बाहुबलीला पुरस्कार आणि काहींची पोटदुखी

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in काथ्याकूट
7 Apr 2016 - 10:22 am
गाभा: 

मी आजवर बाहुबलीबद्दल लिहायचं मुद्दामच टाळलं होतं. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील या ऐतिहासिक ठरू शकणार्‍‍या सिनेमाबद्दल तथाकथित बॉलीवूड आणि स्वघोषित बुद्धिजीवींची काय प्रतिक्रिया येते याची मला उत्सुकता होती. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की दोघांनीही मला अजिबात निराश केलं नाही. दोघांनीही 'बाहुबली' सिनेमागृहात चालू असताना व तो उतरल्यावरदेखीलही सतत त्याला अनुल्लेखाने मारण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बाहुबलीला नुकताच जाहीर झालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.

एरवी 'वॉण्टेड' पासून 'रावडी राठोड' पर्यंत, 'सिंघम' पासून 'दृष्यम' पर्यंत साउथच्या सिनेमाची भ्रष्ट नक्कल करण्याइतपत तळ गाठलेल्या बॉलीवूडकर स्टार्सच्या दिवाळखोर बुद्धिला 'बाहुबली'ने न्यूनगंडाचा जबरदस्त झटका दिला होता आणि आहे. बाहुबली व बजरंगी भाईजान हे एकाच वेळी रिलीज झालेले दोन चित्रपट. सुरूवातीला बॉलीवूड व भाईजानच्या काही चमचा वाहिन्यांनी 'भाईजान देगा बाहुबलीसे टक्कर' इ.इ. प्रचार चालवला. पण जसजसा पन्नाशीचा सिंथेटीक भाईजान बॉक्स ऑफिसवर बाहुबलीसमोर धापा टाकू लागला तसे माध्यमांचे प्रायोजित अवसान गळाले. परंतु सर्वसाधारणपणे बॉलीवूड व त्याच्या जीवावर जगणार्‍या सुमार वृत्तवाहिन्यांनी बाहुबलीची केलेली उपेक्षा ही व्यावसायिक असूयेतून केली हे उघड आहे. पण बुद्धिजीवींचे तसे नसते. त्यांच्या बहिष्कार वा पुरस्कारामागे काही वैचारिक कारणे असतात.

ज्याला पूर्वी आर्ट फिल्म म्हणत तशाच पण जरा अधिक मनोरंजक व सुसह्य सिनेमाला आजकाल महोत्सवी चित्रपट म्हणतात (म्हणजे मी म्हणतो). म्हणजे सिनेमा बनवताना तो सिनेमात बनवण्याचा आपला कंडू शमेल व निर्मात्याची निदान गुंतवणूक तरी निघेल या हेतूने बनवायचा पण ते उघडपणे मान्य करायचं नाही. मग चित्रपट देशोदेशीच्या चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित करायचा. हा जागतिक दौरा आटपून सिनेमाची जरा बरी प्रसिद्धी झाली (त्यातही असा चित्रपट मराठी असेल तर 'मराठमोळ्या' दिग्दर्शकाचा अटकेपार बर्लिन इ.इ. महोत्सवात रीतसर झेंडा वगैरे फडकावून झाला) की मग एखादा व्यावसायिक वितरक शोधायचा आणि सिनेमा गर्दीतील इतरांसारखा प्रवाहात सोडून द्यायचा. मग अशा सिनेमाला जितके महोत्सवी पुरस्कार जास्त आणि जितका बॉक्स ऑफिस जनाधार कमी तितकी संवेदनशील चित्रपटकार म्हणून आपली पाठ थोपटून घ्यायची, बुद्धिमंतांच्या वर्तुळात मिरवून घ्यायचं. ते एक असो.

बाहुबलीबद्दल बुद्धिमंत टीकाकार लोक सिनेमाचे खेळ ऐन भरात असताना काही विशेष बोलत नव्हते. गर्दीतला अजून एक मसालापट म्हणून त्यांनी काणाडोळा केला असावा असा माझा सुरुवातीला समज होता. परंतु ते तसं नसावं अशी शंका मी स्वत: हिंदीतला 'बाहुबली' (जरा उशीराच) पाहिल्यावर आली. चित्रपट पाहिल्यावर पहिला विचार मनात आला तो हाच की, किती हिंदू वातावरण दाखवलंय यात. इतकी उर्दुमुक्त हिंदी ऐकायची सवय हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना नाही. त्यातही हिरो सुरूवातीलाच महादेवाची पिंड वगैरे उचलून आणतो म्हणजे फारच झालं. त्यामुळे डाव्या, समाजवादी, सेक्यूलर प्रभावाखाली असलेले बुद्धिमंत या सिनेमाची किमान एक मनोरंजक सिनेमा म्हणूनही त्याची स्तुती तर करणारच नाही पण चर्चाही करणार नाहीत असा मला वाटणारा 'शक' हा नंतर 'यकीन'मध्ये बदलत गेला. आणि जसजशे महिने उलटत गेले तशी त्याने 'हकिकत की शक्ल' घेतली. कारण चर्चा जरी करायची म्हटली तरी त्या विषयाला महत्व दिल्यासारखं होतं. म्हणून मी काय होणार याची वाट पाहात बसलो.

अखेर ती घटिका आलीच. बाहुबलीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच मग लोकांना बोलणे भागच पडले. बाहुबली हा चित्रपट म्हणून वाईट आहे; त्याची पटकथा ढिसाळ आहे; कथा रामायण-महाभारत किंवा अजून कुठल्या लोककथांवरून उचललेली आहे; संकलन गचाळ आहे; तांत्रिक बाजू कमकुवत आहे; विदेशी सिनेमातील दृष्यांची नक्कल केली आहे; संगीत ओरीजिनल नाही; अभिनय चांगला नाही; वेषभूषा सुसंगत नाही इ.इ. कारणांमुळे 'बाहुबली'ला पुरस्कार द्यायला नको होता असा विरोध कोणी केला असता तर एक वेळ समजू शकतं. परंतु मोदीविरोधक बुद्धिमंत व मिडीयाने इथेही मोदीविरोधाची संधी शोधली. याबाबतीत केजरीवालांना बरीच कठीण स्पर्धा आहे.

तर 'हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आल्यामुळे हिंदू वातावरण असलेल्या, आदर्श पिता, आदर्श माता यासारखी पात्रे असलेल्या 'बाहुबली'ला पुरस्कार मिळाला' असा आरोप पुरोगामी वृत्तपत्रांनी संपादकीय पानांवरून केला. जणू काही सिनेमाकारांनी मे २०१४ नंतर घाईघाईने सिनेमा करायला घेतला आणि आता हे संघी सरकार आपले असेच प्रचारपट आणणार की काय अशीही शंका काहींना आली. पण अशी काही शंका 'नया दौर' सारख्या तद्दन कम्युनिस्ट प्रचारपटांबद्दल घ्यायची नसते हे मला माहीत असल्यामुळे मी काही तसे म्हणत नाही. एकीकडे भारतीय दंतकथा, महाकाव्यात किती नाट्य भरलेय, यावर मुख्य धारेतील लोक चित्रपट काढत नाहीत असा आरोप करायचा मग कोण्या राजामौलीने तसा प्रयत्न केला तर त्यालाच सनातनी ठरवायचं असा हा दुटप्पीपणा आहे. आज बाहुबलीला नाके मुरडणारे उद्या 'द जंगल बुक' प्रदर्शित झाल्यावर त्याचे, त्यातील भारतीय वातावरणाचे कसे गोडवे गातील हे पाहा. कारण उघड आहे, आपला क्लासिक भारतीय न्यूनगंड. जंगल बुकचे लेखक रुडयार्ड किपलिंग होते म्हणजे एक साहेब, कोणी ऐरागैरा राजामौली नव्हे.

काही उपसंपादकांनी आपल्या 'उलट्या चष्म्या'तून बाहुबलीची तुलना 'चांदोबा'शीसुद्धा केली. चांदोबातल्या गोष्टीतील आदर्शवाद, भाबडेपणा यांची थट्टा, आता काय चांदोबालाही साहित्य अकादमी देणार का असे म्हणून करण्यात आली. पण ती करताना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला मराठी चित्रपट 'श्यामची आई' ज्यांच्या मूळ कादंबरीवर आधारित आहे ते आधुनिक महाराष्ट्रातील आदर्शवाद , भाबडेपणा इ.इ. चे आद्य प्रवर्तक व प्रचारक 'गोड गोष्टी'कार पू. साने गुरूजी काही हिंदुत्ववादी नव्हते तर समाजवादी होते हे मात्र अनेकांच्या विस्मरणात गेलं. आजही त्यांच्या नावाने अनेकांची समाजवादी 'साधना' सुरू असते. ते एक दुसरं असो.

बाहुबलीला द्यायचाच होता तर 'लोकप्रिय' चित्रपट म्हणून पुरस्कार द्यायचा, उत्कृष्ट चित्रपट म्हणून नव्हे; असेही काहींचे म्हणणे आहे. याचा अर्थच मला कळला नाही. म्हणजे लोकप्रिय चित्रपट उत्कृष्ट नसतो किंवा उत्कृष्ट चित्रपट कधीच लोकप्रिय होऊ शकत नाही असा याचा अर्थ घ्यायचा का? उदा. एक रम्य कल्पना(च) करा, 'कोर्ट' या २०१४च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा तिकीट खिडकीवर धो-धो करून वाहतोय. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव अगदी मराठी सिनेमाला हिडीस-फिडिस करणार्‍या मल्टीप्लेक्सनी सुद्धा सलमान-अक्षय कुमारचे सिनेमे उतरवून 'कोर्ट' लावलाय. कधी नव्हे ते मराठी सिनेमाची 'ब्लॅक' चालू आहे. एकपडदा सिनेगृहात लोक एकमेकांच्या उरावर चढून, पायर्‍यांत बसून, जिथे मिळेल तिथून सिनेमा बघण्यासाठी मरमर करताहेत इ.इ. तसाही (ज्यूरींच्या मते) 'कोर्ट' हा उत्कृष्ट सिनेमा आहेच. पण मग अशा रम्य 'लोकप्रिय' परिस्थितीत जर 'कोर्ट'ला उत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला असता तरीही या बुद्धिमंतांनी 'लोकप्रिय' व 'उत्कृष्ट' यात भेद करत, 'कोर्ट' ला लोकप्रिय श्रेणीत हवे तर सन्मानित करा पण उत्कृष्ट नव्हे असंच म्हटलं असतं का? याबाबतचे आपले मत वाचकाने आपल्या रिस्कवर 'कोर्ट' संपूर्ण पाहून मगच घ्यावे ही नम्र सूचना. राजकीय भूमिका एक वेळ बाजूला ठेवली तरी असं निश्चितच झालं नसतं, कारण एकदा का तुम्ही स्वत:ला बुद्धिमंत म्हणवून घेतलं की लोकप्रियतेपासून दूर राहायचं असतं. जी कलाकृती जितकी जास्त दुर्बोध, जितकी अगम्य, जितकी अधिक किचकट, जितकी अधिक रटाळ, जितकी अधिक जन-अप्रिय तितकी तिची बौद्धिक उत्कृष्टता अधिक चांगल्या वाणाची अशी सर्वसाधारण समजून बुद्धिमंतांत आढळते.

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बाहुबलीवर आज होणारी 'संस्कृती'वादी सिनेमा ही टीका आजच निर्माण झालेली नाही तर ती गेल्या काही काळापासून साचत आलेली आहे. तिची सुरुवात झाली ती 'काकस्पर्श', 'कट्यार काळजात घुसली' , 'नटसम्राट' , 'बाजीराव मस्तानी' यासारख्या चित्रपटांच्या भव्य यशाने. किंवा अजून मागे जायचं झालं तर 'मुंबई-पुणे-मुंबई', 'दुनियादारी' इ.इ. पर्यंत जाता येईल. या सगळ्या कलाकृतीत ठळकपणे जाणवेल असे साम्य म्हणजे अभिजन(वाचा:ब्राह्मण) वातावरण. पुरोगामीपणा, सेक्यूलरिझम, समाजवाद, साम्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्यवाद आदींचा 'अंतिम पडाव' म्हणजे मनुवादाला म्हणजेच ब्राह्मणवादाला (आणि दुर्दैवाने म्हणजेच ब्राह्मणांना) विरोध हे सुज्ञ वाचक जाणतातच. त्यामुळेच वरीलप्रकारच्या कलाकृतींच्या यशाने अनेक बुद्धिमंतांच्या पोटात दुखू लागलं आहे. अधिक त्यांचा हरवलेला राजाश्रय हेही एक कारण आहे. बाहुबली हे निमित्त आहे. पण सिनेमाच्या अभिजनीकरणाचा आरोप करताना, शुद्ध व्यावसायिक हेतूने का होईना, 'फॅण्ड्री' सारख्या सिनेमाचा जोरदार प्रचार, वितरण करणार्‍या एस्सेल व्हीजन/झी टॉकीज ग्रुपमध्येही तथाकथित अभिजनांचा किंवा बहुजनांचं वर्चस्व आहे हे शोधण्यास या बुद्धिमंतांस सांगणे त्यांना सोयीचे नाही. उगाच कोणाला कशाला अडचणीत टाका?

पाकिस्तानी कलाकारांचा प्रश्न आला की कलेमध्ये भारत-पाक, धार्मिक भेदभाव करू नये असे शिकवणारे आमचे बुद्धिमंत बाहुबलीच्या आणि वर उल्लेखलेल्या इतर सिनेमांच्या निमित्ताने आपण स्वत:च कलाविष्कार व कलास्वाद या दोहोतही जातीयवादी विष घोळण्याचा प्रयत्न करत आहेत. रंगभूमी आणि साहित्याचे तर तुकडे पाडून झालेच आहेत. आता निदान सिनेमाकलेचे तरी तुकडे पाडू नका. नाहीतर तसंही ऑस्कर वाइल्डने म्हटले आहेच- ऑल आर्ट इज नॉनसेन्स.

(पूर्वप्रसिद्धी- http://aawaghmare.blogspot.com)

प्रतिक्रिया

पैसा's picture

7 Apr 2016 - 10:29 am | पैसा

बाहुबली अतिशय उत्तम निर्मिती मूल्ये असलेला चित्रपट आहे. कथा लोकांना खिळवून ठेवणारी. त्याला पुरस्कार मिळाला हे छानच झाले. मला आवडला होता. पूर्वी जीतेंद्र आणि जयाप्रदाचा 'पातालभैरवी' म्हणून असा एक सिनेमा आला होता. इतका चांगला नव्हे पण तोही एकदम रिफ्रेशिंग होता.

या सिनेमाला जातीयवादी टीकेच्या साच्यात टाकणार्‍या मंडळींची कीव करावी तितकी थोडीच. असे १००% निर्भेळ मनोरंजनही आपल्याला आता पचत नाही का?

lgodbole's picture

7 Apr 2016 - 10:29 am | lgodbole

करी मनोरंजन जो जनांचे

जडेल नाते प्रभुशी तयाचे.

.. साने गुर्जी

अत्रे's picture

7 Apr 2016 - 10:43 am | अत्रे

बाहूबलीला मिळालेल्या पुरस्काराला विरोध का झाला हे इथे वाचायला मिळाले. उत्सुक लोकांनी वाचावे.

http://www.apalacinemascope.blogspot.com/2016/04/blog-post.html?m=1

नाना स्कॉच's picture

7 Apr 2016 - 10:43 am | नाना स्कॉच

तुम्ही सिनेमा जाणकार किंवा राजकारणी वगैरे असाल बुआ क्रिटिक का काय म्हणतात ते, आम्ही सामान्य माणसे आहोत, आम्हाला अगदी आवडीने 2 3 वेळा थेटरात जाऊन बाहुबली पाहणारे ब्राह्मणेतर मित्र दिसले आहेत फ़क्त. तुम्ही म्हणता त्या दृष्टिकोनातून मी काही तपासले नाहीत सिनेमे, असेल बुआ ते ही खरे, मला मात्र लेख थोड़ा कर्कश्य अन साप समजून भुई धोपटणे वगैरे वाटला, बाकी काही नाही तर.

हे माझे वैयक्तिक मत आहे, शैली बद्दल बोललोय व्यक्तिबद्दल नाही.

सिनेमाच्या धाग्यांवर सुद्धा जातियवाद सुरु केलाच. धन्य आहे.

नाना स्कॉच's picture

7 Apr 2016 - 6:10 pm | नाना स्कॉच

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बाहुबलीवर आज होणारी 'संस्कृती'वादी सिनेमा ही टीका आजच निर्माण झालेली नाही तर ती गेल्या काही काळापासून साचत आलेली आहे. तिची सुरुवात झाली ती 'काकस्पर्श', 'कट्यार काळजात घुसली' , 'नटसम्राट' , 'बाजीराव मस्तानी' यासारख्या चित्रपटांच्या भव्य यशाने. किंवा अजून मागे जायचं झालं तर 'मुंबई-पुणे-मुंबई', 'दुनियादारी' इ.इ. पर्यंत जाता येईल. या सगळ्या कलाकृतीत ठळकपणे जाणवेल असे साम्य म्हणजे अभिजन(वाचा:ब्राह्मण) वातावरण. पुरोगामीपणा, सेक्यूलरिझम, समाजवाद, साम्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्यवाद आदींचा 'अंतिम पडाव' म्हणजे मनुवादाला म्हणजेच ब्राह्मणवादाला (आणि दुर्दैवाने म्हणजेच ब्राह्मणांना) विरोध हे सुज्ञ वाचक जाणतातच

मुळ लेखातली ही वाक्यं सुचवतात त्याप्रमाणे ब्राह्मणी सनातनी वातावरण आहे म्हणून क्रिटिक ह्याच्या विरोधात असावेत अशी एक शक्यता मुळ लेखकाने व्यक्त केली आहे, मला तसे वाटत नाही म्हणून मी त्या मूवीचे डाई हार्ड फॅन असलेले ब्राह्मणेतर मित्र ह्यांचे उदाहरण दिले, मुळ आडातले आपणाला दिसले नाही का? की फ़क्त आमचे नाव कानफाट्या पाडायची घाई आहे???

