अभिषेक प्रकारांची माहिती हवी

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
31 Jul 2015 - 9:45 pm
गाभा: 

काल आणि आज मिळून मराठी विकिपीडियावर शिखर शिंगणापूर हा लेख अद्ययावत करण्याचा योग आला तसेच त्या सोबतकावड यात्रा नावाचा नवा लेखही बनवला. पण लेखांना दुवा देताना लक्षात आले की 'अभिषेक' या विषयावर मराठी विकिपीडियावर लेख अद्यापतरी उपलब्ध नाही. आणि इंग्रजी विकिपीडियावरील लेखातही सध्या हिंदू धर्मातील अभिषेकांपेक्षा तांत्रिक बुद्धीझम वगैरेंच्या अभिषेकांची माहिती मिळते पण सर्व प्रकारच्या अभिषेकांबद्दल पुरेशी माहिती दिसत नाही.

सध्या चतुर्मास चालूच आहे तर त्या निमीत्ताने अभिषेक विवीध प्रकारांची नोंद या धागा लेखाच्या माध्यमातून घेता आली तर विकिपीडियावर एका ज्ञानकोशीय लेखाची चांगली भर पडू शकेल.

(या धागा लेखास आलेल्या प्रतिसादांचा उपयोग होऊन अभिषेक हा लेख बनवणे सोपे गेले आहे. प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद)

१) अभिषेक म्हणजे काय ?

२) अभिषेकांचे प्रकार कोणते ?

३) उद्दिष्टे आणि साध्ये कोणती ?

४) कोणते अभिषेक कोण-कोणत्या देवतांना कोणकोणत्या मंदिरात केव्हा केव्हा केले जातात ?

५) दुर्मीळ अभिषेकांचे प्रकार कोणते ?

६) कोणत्या अभिषेकांचे उल्लेख कोणत्या ग्रंथात मिळतात

७) कोणत्या अभिषेकांना कोणते मंत्र म्हटले जातात ?

८) जैन धर्मीयातही अभिषेक असतात का ? असेल तर प्रकार आणि पद्धती कशा असतात ?

* आपल्याकडे स्वतःकाढलेली अभिषेकाची काही छायाचित्रे असल्यास विकिमिडीया कॉमन्स वर प्रताधिकारमुक्त स्वरूपात चढवल्यास विवीध भाषी विकिपीडिया प्रकल्पातून अशी छायाचित्रे वापरता येतील.

* ह्या धागा लेखाचा उद्देश विकिपीडियासाठी माहिती संकलीत करणे असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त समजले जातील.

* अनुषंगीक सोडून इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी आभार.

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

31 Jul 2015 - 10:10 pm | मंदार कात्रे

१) अभिषेक म्हणजे काय ?
विशिष्ट देवतेचे स्त्रोत्र मंत्र म्हणत असताना देवतेच्या मूर्तीवर अथवा प्रतिकावर दूध ,उसाचा रस किंवा पाण्याची संततधार धरणे याला अभिषेक असे म्हणतात . अभिषेक पूजेत षोडशोपचार पूजा समाविष्ट असते.

२) अभिषेकांचे प्रकार कोणते ?
विशिष्ट देवतांसाठी विशिष्ट संख्येने स्त्रोत्रे म्हणून निरनिराळे अभिषेक करता येतात. उदा. रुद्र मंत्र चे 11 पाठ करून
दूध शिवपिंडी वर संततधार धरणे याला रुद्रएकादशिनी असे म्हणतात ,तर याच संख्येत बदल करून लघुरूद्र ,महारुद्र ,अतिरुद्र वगैरे अभिषेक होतात ,अर्थात महारुद्र ,अतिरुद्र यामध्ये हवन याग समाविष्ट आहे. तसेच श्री गणेश अथर्वशीर्षाचे एकदा पठन करून दुधाची संततधार धरल्यास अभिषेक , 21 वेळा केल्यास एकादशिनी व 1000 वेळा केल्यास सहस्रावर्तन असे म्हणतात. अशाच पद्धतीने देवीसाठी श्रीसूक्त , सूर्यासाठी सौरसूक्त , विष्णुसाठी पावमान पंचसूक्त किंवा पुरुषसूक्त अशी स्त्रोत्रे वापरतात.

