हा बेळगावच्या एका खेडेगावातल्या यात्रेमध्ये टिपलेला हा एक क्षण
ट्रेनमधून बेळगाव ला जाताना एक ब्रिज लागतो जाडा वेळ नाही मिळाला सेटिंग्स सेट करायला .किमान काय सेटिंग हवी होती पाण्यावरील सूर्यकिरणे टिपण्यासाठी ?
हा असाच क्लीक केला रेल्वे क्रॉसिंग पास करताना कॅमेरा हातात असला कि हात गप्प बसवत नाही :)
हा फोटो ट्रेनमधून काढला आहे त्यामुळे हवा तास अँगल नाही मिळाला . पण दृश्य मस्त होत डोळ्यात मात्र साठवलं कॅमेऱ्यात नाही आलं तरी .
मध्ये काही कारणाने ट्रेन थांबली होती पुढे काही तरी काम सुरु होत इंजिन जवळचाच डब्बा होता आमचा खाली उतरलो फोटो काढण्यासाठी.अजून अर्धा तास तर लागणार होता ट्रेन सुटण्यासाठी असं कळलं बाजूला शेती होती तिथे गेलो जरा हातपाय धुऊन लगेच आलो बाहेरच थांबलो होतो . तेव्हा हा काढलेला फोटो शेतावरील काम आटपून लोक जेवण करण्यासाठी पलीकडे जात होती कारण तिकडे पाण्याची सोय होती .
हा असाच एक फोटो आठवण म्हणून आंमची ओळख ट्रेनमध्येच झाली म्हणून कॅन्डीड फोटो काढायचं धाडस केल .तिला विचारूनच इथे पोस्ट केला आहे
हि ट्रेन पास झाली तेव्हा कुठे आमच्या ट्रेन चा रूट क्लीअर झाला तरी या ट्रेन मुले २ फोटो भेटले
प्रतिक्रिया
13 Jan 2017 - 1:50 pm | पैसा
फोटो आवडले.
13 Jan 2017 - 6:13 pm | मोदक
दोन नंबरचा फोटो उगार खुर्द ते कुडची या दोन स्टेशन दरम्यान कृष्णा नदीवरील पुलावरून काढलेला आहे.
या पुलावर ट्रेन एकदम हळू वेगाने जाते. पुढच्या वेळी स्टेशन आले की कॅमेरा सेट करून बसा..
14 Jan 2017 - 12:29 pm | मयुरMK
हो पुढच्यावेळी तयारीत राहीन :)
13 Jan 2017 - 7:12 pm | एस
तुम्ही पोस्ट प्रोसेसिंग जरा जास्त करताय. गरज नाहीये. सुरुवातीला फक्त कॅमेरा व लेन्स वापरून जास्तीत जास्त चांगले फोटो काढायचा प्रयत्न करा. पोस्ट प्रोसेसिंग नंतर कसे आणि कितपत करायला हवे हे आपोआप कळेलच.
इथे फोटो डकवताना फक्त width=640 इतकेच द्या. height देऊ नका. म्हणजे फोटो डिस्टॉर्ट होणार नाहीत.
14 Jan 2017 - 12:29 pm | मयुरMK
हो पुढच्यावेळी शक्यतो पोस्टप्रोसेसिंग टाळेन
15 Jan 2017 - 1:39 pm | मदनबाण
छान... एस यांच्याशी सहमत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey