एव्हरीबडी लव्हज रेमंड नावाची एक अफलातून sitcom विनोदी मालिका आहे. सध्या चालू असलेली सुमित संभाल लेगा हि मलिक हि ह्या मालिकेची सीन to सीन नक्कल आहे. कोणी साराभाई वेर्सस साराभाई मालिका पाहिली असेल तर तीही ढोबळ पणे यावरच बेतली असल्याचे लक्षात येईल. या मालिकेत एका इटालियन परिवारातील त्यांच्या प्रत्येकाच्या स्वभावाने दररोज होणाऱ्या गमती जमती दाखवल्या आहेत. तर कोण आहेत त्यांच्या परिवारात
एक वृद्ध वडील फ्रॅंक बरोन : हे हेकट स्वभावाचे, बोलता बोलता शिव्या देणारे, बायको फक्त खाणे करून देण्यासाठी असते असे मानणारे , रांगडे , घर परिवार सांभाळणे हे फक्त बायकांचे काम असते असे मानणारे, आपल्या मुलांना ते पुरेसे मर्दानी नाहीयेत म्हणून तुम्ही पोरी आहात(नॅन्सी) असे म्हणणारे, मुलांना कधीही मिठी न मारणारे , मुलांना प्रेमळ शब्दाने हाक न मारणारे आहेत. ते स्वाभाविकपणे गे लोकांना 'कमी' समजतात. (उदा. त्यांचा नातू जर विनोदी रीतीने वेडा वाकडा चालत असेल तर त्याच्यात गे गूण आहेत असे ते मानतात.
आई मरी बरोन: हि बाई स्वयंपाकात अतिशय तरबेज असते किंबहुना त्यामुळेच आपण तिला झेलू शकतो असे फ्रांकला वाटतेय. पण तिच्या स्वयंपाकातील नेपुण्याने ती घरावर वर्चस्व गाजवू शकत असते. याचा प्रमुख फटका बसत असतो तिच्या सुनेला म्हणजे डेब्राला. ती मरी च्या तुलनेने स्वयंपाकात व घर सांभाळण्यात डावी असते म्हणून मरी तिला नेहमी शालजोडीतून हाणत असते. तिचा रेमंड ह्या धाकल्या पोरावर लय जीव असतो. तर मोठ्या मुलावर अविवाहित रॉबर्ट कडे तिचे दुर्लक्ष होत असते.रेमंड च्या कटुंबात सगळी कामे मरी करत असल्याने बाकीचे काम टाळू प्रवृत्तीचे झाल्याचे व त्यामूळेच कामात मदत करण्याचे सौजन्य दाखवत नसतात.
धाकटा मुलगा रेमंड: कोणत्याही भारतीय पुरुषसारखा [खरं तर मागच्या पिढीतल्या पुरुषासारखा कारण बरेच जण आता मेट्रोसेक्सुअल झाले आहेत ] आळशी, कुटुंबाची जबाबदारी एक तारखेला पैसा आणून दिल्यावर संपली असे मानणारा , आपल्या मनोरंजनात- गोल्फ मध्ये व्यस्त असलेला, आई आणि बायकोच्या भांडणाला दुर्लक्षून कमी करू पाहणारा आहे. तसा तो स्वार्थी आहे . काम कसे डेब्रावर ढकलावे असे तो पाहत असतो. आपली काही चूकच नाही हे तो नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत राहतो. आई सुनेच्या भांडणात आपला स्वार्थ साधण्याचा देखील तो पर्यटन करत असतो. सारखे डेब्राकडे काळ वेळ न पाहता सेक्स ची मागणी करत राहतो. ती त्याला नकार देत राहते हा भाग वेगळा.
रेमांची बायको डेब्रा : हि बऱ्याच अंशी सोशिक गृहिणी दाखवलेली आहे. तिचा सगळं वेळ मुलं सांभाळण्यात व रेमंड च्या चूक निस्तारण्यात जात असतो. त्यात मरी सारखे तिला टोमणे मारत असते. भरपूर वेळेस ती वैतागते ओरडते चिडते पण सांभाळून घेते. ती उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्याने तिच्या काही सवयी उदा. वाचन ह्या बरोन कुटुंबाच्या स्पोर्ट्स पाहणे ह्या हॉबी पेक्षा वेगळ्या असतात. म्हणून कधी कधी रेमंड तिच्या बालसंगोपन पुस्तके वाचून मुलांची काळजी घेण्याच्या सवयीची खिल्ली देखील उडवतो.
रेमंडचा मोठा भाऊ रॉबर्ट: हा रेमंड ला मिळणाऱ्या विशेष वागणुकीमुळे त्रस्त असतो. एक छुपी sibling rivalry असते त्याचात आणि रेमंडमध्ये. वरून त्याला मालिकेमध्ये थोडा वेंधळा दाखवला आहे. बोलताना तो घसा खाकरून बोलतो. प्रत्येक घास खाण्याअधि हनुवटीला स्पर्श करून खातो. त्याचे आयुष्य आई वडिलांची लक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात गेले तरीदेखील ते रेमंडला "जास्त प्रेम करतात "असे त्याला वाटते. त्यामुळे रेमंड छोट्या मोठ्या संकटात सापडल्यावर त्याला थोडासा आनंदच होतो. पण रेमंड नेहमी सगळ्यातून सही सलामत बाहेर पडत राहतो कारण "एव्हरीबडी लव्हज रेमंड".
मुले: मालिकेच्या प्रस्ताविकामध्येच सांगितले आहे कि हि मालिका मुलांबद्दल नाही. तरी मुलांच्या काही शाळेच्या बाबतील समस्या काही एपिसोड मध्ये आल्या आहेत.
