Android and Lumia साठी एक पान खर्ची घातलेच आहे. Apple Product ची माहिती संग्रहीत व्हावी या उद्देशान हा लेख लिहीत आहे.
ipad mini 4 विकत घेण्याचा विचार चालू आहे. त्यासंर्धबात काही प्रश्न आहेत ते पुढीलप्रमाणे:
मी OTG cable वापरु शकतो का?
Android चे free app आहेत ते iphone or ipad साठी मिळतील का?
Jail Break केल्यानंतर warranty शिवाय इतर काही नुकसान?
आपलेही काही प्रश्न व आपल्याकडील माहिती शेयर करावी ही नम्र विनंती.
प्रतिक्रिया
9 Jan 2016 - 8:57 pm | सत्याचे प्रयोग
आम्ही Android भक्त IOS, WINDOS चा विचार पण येत नाही बुवा. तसा ipod बक्षिस मिळालाय कधीतरी वापरतो.
10 Jan 2016 - 12:04 am | मास्टरमाईन्ड
Android चे Free अॅप IOS वर बहुधा मिळतातच पण खात्रीशीररित्या "मिळतातच" असं सांगू शकत नाही. कारण IOS, Android आणि Windows या वेगवेगळ्या Operating systems असल्यानं प्रत्येकासाठी अॅप त्या त्या भाषेत लिहावं, बांधावं (build) आणि Compile करावं लागत असल्यानं सदर अॅपच्या मालकाच्या मर्जीवरच ते अवलंबून आहे. बहुतेक प्रसिद्ध अॅप ही Android आणि IOS वर उपलब्ध असतात. Windows चा फोन स्वतः वापरून माहिती नाही पण प्रसिद्ध अॅप तिथेही उपलब्ध असावीत असा अंदाज आहे.
अॅपलच्या iPhone, iPad, iPad mini इ. उत्पादनांमध्ये आज पर्यंततरी Apple नं स्वतः कडून OTG cable किंवा USB Slot दिल्याचं दिसत नाही (माझी माहिती iPhone 6 आणि iPad 3 पर्यंतच मर्यादित आहे)
महत्त्वाचं:
तुम्ही jail break का करणार आहात?
कारण jail break करणं म्हणजे गरजेपोटी घरासमोरच्या चावीवाल्याकडून / कुलूप न तोडता उघडणार्याकडून कुलूप उघडून घेणं आणि त्याच कुलुपाचा वापर पुढे चालू ठेवण्यासारखं आहे. तुम्ही मुख्य Operating system च्या संरक्षण व्यवस्थेला छेद देऊन iPad वापरताय असं होतं. अशा iPad mini वरून तुम्ही तुमची ईमेल, ऑनलाईन बँकींग, इतर ऑनलाईन सुविधा जिथे पासवर्डची सुरक्षितता दिलेली आहे यांचा वापर करणार असाल तर योग्य नाही. कारण तुम्ही कुठलाही jail break केलेला फोन / टॅब्लेट वापरत असाल, वापर करणार असाल तर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत माहितीची सुरक्षितता स्वतःहून धोक्यात आणण्याच्या दिशेनं एक वेगवान पाऊल टाकताय असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
warranty तर जाईलच पण वर दिलेल्या सुविधांशी संबंधित तुमची व्यक्तिगत माहिती चोरी होण्याची दाट शक्यता आहे.
Jail Break ची प्रणाली विकसीत करणार्यांचा हेतूच हा असतो की जास्तीत जास्त लोकांनी हे वापरावं आणी आपल्या हातात आयती घरबसल्या या लोकांची माहिती यावी.
10 Jan 2016 - 4:29 pm | NiluMP
धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल
11 Jan 2016 - 5:44 pm | नया है वह
jail break आणि root मधे काय फरक आहे?
11 Jan 2016 - 8:32 pm | मास्टरमाईन्ड
Root करायला पण Third party modules उपलब्ध आहेत.
बाकी सगळी कहाणी jail break चीच.
थोडक्यात असं आहे,
Jail Break काय किंवा Root काय, दोन्हीही प्रकारांनी आपण त्या त्या उपकरण निर्मात्यांनी घातलेली तांत्रिक बंधनं त्यांच्या परवानगीशिवाय झुगारून उपकरणाचा वापर करू इच्छितो. त्यासाठी (बहुधा) तिसर्याच कुणीतरी बनवलेली आयुधं (facilities) वापरतो. तसं करताना आपण कळत नकळत आपल्या उपकरणात "धोकादायक असलेल्या कुणालातरी" (Unknown fatal entity) प्रवेश देत असतो.
परिणाम.... तुम्ही विचार करू शकता.
:)
11 Jan 2016 - 8:22 pm | मास्टरमाईन्ड
.
24 Jan 2016 - 7:21 pm | श्रीधर
शक्यतो jailbraik करू नये खूप खराब अनुभव आहे माझा
त्याचे दुस्परीनाम असे आहेत कि battery म्हणावी अशी चालत नाही सारखे चार्जर घेवून फिरावे लागते
आणि आपणास कोण कोणते अप्स लागतात किव्वा तुम्ही आता android ला वापरता त्याची यादी द्या मी सांगतो
2 Feb 2017 - 10:48 pm | गामा पैलवान
मी आत्तापर्यंत कारामुक्त केलेली सगळी आयोएस उपकरणं व्यवस्थित चालली आहेत. माझा अनुभव एकदम मस्त आहे. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की ६४ अंगुली यंत्रावर चालणारी आयोएस १०.२ करमुक्त करण्यास यश आलं आहे ( = 64 bit devices running iOS 10.2 can be jailbroken). नुकताच सहा एस+ यालू वापरून कारामुक्त केला. व्यवस्थित चालू आहे.
-गा.पै.
3 Feb 2017 - 7:51 pm | गामा पैलवान
हाहाहा! नियतीचा न्याय म्हणतात तो हाच. सेलेब्राईट नामक आस्थापनाने संकेतबद्ध (एनक्रिप्टेड) आयफोन उलगडायला मदत केली होती. तर त्यांच्याच राशीसेवकांवर (डेटा सर्व्हर्सवर) डल्ला मारला गेला आहे. अधिक माहिती : http://www.redmondpie.com/firm-that-helped-fbi-break-into-san-bernardino...
वरील बातमीनुसार अनेक अवजारे (टूल्स) चोरली गेलेली आहेत. आस्थापनाच्या कथनानुसार आयफोन कारामुक्त (जेलब्रेक) करायच्या पद्धती या अवजारांत वापरल्या गेलेल्या आहेत. ये हुई ना बात! कारामुक्ती की जय!!
-गा.पै.
3 Feb 2017 - 8:05 pm | आदूबाळ
आईच्या फोनसाठी मराठी कीबोर्ड सुचवेल का कोणी? अगदी गमभन नसला तरी गूगल इंडिक टैपही चालेल.
3 Feb 2017 - 11:56 pm | गामा पैलवान
आदूबाळ,
आयोएसीत मराठीचा कळफलक आहे की.
आ.न.,
-गा.पै.
4 Feb 2017 - 1:14 am | आदूबाळ
कुठे आहे? कसा काढायचा ?
4 Feb 2017 - 1:32 am | गामा पैलवान
आदूबाळ,
इथे जाऊन मराठी शोधा :
सेटिंग्ज --> जनरल --> कीबोर्ड --> कीबोर्ड्स --> अॅड न्यू कीबोर्ड
मराठी वापरास शुभेच्छा :-)
आ.न.,
-गा.पै.