कृपया गैरसमज नका करु, मला वाटले कि तुमचा प्रतिसाद अत्रे ह्यांनि दिलेल्या लिंक संबधांत आहे. कारण त्या लिंक मध्ये असे मला तरि काहि दिसले नाहि. असो.

होबासराव's picture

7 Apr 2016 - 6:47 pm | होबासराव

मनुवादाला म्हणजेच ब्राह्मणवादाला (आणि दुर्दैवाने म्हणजेच ब्राह्मणांना)
वाघमारे साहेब एक विनंति आहे, आपल्याला कुठला सिनेमा का आवडला किंवा का नहि आवडला ह्यावर मत व्यक्त करा पण सरळ एखाद्या मनोरंजनासाठि तयार केलेल्या कलाकृतिला कुठल्याहि अक्षरशः कुठल्याहि जात-धर्मा सोबत संबध जोडु नका.
रच्याकने मनुवाद = ब्राम्ह्णवाद हे आप्ले समिकरण पटले नाहि.

नाखु's picture

11 Apr 2016 - 12:36 pm | नाखु

हे पटवण्यासाठीच आख्खी संस्थळे जन्माला घातली आहेत ढीगभर पुस्तके लिहिली गेली आहेत आणि जालावरही मुक्तहस्ते मौक्तीके उधळत आहेत तेंव्हा... जी काही धार्मीक-जातीय उतरंड आहे त्याला खेड्यापासून शहरापर्यंत आणि इ.सपा पासून ते मिपा फक्त एक्च जात जबाबदार आहे आणि ते मिपाकरांचेही मत ( दुदैवाने काही जुन्या आणि जाणत्या मिपाकरांचे सोईसकर मौनही बोलके आहे या संदर्भात).

ता.क. गरीब चिमणा यांनी वरील जाहीर आव्हान स्वीकारावे अशी पुन्हा मागणी..

ए ए वाघमारे's picture

12 Apr 2016 - 9:17 am | ए ए वाघमारे

मनोरंजनासाठि तयार केलेल्या कलाकृतिला कुठल्याहि अक्षरशः जात-धर्मा सोबत संबध जोडु नका.
मी तसे काही जोडत नाहीए.उलट आपले तथाकथित बुद्धिजीवी तसे करत आहेत असं मला जाणवलं.ते काय म्हणत आहेत व असे का म्हणत आहेत हे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. उदा.खालील दुवे वाचा-

भाषा थेट नसली तरी रोख तिकडेच आहे...

http://www.loksatta.com/ulata-chashma-news/bahubali-wins-national-award-...

http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/baki-shunay/bahubali-wins-n...

मनुवाद = ब्राम्ह्णवाद हे आप्ले समिकरण पटले नाहि मग कालचे नागपूरचे सोनिया-राहुल यांचे भाषण ऐका. किंवा कन्हैय्या कुमार प्रभृतींता कशाकशापासून आझादी पाहिजे याची यादी जरा तपासून बघा.

ए ए वाघमारे's picture

12 Apr 2016 - 9:07 am | ए ए वाघमारे

पुन्हा तेच लिहितो..

मी सामान्य माणसाबद्दल बोलत नाहीए. त्याला काय घटका-दोन घटका करमणूक होण्याशी मतलब.पण माझा आक्षेप आहे तो स्वघोषित बुद्धिजीवी/डाव्या, समाजवादी, सेक्यूलर प्रभावाखाली असलेले बुद्धिमंत व मिडीया यांच्याबद्दल आहे हे माझ्यामते मूळ लेखात पुरेसे स्पष्ट केले आहे.

ए ए वाघमारे's picture

12 Apr 2016 - 8:58 am | ए ए वाघमारे

आम्हीही सामान्य माणसेच आहोत.

अगदी आवडीने 2 3 वेळा थेटरात जाऊन बाहुबली पाहणारे ब्राह्मणेतर मित्र दिसले आहेत फ़क्त
माझंही हेच म्हणणं आहे. आपण सामान्य लोक सिनेमा पाहताना,गाणं ऐकताना त्यात काही भेदभाव करत नाही.पण स्वत:ला विचारवंत,उच्चभ्रू वगैरे समजणारी माणसेच असे करताना दिसतात.

या लेखात माझी भाषा अधिक हार्श झाली आहे याची मला कल्पना आहे.पण काही वेळेला नियंत्रण राख़णं कठीण होतं. सिनेमा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही लोक आता जातीवरून हा आमचा सिनेमा-तो तुमचा असं करू लागल्यापासून वाईट वाटतं (यास दोन्ही बाजू जबाबदार आहेत).त्याच उद्वेगातून हे लिहिलं आहे.आपण कट्टयावर, चावडीवर चालणारं हीन स्वरूपाचं राजकारण घरात , स्मार्टफोनमध्ये आणून ठेवलं आहे. मी लेखात समाजमाध्यमांचा उल्लेख केला नाही,पण ककाघु व नटसम्राट इ. नंतर बरीच जातीयवादी टीका माझ्या वाचनात आली.त्यामुळे मी अजूनच अस्वस्थ झालो.

आणि (मी मोदीभक्त नाही तरी)सध्याच्या सरकारच्या कुठल्याही कृतीचा विरोध करताना संघ, फॅसिझम, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी वगैरे नेहमीची आदळआपट करायची ही तर आजची फॅशन आहे.अवांतर:ही टीका करताना सिनेमात इतके पाकिस्तानी कलाकार येतात कुठून आणि त्यांना सेंटर स्टेज मिळते कसे इ.इ.बाबींची चर्चा सिनेमाचे जाणकार मुद्दामहून टाळतात असे वाटते.या पाकिस्तानी प्राबल्यामागे केवळ कलेसाठी कला वगैरे कारणे नसावीत.असो.

