बायका पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पुरुष सिगरेट पितात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत सिगरेट फुकणार्या बायका स्वतःला पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात .मग बायकाही त्यांचे अनुकरण करतात.शोभत नसेल तरीही जिन्स टीशर्ट घालून फिरणार्या बायका सर्रास दिसतात.पुरुषाला ऑल डेनिम माचो लुक देते,तसा क्वचीत बायकांना असा लुक कॅरी करता येतो.पण नाही, पुरुष करतात ,तर आम्हीही करणार,हा अट्टाहास कशासाठी?
३. पुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि .पण बाजारत गिअरलेस गाड्यांची फौज उभी असताना या बायकांनाहि मोटार सायकल चालवायची असते.भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही चवळीच्या शेंगा बुलेटही चालवतात ,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच गाडी चालवतात
४फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.पण घुसघोरी करणार नाही त्या बायका कसल्या.वडील,भाऊ,आणि नवरा यांना बकरा बनवून कारमध्ये शेजारी बसवले जाते,इतर वेळी मल्टीटास्कींग असणार्य बायका मात्र इथे गडबडतात.ॲक्सलेटर दे असे सांगितले की ब्रेक देतात व ब्रेक दाबायला सांगितले की ॲक्सलेटर देतात.आणि वर यांना ऑटोमॅटीक कार नको असते,यांना हवी असते स्टीक शिफ्ट कार.मग चढावर गाडी थांबल्यावर यांना हाफ क्लच द्यायचे सुचत नाही.मग कार मागे जायला लागली की यांना इंजिनचा आवाज कमी व स्वतःच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला येतात.अरे काय वेडेपणा आहे हा?
५.दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल बायकांनी त्यात प्राविण्य मिळवले आहे ,इतके की बिअर मागवली की त्यात सोडा टाका ही त्यांची फर्माईश असते.
तर बायकांनो जरुर पुरुषांना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.पुरुषांचे एकच उदाहरण देतो,पाककला हा बायकांचा प्रांत ,पण पुरुषांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश जगप्रसिद्ध शेफ हे पुरुष आहेत.उदा.भारतात संजीव कपूर,जागतिक पातळीवर गॉर्डन रॅमसे.
तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,men are men .
प्रतिक्रिया
20 Nov 2016 - 6:29 pm | यशोधरा
जिनियस! सिंथेटीकली.
20 Nov 2016 - 9:57 pm | माहितगार
<पुरुष बायकांची बरोबरी का करतात> हे राजेश घासकडवींकृत सुडंबन लेखक महोदयांना त्यांची टर्बॉलॉफी चार्ज करण्यास उपयूक्त ठरावी आणि त्यांच्या नजरेतून अनवधानाने सुटू नये म्हणून दुवा येथे डकवत आहे.
20 Nov 2016 - 6:52 pm | आदूबाळ
आज मिपाचा हॅपी अवर वगैरे आहे का? सकाळपासून दोन कातिल धागे आलेत.
20 Nov 2016 - 6:56 pm | यशोधरा
अगदी, अगदी.
20 Nov 2016 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिला फ्री आणि त्या एकावर एक फ्री, अशी डबल बेनेफीट स्कीम आहे. =))
20 Nov 2016 - 7:16 pm | पिलीयन रायडर
मस्त!!
आता मुंबै वि. पुणे!!
20 Nov 2016 - 7:27 pm | कंजूस
पुरुष मागे पडू नयेत म्हणून .
20 Nov 2016 - 9:56 pm | पिलीयन रायडर
ठ्ठो!!!
20 Nov 2016 - 7:33 pm | बोका-ए-आझम
१.टाऊन विरूद्ध सबर्ब्ज
२. नदीअल्याडचे पुणे विरूद्ध पेठांमधले पुणे
३. म्हातारा महंत विरूद्ध बाकीचे सगळे (याला रेफरी मी. बाकी सगळे तराट झाल्यावर एक शुद्धीवर नको?)
४. चहा विरूद्ध काॅफी
५. सुरती उंधियूं विरूद्ध कांदिवली/बोरिवली इ. अहमदाबादच्या उपनगरांत मिळणारा उंधियूं
बाकीच्यांनी सुचवा आता.
20 Nov 2016 - 9:19 pm | पुंबा
आणि एव्हरग्रीन शाकाहार वि. मांसाहार
म्हणजे महिनाभराची निश्चिती..
20 Nov 2016 - 9:45 pm | अभिजीत अवलिया
लग्नाच्या बाजारात मुलांच्या अपेक्षा विरुद्ध मुलींच्या अपेक्षा
21 Nov 2016 - 5:05 pm | नाखु
मुलांच्या (आईवडीलांच्या अलिखित पण ठांम) अपेक्षा विरुद्ध मुलींच्या (आईवडीलांच्या अलिखित पण ठांम)अपेक्षा समाविष्ठ आहेत काय? नसल्यास त्याचे गुर्हाळ वेगळे लावावे तेही बारा महिने चालते.
तुम्ही हे लावाच टक्याला पाचशेचा अनुभव आहे.
मिपा ष्टॅण्डावरील वायफळ मळा ते भिंतीच्या तुंबड्या या बशीत जागा न शोधणारा
प्रवासी नाखु.
21 Nov 2016 - 5:47 pm | टवाळ कार्टा
ना खूनी चाचा...पाश्शे प्रीतीसादांचा पर्तिसादांचा अनूभव आहे असे पश्ट ल्हिआ...
22 Nov 2016 - 9:02 am | नाखु
मी प्रीतीसादांचा प्रतीसादांचा अनुभव असेच म्हणत होतो.
खुलाश्यातील खलाशी नाखु
20 Nov 2016 - 7:36 pm | पैसा
ईश्श्य!!
