श्री गणेश लेखमाला २०२३

1

श्रीगणेश लेखमाला - समारोप

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
15 Sep 2016 - 8:23 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

श्रीगणेश लेखमाला – सांगता

नमस्कार !
महाराष्ट्राचं आधिदैवत असलेल्या बुद्धिदात्या श्रीगणेशाचा उत्सव आणि मिपाचा दहावा वर्धापन दिन यांचं दुहेरी औचित्य साधून आयोजित केलेल्या उपक्रमांमधून आपण मिसळपाववर गेले दहा दिवस विविध लेखांचा, चित्रांचा आणि पाककृतींचा आस्वाद घेतला. श्रीगणेश चित्रमाला, श्रीगणेश लेखमाला आणि नैवेद्य अशा धूप-दीप-चंदनादी मंगल उपचारांनी आपण श्री सिद्धिविनायकाची पूजा केली. या निमित्ताने मिळालेल्या नेत्रसुखद, मनोरंजक आणि रसना तृप्त करणार्‍या पर्वणीवर लाडक्या बाप्पाबरोबर रसिक आणि खवय्या मिपावर्गदेखील प्रसन्न झाला असावा, अशी आशा करीत आज या पूजेची सांगता करत आहोत.
चित्रमालेच्या निमित्ताने अनेक मिपाकरांचं कलाकौशल्य नजरेसमोर आलं. कलाकृतींमधून गणेशाची विविध मनोहारी रूपं मिपावर पूजेमध्ये मांडली गेली. कागदातून, काचेवरून, म्यूरलमधून, कागदाच्या गुंडाळ्यांमधून, रंग-कुंचल्यातून, तसंच चित्रवेधी कॅमेर्‍यातून गणराय मिपाच्या बॅनरवर साकार झाले. त्यांच्या दर्शनाचा हा सोहळा मोठा नयनरम्य झाला.
श्रीगणेश लेखमाला दर वर्षी वेगळा विषय घेऊन येते. या वर्षी या लेखमालेतून व्यवसाय सांभाळून अनेकांनी जपलेले विविध छंद मिपाकरांच्या आणि इतर सर्व वाचकांच्या दृष्टीसमोर आले. त्यापैकी काही स्वान्तसुखाय, तर काही जनकल्याणकारी आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे, सौख्याचे, विसाव्याचे काही क्षण देणारे छंद कुठे आणि कसे भेटले, याची कथा या लेखमालेतून उलगडली. या सगळ्यातून वाचनानंदाव्यतिरिक्त जर काहींना प्रेरणा मिळाली असेल, काहींना आपले छंद नव्याने भेटले असतील, काही पुनरुज्जीवित झाले असतील, तर ही लेखमाला पुष्कळ अंशी सफल झाली असं म्हणता येईल.
सर्वात रुचकर उपक्रम म्हणजे बाप्पाचा नैवेद्य. मनोभावे मांडलेल्या अत्यंत सुरस पाककृतींमधून गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं पान सजत गेलं आणि मिपाच्या या सोहळ्याला वेगळीच चव आली.
या उपक्रमात सहभागी होणार्‍या सर्व लेखक-कलाकारांचे आणि बल्लव-सुगरणींचे मानू तितके आभार कमीच आहेत.
नेहमीप्रमाणेच या उपक्रमांनाही मिपाकरांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मिपाकरांचे आणि सर्वच वाचकांचे अनेक आभार! रसिक मिपाकरांच्या अशा पाठिंब्यामुळेच आम्हाला पुढील उपक्रमांसाठी उत्साह मिळतो, बळ मिळतं!
अशा या मंगल वातावरणात दहा दिवस कसे निघून गेले... समजलंही नाही. आणि आता विघ्नहर्त्याला निरोपाचा विडा देण्याची वेळ आली. निरोप द्यायचा, मात्र तो पुढच्या वर्षी अधिक आनंदात, अधिक उत्साहात पुन्हा परत येण्यासाठी.
पुढे येणार्‍या दीपावलीसाठी नूतन कार्यक्रम घेऊन पुन्हा लवकरच आपल्या सेवेत हजर होत आहोत!

गणपती बाप्पा मोरया !!
साहित्य संपादक,  मिसळपाव प्रशासन.

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

15 Sep 2016 - 8:44 am | प्रीत-मोहर

सुंदरच झाली लेखमाला. पुढल्या उपक्रमाला ऍडव्हान्स शुभेच्छा!!

मोदक's picture

15 Sep 2016 - 1:20 pm | मोदक

+१११

झक्कास झाली लेखमाला. अनेक नवीन गोष्टींची ओळख झाली.

__/\__

पिलीयन रायडर's picture

15 Sep 2016 - 10:17 pm | पिलीयन रायडर

+१११११

फार सुरेख झाली लेखमाला!

