वर्‍हाडी चिकन रस्सा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in पाककृती
10 Sep 2015 - 10:11 pm

(एकदम बेसिक वर्‍हाड़ी चिकन रस्सा)

1

लागणारे साहित्य:

चिकन - अर्धा किलो,
तेल - पाऊण मोठी वाटी,
कांदा - १ मोठा चिरून (चमचाभर तेलावर भाजून बारीक पेस्ट केलेली),
लसूण - १ मध्यम आकाराचा गड्डा,
हिरव्या मिरच्या - २,
आलं - बोटाच्या १ पेराइतका तुकडा,
(आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा तुकडा - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले,
जिरे - १ चमचा,

दालचीनी- अर्ध्या बोटा एवढा १ तुकडा ,
मिरे - ७ ते ८,
लवंग - ४ ते ५,
मसाला वेल्दोड़े- २,
धने - एक चहाचा चमचा तेलात भाजून (+ मिरे + लवंग + विलायची + दालचीनी + जिरे) बारीक केलेले,
कोथिंबीर बारीक चिरून,
तिखट,
हळद,
मीठ.

क्रमवार पाककृती:

चिकन ३ वेळ पाण्यात धुवून घ्यावे. त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे. ३ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे. (पाणी घाला अगदी थोड़े बुडाला लागु नये म्हणून. तसेही चिकन पाणी सोडत)

शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय खासम ख़ास तेलाची तर्री हवी असल्यास तेल जास्त टाका, sincerely वर्‍हाड़ी रश्यात ती हवीच).

तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी, धने आणि इतर जिन्नस असलेली मसाला पूड घालून परतावे, त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी.

त्यात ५ चमचे तिखट, दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवताना टाकलेल्या मिठाला विसरु नये).

आता त्या फोडणीत अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण ठेवावे. दोन मिनिटात फोडणी आणि त्यातली तर्री वेगळी झालेली दिसेल. त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे. दीड ते २ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे.

आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी असले फोटो काढता येतात मग.

1

*माझ्याकडे कोथिंबीर नव्हती
**********
("सदरहु पाककृती ही टीना ह्यांची असुन मी त्याच्यात बेयर मिनिमम सामान वापरून मी बनावली आहे तस्मात् ह्या पाककृती चे श्रेय टीना ह्यांचेच आहे")

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 Sep 2015 - 10:31 am | तुषार काळभोर

टिनातैंमुळे जर आमच्या हातून कोंबडी हत्या घडली, तर ते पातक आमच्या माथी टाकू नकोस.

बॅटमॅन's picture

14 Sep 2015 - 12:48 pm | बॅटमॅन

ब्याटम्यान खुष हुआ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

लवकर लवकर लागा कामाला...
१७ ते २७ बाप्पा अन महालक्ष्म्या असणारे ;)

हा पुर्ण गंजच मांडला घ्या समोर..

.

कोमल's picture

14 Sep 2015 - 9:26 pm | कोमल

ज्जे बात. लैच हुच्च..

प्यारे१'s picture

14 Sep 2015 - 9:37 pm | प्यारे१

>>> लैच हुच्च..

नेमका काय अर्थय? उंचावरची कोंबडी की पातेलं?
(आमच्याकडे उभट पातेल्याला गंज म्हणतात. ताक घुसलने के काम आता जनरली)

अभ्या..'s picture

14 Sep 2015 - 10:02 pm | अभ्या..

हुच्च मत्तु येडा.
बेकु?

प्यारे१'s picture

14 Sep 2015 - 10:16 pm | प्यारे१

कन्नडा बरितल्ले आन्ना.

अभ्या..'s picture

14 Sep 2015 - 10:20 pm | अभ्या..

बंदिल्ला? होग..

प्यारे१'s picture

14 Sep 2015 - 10:22 pm | प्यारे१

१००.

गप खा की चिकन. काय कळंना एक तर. आणि त्यात काय बाय बोलायला का?

अभ्या..'s picture

14 Sep 2015 - 10:24 pm | अभ्या..

शिव शिव. चिकन आन म्या?
पाप.
(बघताय ना लाटकरशास्त्री? असे भरीस पाडतात बघा)

यल्ले होगोण पा, अदु चिकन नोडि बायाग नीर बंदंद नोड...

सूड's picture

15 Sep 2015 - 4:28 pm | सूड

यल्ले होगोण

इलंस? मगे आता ताबडतोब न्हाणीघरात जा मरे!! हयसर गणपतीची कामा चल्ली हत.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2015 - 6:32 pm | अत्रुप्त आत्मा

@उंचावरची कोंबडी की पातेलं?>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling.gif

सानिकास्वप्निल's picture

15 Sep 2015 - 12:09 am | सानिकास्वप्निल

देवा!! कसला रंग आलाय वर्‍हाडी चिकनच्या रश्श्याला .....तोंपासू अगदी.
मी नक्की करणार आहे ही पाककृती, चिकन जीवकीप्राण आहे आणि असा तडकता-भडकता कोंबडी रस्सा थंडीत ओरपायला जाम भारी लागेल.
धन्यवाद पाककृती इथे दिल्याबद्द्ल :)

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2015 - 6:18 pm | दिपक.कुवेत

एकदम तोंपासू...

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jul 2016 - 7:37 am | कैलासवासी सोन्याबापु

.

रतीब नंबर दोन!! गुड मॉर्निंग मंडळी 3:)

धनंजय माने's picture

10 Jul 2016 - 9:04 am | धनंजय माने

ऐ पोरा, काय काम नाय का?
सकासकाळ फटु टाकला???? कवा केल्ती? झनका दिसतिया येक लंबर. ;)