३) उद्दिष्टे आणि साध्ये कोणती ?

विविध ऐहिक अथवा पारमार्थिक कामना मनात धरून तसे संकल्प करून अभिषेक पूजा करता येतात. यामध्ये स्वास्थ्यलाभ , नोकरीसंबंधित बाबी , लग्न जुळणेसाठी ,तसेच बाधा निवारण इत्यादि अनेक उद्दिष्टे मनात धरून अभिषेक पूजा केल्या जातात.

४) कोणते अभिषेक कोण-कोणत्या देवतांना कोणकोणत्या मंदिरात केव्हा केव्हा केले जातात ?

वर सांगितल्याप्रमाणे शिवमंदिरात रूद्राभिषेक सोमवारी /महाशिवरात्र / प्रदोष / श्रावणी सोमवार इत्यादी दिवशी .
गणपती मंदिरात एकादशिनी संकष्टी चतुर्थी / माघी गणेश जयंती अथवा भाद्रपद गणेशोत्सवाच्या वेळी घरोघरी केले जातात.

५) दुर्मीळ अभिषेकांचे प्रकार कोणते ?
यासंबंधी फारशी माहिती मला नाही .

६) कोणत्या अभिषेकांना कोणते मंत्र म्हटले जातात ?

वर दिलेच आहे . रुद्र मंत्र चे 11 पाठ करून
दूध शिवपिंडी वर संततधार धरणे याला रुद्रएकादशिनी असे म्हणतात ,तर याच संख्येत बदल करून लघुरूद्र ,महारुद्र ,अतिरुद्र वगैरे अभिषेक होतात ,अर्थात महारुद्र ,अतिरुद्र यामध्ये हवन याग समाविष्ट आहे. तसेच श्री गणेश अथर्वशीर्षाचे एकदा पठन करून दुधाची संततधार धरल्यास अभिषेक , 21 वेळा केल्यास एकादशिनी व 1000 वेळा केल्यास सहस्रावर्तन असे म्हणतात. अशाच पद्धतीने देवीसाठी श्रीसूक्त , सूर्यासाठी सौरसूक्त , विष्णुसाठी पावमान पंचसूक्त किंवा पुरुषसूक्त अशी स्त्रोत्रे वापरतात.

आधी माहितीसाठी
http://www.maayboli.com/node/43199

मंदार कात्रे's picture

31 Jul 2015 - 10:24 pm | मंदार कात्रे

* पवमान पंचसूक्त असे वाचावे.

4.- त्याचप्रमाणे देवीवर श्रीसुकतान अभिषेक शक्यतो नवरात्रात केले जातात. विष्णु /लक्ष्मीकांत /लक्ष्मीकेशव /विठ्ठल /व्यंकटेश बालाजी यांच्यावर पवमान पंचसूक्त अभिषेक आषाढी व कार्तिकी एकादशी दिवशी ,तसेच वैकुंठ चतुर्दशी ला अभिषेक केले जातात . रुद्रसूक्त हे शंकराखेरीज हनुमान तसेच दत्तसांप्रदायातील अवतारी महात्म्यांच्या समाधी /पादुकांच्या वर अभिषेकप्रसंगी देखील केले जातात .

याखेरीज अनेक मंदिरात अथवा घरीदेखील असे अभिषेक अन्य दिवशीदेखील यजमानाच्या इच्छेनुसार पुरोहिताच्या मदतीने करता येतात .

पवमानाचा अभिषेक गोकुळाष्टमीला कृष्णजन्माची पूजा करताना पण करतात. विष्णु सहत्रनाम आणि पवमानाचा अभिषेक झाला की मग कृष्णजन्माची आरती.

माहितगार's picture

1 Aug 2015 - 11:17 am | माहितगार

@ मंदार आणि स्रुजा तुमच्या प्रतिसादांमुळे मराठी विकिपीडियावरी लेख अभिषेक हा लेख बनवणे खूप सोपे बनले. आपल्या प्रतिसादांसाठी आभारी आहे.