आपल्याला यातले काही कळत नाही, सो पास.

सिरुसेरि's picture

7 Apr 2016 - 11:46 am | सिरुसेरि

कट्टाप्पाला बाहुबलीने का मारले ते समजले नाही.

हायला मि पाहिलेल्या बाहुबलि मध्ये कटप्पा ने बाहुबलि ला मारले होते ;)

lgodbole's picture

7 Apr 2016 - 6:07 pm | lgodbole

मारलेलं सगळ्यानाच माहीत आहे.

का ? हे माहीत नाही.

तर्राट जोकर's picture

7 Apr 2016 - 6:19 pm | तर्राट जोकर

दोघांचेही प्रतिसाद परत वाचा हो.

होबासराव's picture

7 Apr 2016 - 7:03 pm | होबासराव

सिरुसेरि ह्यांचा प्रश्न आणि मि काय प्रतिसाद दिलाय तो पुन्हा वाचा, बघा काहि कळतय का !

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 9:18 pm | अ-मॅन

:D

होबासराव's picture

11 Apr 2016 - 9:21 pm | होबासराव

फारच लवकर समजल तुम्हाला ;)

हायला मि पाहिलेल्या बाहुबलि मध्ये कटप्पा ने बाहुबलि ला मारले होते ;)

मृत्युन्जय's picture

7 Apr 2016 - 11:56 am | मृत्युन्जय

बाहुबली हा एक उत्कृष्ट मसाला चित्रपट आहे. मी भाग एक थेटरात जाउन बघितलेला आहे आणि दुसराही बघेन. चित्रपता भव्यदिव्य आहे आणि तांत्रिक बाजू भक्कमच आहे हे जाणवते. एक कलाकृती म्हणुन नक्कीच मनोरंजक आहे.

पण ... पण... सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळण्याइतका बाहुबली दर्जेदार नक्कीच नाही. मी रिंगण नाही बघितलेला पण कट्यार आणि नटसम्राट नक्कीच नितांत सुंदर आहेत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणुन बाहुबलीला नक्कीच उजवे आहेत. देशभरात असे अजुन बरेच चित्रपट असतील.

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणुन बाहुबल्लीला पुरस्कार मिळण्यात काहिच गैर नाही मात्र सुवर्णकमळ मिळवणारा चित्रपट म्हणुन तो पचनी पडत नाही.

बाकी 'हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आल्यामुळे हिंदू वातावरण असलेल्या, आदर्श पिता, आदर्श माता यासारखी पात्रे असलेल्या 'बाहुबली'ला पुरस्कार मिळाला' असा आरोप जर कोणी करत असेल तर तो महामुर्ख आहे आणि ब्रह्मदेव अक्कल वाटत असताना हे लोक मसणात चरायाला गेले होते की काय अशी शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे त्याबद्दल फार काही बोलत नाही.

दुर्गविहारी's picture

7 Apr 2016 - 6:55 pm | दुर्गविहारी

फक्त आम्हीच काय ते शहाणे असा सुर घेउन सध्या येणारे लोकसत्ता मधले अग्रलेख डोक्यात जातात. बाहुबलीला पुरस्कार मिळाला म्हणुन विनाकारण टिका करणारा अग्रलेख असाच होता.
खालचा आणखी एक अग्रलेख बघा. कशाचा काही सम्बध आहे ? निव्वळ ओढुन ताणुन मोदीवर टिका केली कि भरला यान्चा दिवस.
दोस्तांचा दगा
असो. अजुन किती दिवस कुबेर धन उधळणार कोणास ठाउक ?

जबरदस्त चित्रपट होता. असे चित्रपट चालले तर इतरांना प्रोत्साहन मिळेल. शिवतांडव स्त्रोत्र त्यामुळे पुन्हा ऐकायला मिळाले.

चित्रपटात के चूक होती. ती म्हणजे आदिवासी लोकांचा हल्ला. संपूर्ण भारतीय खंडांत ह्या प्रकारचा आदिवासी लोकांचा हल्ला झाल्याचे ऐकिवात नाही. शक हुणांची अक्रमने ठावूक आहेत पण ते सुद्धा ह्या प्रकारचे क्रूर वगैरे होते असे वाचलेले आठवत नाही. त्या ऐवजी मुस्लिम आक्रमक दाखवले असते तर सत्याला धरून ठरले असते. आदिवासी लोकांच्या संस्कृतीचा मी अभ्यास करत असल्याने हा मला त्यांच्या वरील अन्याय जरूर वाटला पण चित्रपटास पुरस्कार मिळाला तो सुद्धा वाजवीच होता.

lgodbole's picture

7 Apr 2016 - 12:16 pm | lgodbole

राजमौलीच्या २ चित्रपटात हिरोचा चांगला मित्र मुसलमान असुन तो दिलदार असतो असे दखावले आहे.

या बाहुबलीत कटप्पाला एका अरबी मित्राने मदतीचे वचन दिले आहे. ( तो बहुतेक पुढच्या भागात ते पुर्ण करेल. )

मगधीरामध्येही हिरोला मुस्लिम सुल्तान मदत करतो

कटप्पाला एका अरबी मित्राने मदतीचे वचन दिले आहे. ( तो बहुतेक पुढच्या भागात ते पुर्ण करेल. )

That is not going to be happen.

अभ्या..'s picture

9 Apr 2016 - 8:50 pm | अभ्या..

No dear sweet talker, sultan want to help but bhairawa jumps down with dead mitrawinda. In second half he helps but as a Christian. Soloman.

तर्राट जोकर's picture

7 Apr 2016 - 12:13 pm | तर्राट जोकर

लेखातल्या विचारांशी पूर्णपणे सहमत.

बाहुबली बघितला नसल्यामुळे धाग्याच्या विषयाला आपला पास !