थोडक्यात ओरडणार बाप , वर्चस्व गाजवू पाहणारी आई , सोशिक सून, मनमौजी मुलगा , jealous भाऊ असे एक चक्रम कुटुंब आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या कुरघोड्या पाहण्यात , सवाल जबाब ऐकण्यात खूप मजा आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे प्रातिनिधिक रुप थोड्याफार फरकासाहित सगळीकडेच दिसत असते . त्यामुळे हि मालिका खूप ओरिजिनल वाटते. त्यातली निरीक्षणे लगेच आपण आपल्या जीवनात पडताळून पाहू शकतो.
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://m.imdb.com...
तर आपल्या जीवनातील लहानपणीची नि तरुण पणाची अनेक cliche/ अंगवळणी पडलेली पण असुसंस्कृत/politically incorrect वाटणारी वाक्ये बऱ्याच वेळेला ऐकलेली असतात. उदा.
वडील @ मुलगा :
शेपूळा हैस तू तुला नाही जमणार (बरणीच झाकण काढायला).
अरे लाजायला काय बाई आहे काय?
लंगड्या सारख पळू नको कुबड काढून?
बांगड्या घालून बस घरात.
किचन मधी काय करतो रं सारख बाई आहे का काय?
कारले खात जा शक्ती येते.
बायकोच्या पदराखाली जाऊन बस.
आवाज कमी का करू मी कुणाच्या बापाच खाल्लं नाही.
ह्या पिढीत दमच राहिला नाही सगळी हायब्रीड झालीय नुसती.
मी काय चमच्याने दूध पितो काय भाडखव.
आई@मुलगा:
नऊ महिने पोटात ठेवला ते काय हे दिवस बघण्यासाठी(भाजी आणायला नाही म्हटल्यावर)
पोरगं बायकोच्या मुट्ठीत गेलं.
म्हणजे माझ्यापेक्षा ती काल आलेली सटवी गॉड वाटते व्हय.
तू माझा नाहीस बोहरणीने तुला दारात सोडलं होत तुझ्या भावाला कोणी खेळायला नाही म्हणून ठेवला तुला.
शेजारणीने दिलेल्या पंच पक्वान्नापेक्षा आईने फिरवलेला मायेचा हात मोठा असतो.
शेजारची काकू एकच टाईम जेवायला करते माहितेय का?
भांडेवाली, धुणे वाली किती पैसे घेते माहितेय का तुमचं खरखट काढायला?
दहा हजार रुपये दिले तरी असली घाण कोणी काढणार नाही.
माझा मोठा म्हणजे सूर्य आणि धाकटा म्हणजे चंद्र.
सध्या जेवढी सुचली तेवढीच लिहिलि. बाकी शेजारी पाजारी, भाऊ, बहीण, जवळचे/दूरचे नातेवाईक यांची पण काही ठरलेली कुजकी/उपदेश/उपहास करणारी वाक्ये असतात त्यानी आपणाला काही फरक पडत नाहीच पण बरेच वेळेस cliche झाल्याने मनोरंजन होते. अशी अनेक वाक्ये आपणाला मालिकेत पाहायला मिळतील.एकूणच आवर्जून पहावी अशी मालिका.
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 6:13 pm | मराठी कथालेखक
हिंदी Audio सह मिळेल का बघायला ?
5 Apr 2016 - 6:27 pm | येडाफुफाटा
नाही. " सुमित संभाल लेगा" बघावे लागेल. स्टारप्लस वर असेल किंवा हॉटस्टार अँप वर उपलब्ध आहेत.
5 Apr 2016 - 7:24 pm | अंतु बर्वा
छान सिरीज आहे. सर्व सिजन नेट्फ्लिक्सच्या क्रुपेने पाहिले आहेत.
रॉबर्ट चे "इज धिस अबाउट मी?" आणि मरीचे "आर यु हंगरी डिअर?" मजा आणतात.
5 Apr 2016 - 11:56 pm | रेवती
आणि लेमन चिकन सुद्धा! ;)
6 Apr 2016 - 6:18 am | साहना
साराभाई ह्या सिरियल च्या तोडीची होती. जबर आहे सेरियल
6 Apr 2016 - 7:02 am | येडाफुफाटा
साराभाई ELR च्या प्रेरनेशी प्रामाणिक राहिली. सासू-सूनमधील संघर्ष ELR मध्ये प्रामुख्याने कूकिंगशी संबधित आहे तर क्लास संघर्ष (डेब्रा-उच्चवर्गीय व बरोन्स मध्यमवर्गीय) दुय्यम आहे. तर साराभाई मध्ये वर्ग संघर्ष प्रमुख असून कुकिंग मधील फरक त्या वर्ग संघर्षामुळेच आहे असे दाखवले आहे. रोसेश चा विक्षिप्तपणा रॉबर्ट पेक्षा वेगळा दाखवला आहे.
6 Apr 2016 - 6:24 am | यशोधरा
माझ्या आवडत्या सिरियल्सपैकी एक.
6 Apr 2016 - 6:31 am | जुइ
भन्नट मजा येते पाहायला. फ्रॅंक आणि मरी विषेश आवडता.
12 Apr 2016 - 1:23 am | पद्मावति
आहा...एव्हरग्रीन! कधी पण कुठलाही एपिसोड बघावा तेव्हडीच मजा येते.
12 Apr 2016 - 1:34 am | श्रीरंग_जोशी
एव्हरीबडी लव्ज रेमंड ही आवडती मालिका टिव्हीवर खूप वेळा पाहिली आहे.