*खाली एका मंदिरातील अभिषेक चालू असतानाचे छायाचित्र आहे. हे कोणत्या मंदिरातील असेल ह्याची माहिती जमल्यास हवी आहे.

abhishek

द-बाहुबली's picture

1 Aug 2015 - 1:41 pm | द-बाहुबली

हा फोटो कुठला आहे याची माहिती मिळेल काय ?

मंदार कात्रे's picture

1 Aug 2015 - 1:19 pm | मंदार कात्रे

हे बहुधा तमिळनाडू मधील चिदंबरेश्वर मन्दिरातील अभिषेकाचे छायाचित्र असावे

सध्या चतुर्मास चालूच आहे

यानिमित्ताने चातुर्मास या शब्दावर थोडे भाष्य करू इच्छितो.

मराठीतील मूळ शब्द चतुर्मास नसून "चातुर्मास्य" असा आहे. चतुर्मासांच्या काळात केली जाणारी व्रतवैकल्ये किंवा त्या काळातील जीवनाला अनुलक्षून तो शब्द वापरला जातो. त्याचे मराठीतील तद्भव रूप चातुर्मास असे झाले आहे. सध्या अनेक "विचारी" विद्वानांमुळे आता ते चतुर्मास असे बदलू लागले आहे, असो.

आनन्दा's picture

3 Aug 2015 - 3:34 pm | आनन्दा

मराठीतील मूळ शब्द

कृपया संस्कृतमधील असे वाचावे.

माहितगार's picture

3 Aug 2015 - 5:41 pm | माहितगार

भाषा प्रवाही असते

आनन्दा's picture

3 Aug 2015 - 6:37 pm | आनन्दा

भाषा प्रवाही असते, पण हे विद्वान जेव्हा संस्कृतचा दाखला देवून हेच कसे योग्य आहे असे पटवत बसतात तेव्हा हसायला येते.
मध्यंतरी लोकसत्ताच्या कृपेने एका प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्यांनी चातुर्मासाबद्दल बोललेली मुक्ताफळे वाचली त्यावर मी बोलत आहे. तुम्ही कोणता रेफरन्स घेतला आहे मला माहीत नाही.

माहितगार's picture

6 Aug 2015 - 1:00 pm | माहितगार

वेदशास्त्र हो पुराण । कां प्राकृतभाषास्तवन ।
एथें भावचि श्रेष्ठ जाण । तेणें नारायण संतोषे ॥४७॥

-संत एकनाथ

अनिरुद्ध प's picture

4 Aug 2015 - 2:28 pm | अनिरुद्ध प

मी ऐकल्या प्रमाणे
एकादषणी=११
म्हणजेच संततधार चालू असताना ११ वेळा पाठ म्हणतात.कृपया जाणकारानि स्पष्ट करावे.

अनिरुद्ध प's picture

4 Aug 2015 - 2:28 pm | अनिरुद्ध प

मी ऐकल्या प्रमाणे
एकादषणी=११
म्हणजेच संततधार चालू असताना ११ वेळा पाठ म्हणतात.कृपया जाणकारानि स्पष्ट करावे.

अनिरुद्ध प's picture

4 Aug 2015 - 2:29 pm | अनिरुद्ध प

मी ऐकल्या प्रमाणे
एकादषणी=११
म्हणजेच संततधार चालू असताना ११ वेळा पाठ म्हणतात.कृपया जाणकारानि स्पष्ट करावे.

अनिरुद्ध प's picture

4 Aug 2015 - 2:29 pm | अनिरुद्ध प

मी ऐकल्या प्रमाणे
एकादषणी=११
म्हणजेच संततधार चालू असताना ११ वेळा पाठ म्हणतात.कृपया जाणकारानि स्पष्ट करावे.

आनन्दा's picture

4 Aug 2015 - 5:55 pm | आनन्दा

थांबले बुवा.. मी म्हणलं ११ वेळा टाकता की काय..

ह. घ्या. (तांत्रिक कारणामुळे झाले हे माहीत आहे)

एकादशणी म्हणजे ११ वेळा पाठ म्हणतात.