टवाळ कार्टा's picture

15 Sep 2016 - 8:45 pm | टवाळ कार्टा

+१०००००००००

एक चांगल्या लेख मालिकेसाठी सासंचे अभिनंदन.

अनन्न्या's picture

15 Sep 2016 - 11:07 am | अनन्न्या

पण नक्की वाचणार. लेखमाला फार छान झाली,त्यात सहभागी होता आले म्हणून अजूनच आनंद झालाय.

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2016 - 12:00 pm | स्वाती दिनेश

लेखमाला सुंदरच झाली. ह्यावेळी गणेशचित्रमालेची तिला जोड मिळाली आणि बाप्पाचा नैवेद्यही होताच. मिपाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला.
असेच अनेक उपक्रम येत राहतीलच, सहभाग आणी शुभेच्छा असणारच आहेत.
स्वाती

लेखमाला सुंदरच झाली. ह्यावेळी गणेशचित्रमालेची तिला जोड मिळाली आणि बाप्पाचा नैवेद्यही होताच. मिपाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला.

+१००

एकनाथ जाधव's picture

15 Sep 2016 - 12:38 pm | एकनाथ जाधव

पुढच्या वर्षी लवकर या.

मित्रहो's picture

15 Sep 2016 - 8:09 pm | मित्रहो

काही लेख वाचले, अजून वाचतोय

अभिजीत अवलिया's picture

15 Sep 2016 - 8:59 pm | अभिजीत अवलिया

एक ड्रॉपडाउन देऊन तिथे दर वर्षीच्या लेख मालेसाठी लिंक दिली आणी त्या लिंक मध्ये त्या त्या वर्षीचे लेख ठेवले तर बरे होईल.

रुपी's picture

15 Sep 2016 - 9:57 pm | रुपी

सहमत. मीही हे पहिल्या धाग्यात सुचवले होते.

उपक्रम अतिशय उत्कृष्ट झाला! अकरा दिवस रोज आज कुठला नवीन लेख, बाप्पाचा नैवेद्य आलाय याची उत्सुकता असायची.

पैसा's picture

15 Sep 2016 - 10:04 pm | पैसा

लेखमाला इतकी उत्कृष्ट होण्यासाठीविशेष कष्ट घेणार्‍या साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि धन्यवाद!

हे अनुभवता अनंत चतुर्दशी कधी आली तेही समजलं नाही. आता यापुढे गणरायाच्या आगमनाबरोबरच श्रीगणेश लेखमालेचीही वाट पाहिली जाईल हे नक्की.

लेखमाला एक नंबर भारी झाली, खूप माहिती मिळाली. समजून घेऊन मदत करणार्‍या साहित्य संपादक लोक्सचे अनेक आभार.

लेखमालिका खुपच छान झाली.
बरेच नविन माहिती मिळाली,धन्यवाद.पुढील उपक्रमासा शुभेच्छा.

या वर्षीचा उपक्रम फारच मस्त झाला. बुद्धी-मन, डोळे आणि जिव्हा तृप्त झाली.
काही ‘जूना अने जाणिता’, तर काही अगदी नव्या सदस्यांचा सहभाग होता. काही मिपाकर यानिमित्त पुन्हा सक्रिय झाले.
काही अनवट छंदांची, गणेशरूपांची आणि नैवेद्यांची ओळख झाली. खरं तर काही जुन्या मिपाकरांची नव्याने ओळख झाली.
रुपीने वर म्हटल्याप्रमाणे, आज कुठला नवीन लेख, बाप्पाचा नैवेद्य, बाप्पाची प्रतिमा आलीय याची अकरा दिवस रोज उत्सुकता असायची.

एक गमतीदार योगही जुळून आला : दोन जोडप्यांचा सहभाग बघायला मिळाला. लेखमालेत एका जोडप्याचे लेख वाचायला मिळाले, तर चित्रमालेत दुसर्‍या जोडप्याच्या कलाविष्कारातून श्रीगणेशप्रतिमा बघायला मिळाल्या.

अभ्या..'s picture

16 Sep 2016 - 10:04 am | अभ्या..

हो, लेखमालेत मि. जॅक डनियल आणि मिसेस जॅक म्हणजे मूनशाईन,
गणेशचित्रात स्वतः नूलकरदादा आणि मोक्षदावहीनी. (मलाही हे नंतर कळले)
चौघांनाही शुभेच्छा.

सस्नेह's picture

16 Sep 2016 - 10:14 am | सस्नेह

औत्सुक्यपूर्ण, कल्पक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम !
तिन्ही उपक्रमांच्या आयोजक, सहभागी लेखक आणि प्रतिसादकांना धन्यवाद __/\__