पण...पण..एकंदरीत दक्षिणात्य सिनेमाविषयी (त्यातल्या त्यात तमिळ आणि तेलगु ) आमचे मत काही चांगले नाही. कथा, संकल्पना ,विषय उत्तम असतात या लोकांचे, पण एखादी गोष्ट x असेल तर ती 100x करून दाखवण्याची ह्यांची पद्धत डोक्यात जाते (कधी कधी 1000000000x ) . आजकाल टीव्हीवर यांचे किंग न. १,मास, मै हु खतरनाक छाप सिनेमेतर चीड आणतात. अर्थात काही उत्कृष्ट सिनेमे असतीलच पण ते माझ्या बघण्यात आले नाही. त्या कमाल हसनचे ढीगभर मेकअप करून 'ओळखा पाहू मीच का तो कमाल हसन?' असे प्रश्न विचारणाऱ्या सिनेमांचा आता कंटाळा आला आहे.

(हिंदी)बाहुबलीचा दुसरा पार्ट पाहीन इतपत पहिला चांगला झालाय. मुख्य म्हणजे मनोरंजक निदान थोडावेळ तरी वाटला. काही ठिकाणी मारामारीचा कहर दाखवलाय/ गोष्ती पटल्या नाहीत. बज्रंगी पाहिला नाही कारण त्यात सल्मान आहे व जरी तो नसता तरी पाहिला असं म्हणवत नाही (रावडी राठोड आणि कोणतेच पाहिले नाहीत). नुकताच जालावर बाजीराव मस्तानी पाहिला. सिनेमा संप्ल्यावरही काहीच वाटले नाही. लक्षात राहिलेली एकच गोष्त म्हणजे श्रेया घोषालचा आवाज मस्त, गोड आहे व ते नेहमीच जास्त पटत जाते.
चिनार यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. तमीळ शिनेमा एकच पाहिलाय व तो आवडला. बाकी तेलुगु पाहिले नाहीत. प्रयत्न केला होता पण ते क्ष गुणीले कैकपट करून दाखवतात व पब्लिक त्या सगळ्याकडे भक्तिभावाने पाहते यामुळे माझे काही जमले नाही. तरीही मनोरंजक म्हणून तेलुगु शिनेमा पळवत पाहिला तो एका माशीचा होता, जी हिरविनीला सगळीकडे वाचवत असते. तो आवडला.
कट्यार.....सोडता कोणताही मराठी चित्रपट लगेच पहायला मिळाला नाही. जालावर येईल तेंव्हाच पाहिला जाण्याची शक्यता आहे. फ्रँड्री पाहिला नाही. नटसम्राट व कोर्टही पाहिला नाही. शिनेमा हे बनवण्यास खर्चिक प्रकरण आहे. त्यात जातीयवाद आणणे हे सरसकट परवडत नाही. तशी माझीही काही निरिक्षणे आहेतच पण आपली निरिक्षणे ओरडून सांगून उपयोग नसतो, त्याने फायदा काहीच होणार नाही, उलट जी गोष्ट जनता विसरू पाहतिये/निदान तसे दिसतेय ती पुन्हा पुन्हा ठळक करून सांगण्याने काही हाशील नाही. बाकी तुमच्या लेखातील बर्‍याच भागाशी सहमत नाही तरी ते तुमचे मत व निरिक्षण म्हणून सोडून देते. मराठी सिनेमाला बरे दिवस आलेत यामुळे बरे वाटतेय. आम्हाला प्रतिसाद द्यायला मिळाला यातच मज्जा वाटतेय. ;)

येडाफुफाटा's picture

8 Apr 2016 - 1:59 pm | येडाफुफाटा

सहमत. जात/धर्म पाहून कोणी चित्रपट काढत नाही. त्यामागे आर्थिक आणि कलात्मक हेतूच असावा लागतो. पण दिग्दर्शक त्याला ज्या संस्कृतीचे उदात्तीकरण/तपशील मांडायचे तो ते मांडणारच. उदा. पंजाबी, मोठे कुटुंब, माफिया, इत्यादी. संस्कृती. मग त्यात तांत्रिक कमाल केली असेल तर चांगलेच आहे. पण सामाजिक आणि मूलभूत भावनांना बटबटीत न करता जो दाखवेल त्याला थोडे महत्व मिळायला हवे. आता बाहुबली 'बदले कि आग' हि चावून चोथा झालेली कन्सेप्ट दाखवतो. मग नाविन्य फक्त अभूतपूर्व cgi ग्राफिक्स मध्येच राहिले. बघायला मस्तच. पण आशय आणि कथा याबाबत खूपच साधारण. (तेवढे कटप्पाच रहस्य वगळता☺).

विवेकपटाईत's picture

7 Apr 2016 - 7:27 pm | विवेकपटाईत

लेखकाचा मतांशी मी सहमत आहे . पूर्वी कुणालाही न समजणारे, डोके दुख्विणारे, अंकुर, निशांत, मंथन सारख्या सिनेमांना पुरस्कार मिळायचे. ते सिनेमे सामान्य दर्शक कधीच बघायचे नाही. त्या पेक्षा अभिताभ चे सिनेमे जास्त सरस असायचे. आज बाहुबलीला पुरस्कार मिळाला मना पासून आनंद झाला.

नितिन थत्ते's picture

8 Apr 2016 - 9:00 am | नितिन थत्ते

>>कुणालाही न समजणारे, डोके दुख्विणारे, अंकुर, निशांत, मंथन सारख्या सिनेमांना

जाड ठशांतले चित्रपट मी पाहिले आहेत. ते न समजणारे आणि डोके दुखवणारे आहेत या कमेंटमुळे प्रतिसादकाच्या विषयी बरीच माहिती मिळते.

नाना स्कॉच's picture

8 Apr 2016 - 10:27 am | नाना स्कॉच

एरवी मला अश्या कॉमेंट्स आवडत नाहीत पण मंथन सारख्या सिनेमा बद्दल अशी मते म्हणजे..... असोच

त्याला पुरस्कार मिळाला म्हणून ज्यांच्या पोटात दुखत असेल आणि शरीराच्या ' डाव्या ' बाजूला जळजळ होत असेल (इथे सर्वसामान्य लोकांचं हृदय असतं, इंटुक लोकांचं माहित नाही) त्यांनी इनोच्या फॅक्टरीत मुक्काम ठोकावा हे उत्तम. वाघमा-यांनी एका बंदुकीच्या बारात अनेक वाघ मारलेले आहेत, त्याबद्दल अभिनंदन. छान लेख आहे.