सामान्यत: पाण्याची संततधार धरली जाते. त्यासाठी अभिषेक पात्र्/गळती लावली जाते. शंकराच्या मंदिरात गळती लावलेली असते.

वसंत ऋतुत्/चैत्रात आंब्याच्या रसाचा अभिषेक देखील करतात.

अभिषेक करताना रुद्र - ११ वेळा, श्रीसुक्त - १६ वेळा, अथर्वशीर्ष - २१ वेळा म्हटले जातात. अर्थात रुद्र - शिव तसेच शंकराच्या अवतारांच्या (खंडोबा) अभिषेकांसाठी, श्रीसुक्त (देवींसाठी) म्हटले जाते.

दत्त तसेच दत्तावतारांसाठी रुद्र आणि पवमान,पुरुषसुक्त दोन्ही म्हटले जाते.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Aug 2015 - 1:27 am | अत्रुप्त आत्मा

रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र - संख्या) - ११ आवर्तने
लघुरुद्र अभिषेक :- (११ एकादशिनी) -१२१ आवर्तने
महारुद्र अभिषेक:- (११लघुरुद्र) - १३३१ आवर्तने
अतिरुद्र अभिषेक :- (११ महारुद्र) - १४६४१ आवर्तने

जैन धर्माविषयी जास्त माहिती नाहीय. पण बाहुबलीच्या मुर्तीला दर बारा वर्षांनी महामस्तकाभिषेक करतात. त्यात वेगवेगळी द्रव्ये (पाणी, दुध, दही, तुप, मध, साखर, कुंकुंयुक्त जल, हळदीचे पाणी इ.) वापरताना पाहिली आहेत.

माहितगार's picture

6 Aug 2015 - 2:39 pm | माहितगार

रुद्रसूक्ताची पहिली आणि शेवटची ओळ कोणती ?

मंदार कात्रे's picture

6 Aug 2015 - 4:33 pm | मंदार कात्रे

पहिली ओळ-
ओम नमस्ते रुद्र मन्यवे उतो त इषवे नमः
शेवटची ओळ-
एका च मे तिस्रं च मे पच मे सप्तश्च मे.....

मंदार कात्रे's picture

6 Aug 2015 - 4:35 pm | मंदार कात्रे

रुद्र व रुद्रसूक्त निराळे आहेत
रुद्रामध्ये नमक व चमक असे दोन भाग पडतात
रुद्रसूक्त छोटे आहे.

माहितगार's picture

7 Aug 2015 - 7:49 am | माहितगार

रुद्र सूक्त, रुद्र नमक, रुद्र चमक हे तीन संस्कृत दस्तएवज मराठी विकिस्रोत प्रकल्पात आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात ते तीनही दस्तएवजांचे पाठ पुरेसे, बरोबर अथवा/आणि प्रमाण आहेत का हे आपल्याकडून तपासून मिळावेत अशी विनंती आहे. (शक्य असेल तेथे पाठ भेदही नोंदवण्यास हरकत नाही.)

१) काळाच्या ओघात विकिस्रोतावर उपरोक्त दस्तएवजांचा (शब्दार्थांसहीत) मराठी अनुवाद करण्यातही साहाय्य हवे आहे.

२) अभिषेक लेखात रुद्र शब्दास दुवा जोडताना नेमका कोणत्या दस्तएवजाचा दुवा जोडावा रुद्रसूक्ताचा रुद्र-चमकचा की रुद्र-नमकचा की हे तिन्ही दस्तएवज एकाच पानावर घेऊन त्याचा दुवा जोडावा (अनभिज्ञतेबद्दल क्षमस्व)

मंदार कात्रे's picture

7 Aug 2015 - 10:42 am | मंदार कात्रे

रुद्रसूक्त नको

मंदार कात्रे's picture

7 Aug 2015 - 10:46 am | मंदार कात्रे

वरच्या प्रतिसादात थोडी गडबड झाली आहे.
रुद्रसूक्ताची पहिली ओळ

हरि ओम कद्रुद्राय प्रचेतसे .... अशी आहे. विकि वर बदल करावा ,ते निराळे सूक्त आहे