मराठी दिन २०१७: हरसाल (झाडीबोली)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in लेखमाला
24 Feb 2017 - 7:06 am

1
.

मंग असी गरमी वाहाडत जाते
मंग असा संध्याकाडी पाऊस पडते
मंग असे बत्तर बायेर पडतेत
मंग असे कावरल्यावानी करतेत
मंग असे सकारवरी मरून जातेत
मी तई घिवाऱ्या खात रायतो
मी तई आमरस पीत रायतो

मंग असा धुव्वाधार पानी पडते
मंग असा नाल्याइले लगीत पूर येते
मंग असा जगासीन संपर्क तुटते
मंग असे सबइचे बाप वसुदेव बनतेत
मंग असे सब पोट्टे किसन बनतेत
मी तई घरी कानोबा मांडत रायतो
मी तई लोकाइले बुजली वाटत रायतो

मंग असी फसल तयार होते
मंग असी एकाखट्टे विकाले जाते
मंग असा बाजारभाव धपकन पडते
मंग असा जबरदस्ती धान विका लागते
मंग असा किस्तवारी पैसा मिडत रायते
मी तई माया घरी देवपूजा कराले बसतो
मी तई गावागावात मंडई पावाले जातो

मंग असी तपन वाहाडात जाते
मंग असी हिईर आटत जाते
मंग असे हंडेगुंड्या एकाच हिईरीवर दिसू लागते
मंग असा इरभर पानी ओलत जावा लागते
मंग असा बुडबुड गंगा आंग धुवा लागते
मी तई पुरणाची पोडी बनवाले बसतो
मी तई होरीचा रंग खेलाले परतो

मंग असा हरसाल असाचा असाच होत रायते
मंग असी मानसाची उमर वाहाडातच रायते
मंग असा चयरा बदलते, मंग असा नाव बदलते,
तई नावाचेयर्‍यामंगाचा मानूस तसाचा तसाच रायते

-- स्वामी संकेतानंद

शब्दार्थ :-

बत्तर :- पंख फुटलेली वाळवी
कावरल्यावानी:- अधाशासारखे
घिवारी:- गव्हातांदळाच्या पिठाचे घावन( विशेषतः आमरसासोबत खातात)
कानोबा:- कृष्ण, जन्माष्टमीला दिड दिवसाचा कृष्ण बसतो आमच्याकडे
बुजली:- गव्हाचे कोवळे रोप. कृष्णविसर्जनानंतर एकमेकांना वाटतात. खास परडीत ही बुजली तयार केलेली असते
किस्तवारी:- हप्तेवारी
मंडई : जत्रा
तपन: ऊन
इरभर: दिवसभर
पानी ओलने : पाणी शेंदणे
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Feb 2017 - 7:20 am | पैसा

खूप छान स्वाम्या!

प्राची अश्विनी's picture

24 Feb 2017 - 8:14 am | प्राची अश्विनी

फारच सुंदर. ही ऐकायला आवडेल.

मितान's picture

24 Feb 2017 - 8:19 am | मितान

स्वामी लै भारी रे !!!

बबन ताम्बे's picture

24 Feb 2017 - 11:17 am | बबन ताम्बे

खूपच छान कविता. आणि व्यथा देखील सुंदर मांडली आहे कवितेच्या रुपाने.

सूड's picture

24 Feb 2017 - 11:52 am | सूड

सुंदर. यानिमित्ताने त्याभागातले पदार्थ रीतभाती कळल्या, एरवी आम्हाला फक्त गणपतीच माहिती दीड दिवसाचे!! घिवाऱ्या वाचल्यावर मला साधारण काहीतरी घीवर सारखं वाटलं.

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 12:39 pm | संदीप डांगे

मेरा स्वामी महान!

मंग मी स्वाम्याच्या चरनावर डोस्कं टेकत असतो
मंग मी स्वाम्याची किरती लोकायले सांगत असतो.

पद्मावति's picture

24 Feb 2017 - 12:43 pm | पद्मावति

अप्रतिम!!
मंग असे सबइचे बाप वसुदेव बनतेत
मंग असे सब पोट्टे किसन बनतेत
_^_

प्रीत-मोहर's picture

24 Feb 2017 - 12:45 pm | प्रीत-मोहर

क्लास!!

मित्रहो's picture

24 Feb 2017 - 1:45 pm | मित्रहो

काही शब्द नवीन वाटले
बत्तर आम्ही हा शब्द अतिशय खराब म्हणून वापरतो. बत्तर जमीन
बुजली पण ऐकला नव्हता. बुजली आणि उंबइ यात काय फरक, आम्ही गव्हाच्या कोवळ्या रुपाला (फक्त गव्हाचा दाणा नाही तर ते संपूर्ण बोंड किंवा शेंग) उंबइ म्हणतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2017 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! एका आख्ख्या वर्षाच्या जीवनप्रवाहाचे एका छोट्या कवितेत चित्रण करण्याचे भारी कसब !

सस्नेह's picture

24 Feb 2017 - 2:57 pm | सस्नेह

असेच म्हणते !

सविता००१'s picture

24 Feb 2017 - 2:52 pm | सविता००१

मस्तच रे............

चिगो's picture

24 Feb 2017 - 3:52 pm | चिगो

बम जमली ना कविता तुमची, स्वामीजी.. येकदमच.

इडली डोसा's picture

25 Feb 2017 - 5:11 am | इडली डोसा

शेवटी एक हुरहुर जाणवते..

रुपी's picture

25 Feb 2017 - 5:55 am | रुपी

खूप सुंदर!

खूपच सुंदर..ह्याचे वाचन करुन टाका इथं

एमी's picture

27 Mar 2017 - 10:00 am | एमी

O:-)