येडाफुफाटा's picture

8 Apr 2016 - 2:01 pm | येडाफुफाटा

तुम्हाला डाव्यांचा विरोध आहे असा म्हणायचे आहे का?

नाना स्कॉच's picture

8 Apr 2016 - 4:42 pm | नाना स्कॉच

बोका साहेब,

आपल्या अभ्यासुवृत्ती बद्दल एक वेगळा आदर होता/आहे,

नाही डाव्यांचा विरोध करायला हरकत नाही (त्यांच्या मुर्ख स्टॅण्डस वर ) पण प्रस्तुत कॉमेंट मधील शब्द आपल्याकडून अपेक्षित नव्हते.

असो.

मर्जी तुमची शब्द तुमचे ___/\__ मी एक फॅन म्हणून बोल्लो

दिग्विजय भोसले's picture

8 Apr 2016 - 9:27 am | दिग्विजय भोसले

हे मात्र थोडं जास्तच होतयं आता,
दांभिक सिक्युलरांचा सुळसुळाट फारच वाढत आहे हल्ली.
दुसरं काय नाही ते घाबरलेत.मानसिक दिवाळखोरीचे लक्षण दुसरं काय!!

सतिश गावडे's picture

8 Apr 2016 - 4:55 pm | सतिश गावडे

ऐकावे ते नवलंच. हे असलं काही आता पहील्यांदाच तुमच्या लेखातून वाचतोय.
आम्ही तर बाबा दिग्दर्शकाने आमच्या बालपणीच्या चांदोबा कथा पडद्यावर जिवंत केल्या म्हणून त्याचे आभार मानले होते.

रच्याकने, डाव्या, समाजवादी, सेक्यूलर प्रभावाखाली असलेले बुद्धिमंत या लोकांची सध्या साडेसाती चालू आहे काय?

नाखु's picture

12 Apr 2016 - 8:34 am | नाखु

गावडेसर,

डाव्या, समाजवादी, सेक्यूलर प्रभावाखाली असलेले बुद्धिमंत हे फक्त हनी (सरकार खर्चाने परदेश दौरे,मोफत पंचतारांकीत सुवीधा) मध्ये विश्वास ठेवीत असल्याने शनीवर (पक्षी वक्रदृष्टी,नियम पालन) विश्वास ठेवीत असतील यावर माझा अजिबात विश्वास नाही.

ता.क. माझे मत कुठलीही अंधश्रद्धा नाही, असे कुणाला वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

आप्लाच नम्र

नाखु टनाटनी

lgodbole's picture

8 Apr 2016 - 6:03 pm | lgodbole

सोनी म्याक्सवर मगधीरा सुरु आहे.

भंकस बाबा's picture

8 Apr 2016 - 9:04 pm | भंकस बाबा

आपल्या हिंदी सिनेमात पुष्कळदा एखादे मुस्लिम पात्र जरा जास्तच देशभक्तिपर प्रवचन देताना दिसते वा इस्लामचे गोडवे गाताना वा वसुधैवकुटुंबकमचे पाठ पढ़वताना दिसते. का असेल बरे?
त्या मुक्क़दर का सिंकदर मधे अमजद खान असली खलनायक दाखवला आहे तरी मरताना अमिताभला प्रेमाचे धड़े शिकवायला जातो.

तर्राट जोकर's picture

8 Apr 2016 - 9:16 pm | तर्राट जोकर

कारण, तेच. राजकारणात गठ्ठा मते तसेच सिनेमा थिएटरला गठ्ठा प्रेक्षकसंख्या. काही मुठभर मुस्लिमद्वेष्ट्यांच्या इच्छेसाठी कमाईवर पाणी सोडणारा धंदा, बॉलिवूड तरी नाही.

भंकस बाबा's picture

8 Apr 2016 - 11:45 pm | भंकस बाबा

पहिल्यांदाच तुमच्याशी सहमत,
बोलिवूडचे माहीत नाही पण होलिवूडमधे कचकुन मुस्लिमद्वेष दाखवत आहेत हल्ली.
काय बिनसलं हो त्यांचं?

lgodbole's picture

9 Apr 2016 - 11:58 am | lgodbole

मुसुलमान मस्तानीच्या मुसलमान पोराला ठार करु पहाणारे क्रूर शनिवारवाले पुणेकर प्रेक्षकाना सहन झाले होते का ? पुण्यात शिनिमावर बंदी होती ना ?

भंकस बाबा's picture

8 Apr 2016 - 11:55 pm | भंकस बाबा

एक राहिलच, आपल्या इटालियन बाई, पप्पू, दिग्गिराजा, मुल्ला मुलायम, समोशातला आलू व् तमाम सेक्कुलर वाद्याना भिववणारा भगवा दहशतवाद अजुन हॉलीवूडकराना का नाही दिसला?
नमोनि काही सेटिंग केलि काय?

तर्राट जोकर's picture

9 Apr 2016 - 11:25 am | तर्राट जोकर

काडीचा प्रयत्न चांगला आहे पण धागा काढा वेगळा,
उगा राडा झाला तर आमच्यावर राज्य येतं.

नाना स्कॉच's picture

9 Apr 2016 - 11:50 am | नाना स्कॉच

उगा राडा झाला तर आमच्यावर राज्य येतं.

महालोल!!!

भंकस बाबा's picture

9 Apr 2016 - 1:26 pm | भंकस बाबा

एक शंकानिरसन् करायचे होते.
बाकी गोडबोले, नाना काय नेहमी तलवारीला धारच काढायला बसलेले असतात काय?

