यरत?

उत्तरासाठी आगाउ धन्यवाद....

केडी's picture

22 Mar 2020 - 10:20 am | केडी

अजून जीव आहे!
☺️

अगदी पर्वा एयर फ्रायर मध्ये हॉट चिकन विंग्स बनवले।
माझा फ्रयर बिघडलं तो माझ्या हलगर्जीपणामुळे। चुकून पडला, त्यामुळे ते खालचे भांडे आत सरकेना। पण दुरुस्त करून आणला आणि मस्त चालतोय।

फिलिप्स ची क्वालिटी मला तरी आवडली। उत्तम सुरू आहे, आणि वापर देखील करतो आहे

चौकस२१२'s picture

9 Mar 2020 - 4:34 am | चौकस२१२

केडी, आपण अजून मिपा वरील संदेश बघता कि नाही ते माहित नाही ...
पण काही प्रश्न आहेत कदाचित आपण बघाल
१) एयर फ्रायर हे उपकरण मस्तच आहे .. पण माझा आणि त्याचा काही जमत नाही... आत्ता पर्यंत 2 वेळा घेतला आणि परत केला कारण त्यातील जे भांडे असते ते खूप पातळ असते आणि त्याचे नॉन स्टिक आवरण फार पटकन निघाले ( सगळी काळजी घेऊन सुद्धा )
कदाचित फिलिप किंवा टिफाल सारख्या चांगल्या ब्रँड चा नाही घेतला म्हणून असेल! पण त्याचे पण भांडे बघितले ते हि खूप पातळ असते !
आपण कोणत्या ब्रँड चा वापरला आहे?
२) बरेचदा एयर फ्रायर मध्ये पदार्थ फार कोरडा होतो ! तर तो शिजलेले खुसखुशीत पण आतून रसाळ कसे ठेवायचे ?( कोंबडी चे तुकडे बाहेरून खुसखुशीत पण आतून शिजलेले आणि रसाळ)
३) स्लो कुकर या साधनांचा वापर आपण करता का? भारतीय पदार्थांना तो चांगलं उपयोगी पडेल असे वाटते आपला काही अनुभव ?
४) धुरी देणे ( स्मोक्ड ) मास हा प्रकार भारतीय जेवणात तास फारसा नसतो ( तंदूर नव्हे) तर त्या वर काही भारतात जमतील अश्या पाककृत्या ?
दुकानात तयार धुरी दिलेले कोंबडी चे मास मुंबई आणि दिली ला बघिले होते .
5) आपण बहुतेक पुण्यात राहता असे दिसते ( आपल्या ब्लॉग वरून) मग बरेचदा मी ज्या पाकक्रिया लिहितो त्यात जे साहित्य असते ते सहज पणे पुण्यासारहाय मोठ्या शहरात सुद्धा उपलब्ध असते कि नाही हे कळत नाही उदाहरण पर्वा हालिपिन्यो मिरच्या सुचवल्या एका पदार्थात पण ती पुण्यात/ भारतात मिळते कि नाही हे माहित नसल्यामुळे बऱ्याच मिपाकरांना त्या पाकक्रियेचा फारसा उपयोग होत नाही असे दिसते ( गंमत म्हणजे बाटलीवर बघितले तर मेड इन इंडिया होते ! एक्स्पोर्ट साठी!)
6) पदार्थांवरून आठवले "सामन" जातीचे मासे भारतात मिळतात का ( म्हणजे आयात केलेले नाही तर स्थानिक)