20 Nov 2016 - 7:37 pm | संदीप डांगे
स्वतःचे अगदी पर्सनल प्रॉब्लेम आंतरजालावर टाकू नये असं म्हटलं जातं.
20 Nov 2016 - 7:45 pm | झेन
आधीच नोटाबंदी त्यात म्हणे हिमेश रेशमीया नवीन सिनेमा काढतोय आणि आता हा धागा, उपरवाले ऊठाले रे बाबा ...
20 Nov 2016 - 8:20 pm | धर्मराजमुटके
याचा बदला म्हणून पुरुषांना स्कर्ट आणी टॉप वापरायचा सल्ला दिला तर चालेल काय ?
20 Nov 2016 - 8:24 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
याचा बदला म्हणून पुरुषांना स्कर्ट आणी टॉप वापरायचा
सल्ला दिला तर चालेल काय ?>>>>> इमिटेशन रुट फिमेल टू मेल आहे.मुद्दा असा आहे की बायका पुरुषांना बेंचमार्क का मानतात? त्यांचे स्वतःचे काही इन्व्हेंशन का करत नाहीत.
20 Nov 2016 - 8:26 pm | nanaba
तुम्हीही त्यांची बरोबरी करा.
साडी नेसा पंजाबी ड्रेस स्कर्ट ए लाईन ड्रेस घाला.
जास्त टशन दाखवायची असेल तर सासुरवाडीला रहायला जा. नोकरी करता करता सासू सासरे मेव्हण्याशी जुळवून घेत घेत स्वैपाक पाणी मुले सांभाळणे इतर घरकाम करा.
अडनाव नाव बदलून बायकोचे लावा. तिच्या नावचे कुंकू मंगळसूत्र वगैरे घाला.
अगदी नाकावर टिच्चून तुम्हीही त्याची बरोबरी करा.
अरे हाय काय अन नाय काय!
21 Nov 2016 - 4:58 pm | निरंजन._.
21 Nov 2016 - 4:58 pm | निरंजन._.
21 Nov 2016 - 9:55 pm | पिलीयन रायडर
=))
20 Nov 2016 - 8:58 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तुम्हीही त्यांची बरोबरी करा.>>>>>> हे आर्ग्युमेंट नाही होत हो ,आर्ग्युमेंट कसे करायचे ते ही आता पुरुषांनी शिकवायचे का?
20 Nov 2016 - 9:01 pm | टवाळ कार्टा
खी खी खी
20 Nov 2016 - 9:21 pm | जानु
चला नवीन विषय आला..........हुश्श.........
20 Nov 2016 - 9:51 pm | अजया
=))))))
विनोदी लेखांची मिपावरची उणीव भरुन काढल्याबद्दल धन्यवाद_/\_
20 Nov 2016 - 9:51 pm | गामा पैलवान
टफि,
मला वाटतं ते उत्तर सांगतो.
बाईला लहानपणापासून तू बाई आहेस तेव्हा सांभाळून रहा म्हणून सतत सांगितलं गेलेलं असतं. त्यामुळे पुरुषांसारखं वागून बघायचं कुतूहल जवळजवळ प्रत्येक बाईला असतंच. म्हणून त्या पुरुषांची कॉपी करू इच्छितात. माझ्या मते असं कुतूहल बाळगण्यात काही चुकीचं नाही.
आ.न.,
-गा.पै.
20 Nov 2016 - 9:58 pm | माहितगार
<पुरुष बायकांची बरोबरी का करतात> हे राजेश घासकडवींकृत सुडंबन लेखक महोदयांना त्यांची टर्बॉलॉफी चार्ज करण्यास उपयूक्त ठरावी आणि त्यांच्या नजरेतून अनवधानाने सुटू नये म्हणून दुवा येथे डकवत आहे.
20 Nov 2016 - 10:00 pm | माहितगार
कदाचीत एचटीएमल त्रुटीमुळे दुवा दिसत नाही दुरुस्ती करुन द्यावी हि विनंती
20 Nov 2016 - 10:33 pm | श्रीगुरुजी
नानासाहेब नेफळे,
माईसाहेब कधीपासून तुमची बरोबरी करायला लागले?
20 Nov 2016 - 10:40 pm | खटपट्या
आलाव तूमी ट्फी काकानू?
21 Nov 2016 - 12:55 am | रेवती
किती दिवसांनी जरा हसायला मिळालं.
21 Nov 2016 - 9:54 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हसा की मग ,पण हसण्यातही कॉपी पेस्ट करु नका.
21 Nov 2016 - 10:01 am | अत्रुप्त आत्मा
असा झाला तर तो प्रकार सगळा!
-----------------------------
समांतर :- डूआयडी बरोब्बर मूळ आयडिंसारखेच का वागतात!? =))
21 Nov 2016 - 11:36 am | सस्नेह
अरेरे ! बायका पार पुढे गेल्या तरी तुमच्यासारख्या पुरुषांची अजुनी हीच समजूत आहे का ?
कृपया स्वत:ला उप्दते करा ...!
21 Nov 2016 - 12:05 pm | मराठी कथालेखक
Activa , Scooty चालवणार्या सगळ्या पुरुषांचा निषेध करतो.
(मी नाही हं त्यातला)
झालंच तर दारू न पिणारे म्हणजे बायकी पुरुष (कारण
) ..त्यांचाही निषेध.
(पुन्हा एकदा मी नाही हं त्यातला.. मी पित असतो)
21 Nov 2016 - 5:55 pm | पाटीलभाऊ
लय भारी
21 Nov 2016 - 6:40 pm | सूड
हे सगळं करणार्या मुली जर समोर उभ्या राहिल्या तर फिलॉसोफर काय म्हणतील त्याचा विचार कर्तोय.
21 Nov 2016 - 6:48 pm | याॅर्कर
:(