तर्राट जोकर's picture

9 Apr 2016 - 1:41 pm | तर्राट जोकर

बरोबर तुमचे ते शंकानिरसन, आमचेच तेवढे काड्या घालने, विखारी द्वेष, आणि काय काय.
इथे आपण नमोंचे नाव घेतलेत गरज नसतांना, आम्ही घेतले की चवताळून येणारे दुर्लक्ष कर्तील ह्याची खात्री आहे.

भंकस बाबा's picture

9 Apr 2016 - 4:59 pm | भंकस बाबा

नमोचे नाव घेतले म्हणुन माफ़ी मागतो.
पण प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर तो पास करावा, त्याला फाटे फोड़ू नये.

तर्राट जोकर's picture

9 Apr 2016 - 7:55 pm | तर्राट जोकर

प्रश्नाचे उत्तर तर अचूक माहीत आहे. पन देणार नाही. याचे कारण वरच्याच प्रतिसादात दिलंय. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2016 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

उगा राडा झाला तर आमच्यावर राज्य येतं.

=)) =)) =))

अनुप ढेरे's picture

9 Apr 2016 - 7:52 pm | अनुप ढेरे

उगा राडा झाला तर आमच्यावर राज्य येतं.

हा हा हा! =))

mugdhagode's picture

12 Apr 2016 - 8:41 am | mugdhagode

राडा झाला तर नवा बैल जुंपून गाडा सुरु ठेवायचा.

प्रचेतस's picture

12 Apr 2016 - 9:06 am | प्रचेतस

कसं काय जमतं ग तुला मुग्धे प्रत्येक ठिकाणी घाण करायला?

नाना स्कॉच's picture

9 Apr 2016 - 1:38 pm | नाना स्कॉच

नाय हो भंकस विषय आले की भंकस करायला बसलो असतो!

कृ ह घ्या :)

स्रुजा's picture

12 Apr 2016 - 7:25 am | स्रुजा

बाहुबली पाहिलेला नाही पण ब्राह्मण्याचा मुद्दा ओढुन ताणुन आणाल्यासारखा वाटतोय. बॉलिवुड सिनेमे सगळं फक्त आणि फक्त धंद्याच्या हिशोबाने करतात त्यामुळे यात फार विचार करण्यात अर्थ नसतो. पीके मध्ये पण सुशांत सिंग राजपुत चं पात्र भारतीय मुसलमान दाखवता आलं असतं. हिंदु - मुस्लिम एकता वगैरे संदेश तसाही देता आला असता पण पाकिस्तान च्या प्रेक्षकाचा गल्ला मिळावा म्हणुन त्याला पाकिस्तानी दाखवलं. पाकिस्तानी लोकं पण माणसंच आहेत ही अक्कल एक एलियन भारतीयांना शिकवुन जातो, काय जोक आहे. त्यामुळे आजकाल माझ्या चांगल्या सिनेमाच्या व्याख्येत मनोरंजन मुल्य तेवढं आहे. बाकी उगाच दांभिक माणुसकीचे गळे काढण्यापेक्षा मालमसाले सिनेमे बरे. निदान ते ताकाला जाऊन भांडं लपवत नाहीत.

अवांतरः तजोंचं राज्य आमच्यावर येतं ने फार च करमणुक झाली, हाय पॉईंट होता तो प्रतिसादांचा ..लोल

ए ए वाघमारे's picture

12 Apr 2016 - 9:34 am | ए ए वाघमारे

बॉलिवुड सिनेमे सगळं फक्त आणि फक्त धंद्याच्या हिशोबाने करतात त्यामुळे यात फार विचार करण्यात अर्थ नसतो. पीके मध्ये पण सुशांत सिंग राजपुत चं पात्र भारतीय मुसलमान दाखवता आलं असतं. हिंदु - मुस्लिम एकता वगैरे संदेश तसाही देता आला असता पण पाकिस्तान च्या प्रेक्षकाचा गल्ला मिळावा म्हणुन त्याला पाकिस्तानी दाखवलं

बॉलीवूडवाल्यांना इतकं हलक्यात सोडू नका.एवढाच त्यांना धंद्यातच इंटरेस्ट असता तर जसे भारत-पाकिस्तान वैरावर गल्लाभरू सिनेमे काढण्यात येतात तसेच अनेक सिनेमे त्याहूनही अधिक नाटयपूर्ण,अ‍ॅक्शनपूर्ण नक्षलवाद,कॉर्पोरेट भ्रष्टाचार इ.इ.गोष्टींवरही निघाले असते.(काही अपवाद वगळता)

पीकेबाबतीत माझा संशय असा आहे की,ज्याप्रमाणे हल्ली सिनेमात पैसे घेऊन वेगवेगळ्या व्यापारी ब्रॅन्ड्सची जाहिरात करतात तसलाच प्रकार या पाकिस्तानी पात्रासंदर्भात झाला असावा. मला तरी ते पात्र जबरदस्ती (कोणाच्या तरी दबावाखाली)घुसडलेलं वाटतं.हिरानी/विवि चोप्राच्या त्याआधीच्या सिनेमांप्रमाणे तो मनोरंजनप्रधान सिनेमा नसून एक प्रचारपट आहे असं वाटत राहतं.असो.

mugdhagode's picture

12 Apr 2016 - 1:19 pm | mugdhagode

असंख्य सिनेमात पाकिस्तानी ब्यक्तिमत्वे खलनायक आहेत... कर्मा ते गदर , .... अनुपम खेर , नस्रुद्दीन , अमरिश पुरी .....

एका सिनेमात एक पाकिस्तानी मुसलमान हिरो दाखवला तर त्यात कॉन्पिरसी असते ?

यापुर्वीही हीना शिनेमातही पाकिस्तनी स्त्री हिरॉइन होती ना ?

निर्माता पोट भरण्यासाठी सिनेमा काढतो.

आमीरने पीके काढला ... हिंदु गट दुखावला.

लगेच अक्षयचा बेबी आला .. हिंदु गट सुखावला.

बाजार आहे . तेजीमंदी चालणारच.

ए ए वाघमारे's picture

12 Apr 2016 - 8:41 am | ए ए वाघमारे

सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!