१. माझा व्यवस्थित सुरू आहे। बहुदा फिलिप्स ची क्वालिटी चांगली असावी
२. चिकन साठी ब्रायनिंग वरचा माझा लेख वाचा। चिकन आधी १८० डिग्रीला १५ ते २० मिनिटे आणि नंतर ५ मिनिटे २०० ला। अर्थात चिकन ब्रेस्ट ही लिन असते त्यामुळे लवकर शिजते। त्यामुळे अजून प्रयोग प्रयत्न करत राहिले तर जमेल।
३. अमेरिकेत असताना होता। आता भारतात गरज वाटत नाही
४. आहेत खूप। साधा बांगडा मीठ हळद तिखट लावून, केळीच्या पानात गुंडाळून निखार्यावर भाजून बघा। घरत गॅस वे जलुटून त्यावर कोळसे ठेऊन ते चांगले निखारे झाले तर हे करता येईल।
५. पुणे तिथे काय उणे! पुण्यात सगळं मिळत। amazon. in वर चेक करा।
६. डॉक्टरांनी उत्तर दिलंय। रावस म्हणजे सामन। अटलांटिक सामन, दोराबजी कडे फ्रोझन सेक्शन मध्ये बघतील होता हल्लीच, अगदी कॉर्निश हें सुद्धा मिळतात

केडी's picture

22 Mar 2020 - 10:46 am | केडी

४. गॅस वर जाळी ठेऊन असे वाचावे

चौकस२१२'s picture

22 Mar 2020 - 4:32 pm | चौकस२१२

धन्यवाद
धुरी स्मोकइड हे बरेच तास ठेवून स्मोक बॉक्स मध्ये होते..(खाली ठराविक लाकडाची साले टाऊन) ती असे गॅस वर ठेवून तीच परिणाम होईल का? वाटत नाही
तसे निर्णयांची पण कोळसा आणि वर तूप असे करतात पण तशी धुरी मी म्हणत नवहते
सामान .. फ्रोझन इंपोर्टेड नाही मी स्थानिक म्हणत होतो ...

सुबोध खरे's picture

9 Mar 2020 - 10:42 am | सुबोध खरे

"सामन" जातीचे मासे
आपल्याकडे रावस म्हणतात ते सामन जातीचे मासे आहेत.

चौकस२१२'s picture

9 Mar 2020 - 10:51 am | चौकस२१२

परंतु तो खरंच अटलांटिक सामन सारखा लागतो का चवीला आणि तसा गुलाबी दिसतो का ? रंगाने ?
विचारण्याचे कारण असे कि अटलांटिक किंवा न्यूझीलंड चा सामन कच्चा (पातळ काप) किंवा स्मोक्ड खाता येतो तसा हा भारतीय सामन खाता येतो का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2020 - 10:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा कसं काय बघायचा राहिला. जबराय भो.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

9 Mar 2020 - 12:16 pm | सुबोध खरे

परंतु तो खरंच अटलांटिक सामन सारखा लागतो का चवीला आणि तसा गुलाबी दिसतो का ? रंगाने ?
विचारण्याचे कारण असे कि अटलांटिक किंवा न्यूझीलंड चा सामन कच्चा (पातळ काप) किंवा स्मोक्ड खाता येतो तसा हा भारतीय सामन खाता येतो का?

माहिती नाही.

अटलांटिक किंवा न्यूझीलंड चा सामन काही खाल्लेला नाही. युरोपात खाल्लेला मासा सामन होता का हेहि माहिती नाही

परंतु एकंदर जगात असलेले प्रदूषण आणि जंतू पाहता "कोणत्याही तर्हेचे मांस कच्चे खाऊ नये" असाच सल्ला तज्ज्ञ देतात.

बाकी जपानी सुशी हा पारंपरिक पदार्थ फार लोकप्रिय आहे परंतु मी काही त्याच्या नादाला लागलो नाही.

चौकस२१२'s picture

23 Mar 2020 - 9:37 am | चौकस२१२

चिकन ब्रेस्ट ही लिन असते
हो ते खरे आहे .. आणि सुरवातीला मी पण ती घायचो कारण भरपूर बिना हाडाचे मास.. म्हणून मग नंतर लक्षात आलं कि चवीला आणि बिन हाडाचे असे म्हणजे चिकन चे थाय ( मांडी ) फिले ..जास्त रुचकर लागतात ...